Vihir Anudan Yojana 2024-25 : शेतकऱ्यांना मिळणार मोफत विहीर योजना

Vihir Anudan Yojana 2024-25 : शेतकऱ्यांना मिळणार मोफत विहीर योजना

Vihir Anudan Yojana 2024-25 : राज्यामध्ये बहुतांश भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असते, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला स्वतःला विहीर खोदणे शक्य नसते. त्यामुळे पंचायत समिती विहीर योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. जेणेकरून शेतकऱ्याला स्वतःच्या शेतामध्ये शेतीसाठी विहीर खोदता यावी यासाठी हे अनुदान दिले जाते. या योजनेला महाराष्ट्र मध्ये “मागेल त्याला विहिरी योजना” या नावाने देखील राज्यभर ओळखले जाते.

केंद्र सरकारच्या अंतर्गत किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात त्यापैकीच मागेल त्याला विहीर अनुदान योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग हा नेहमी दुष्काळग्रस्त असतो अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेती करणे शक्य होत नाही तसेच विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे उपलब्ध नसतात यामुळे शेतकरी स्वतः विहीर होऊ शकत नाही त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये पर्यंत अनुदान वाटप केले जाते.

राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार करून महाराष्ट्रामध्ये अनेक छोटे-छोटे शेतकरी आहेत, ज्यांना पाठाने पाणी देने शक्य नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचा योग्यरित्या वापर करता येईल, त्यासाठी मुळात शेतीमध्ये सुरुवातीला पाणी उपलब्ध करून त्याचे योग्य नियोजन लावून शेतामध्ये चांगल्या प्रकारे पीक आणता येईल व राज्यातील अनेक शेतकरी लखपती हितील या उद्देशाने Vihir Anudan Yojana 2024-25 ही योजना सुरू केलेली आहे.

Vihir Anudan Yojana 2024-25योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा नक्कीच फायदा होईल. तसेच या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील कोणते शेतकरी पात्र आहेत, लाभार्थी शेतकरी कोणते, योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात, अर्ज कोठे करायचा या सर्व गोष्टींची माहिती या लेखांमधून घेणार आहोत, वाचकांनी लेख शेवटपर्यंत वाचावा.

Vihir Anudan Yojana 2024-25
Vihir Anudan Yojana 2024-25

Vihir Anudan Yojana 2024-25 Highlight

योजनेचे नाव विहीर अनुदान योजना
मिळणारा लाभ चार लाख रुपये
उद्देश शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधने
लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन व ऑफलाइन

 

विहीर अनुदान योजनेचे मुख्य उद्दिष्टे

● महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असणारे शेतकरी आणि छोटे क्षेत्र असलेले शेतकरी त्यांच्या शेतामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व याच छोट्या शेतकऱ्यांना लखपती करण्यासाठी विहीर अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. Vihir Anudan Yojana 2024-25

● दुष्काळग्रस्त शेती क्षेत्रामध्ये पाणी उपलब्ध करून देणे.

● शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे, व राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.

● महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी पुरेसे अनुदान उपलब्ध करून देणे व त्याच्या माध्यमातून शेतामध्ये पाणी उपलब्ध करून देणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

● राज्यातील शेती क्षेत्राकडे तरुणांना आकर्षित करणे व कृषी क्षेत्राचा विकास साधने हे देखील शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

● शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी मुख्य पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे.

● महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल करणे.

● आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान योजनेच्या माध्यमातून 4 लाख रुपये मदत करणे, व त्यांना शेतामध्ये विहीर खोदून पाण्याचा मुख्य स्रोत तयार करणे.

● शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी इतरांकडे पैसे मागण्याची वेळ येऊ नये, यासाठी विहीर अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे.

विहीर अनुदान योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

1. राज्य सरकारच्या माध्यमातून पंचायत समिती कृषी विभाग योजना या अंतर्गत “मागेल त्याला विहीर” या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेला राज्यभरातून मागेल त्याला विहीर योजना अशी देखील ओळख आहे.
2. महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या शेतकऱ्यांसाठी तसेच विहीर खोदण्यासाठी ऐपत नसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
3. राज्यातील शेती क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे.
4. महाराष्ट्र राज्यातील तरुणांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी देखील ही एक महत्त्वाची योजना आहे.
5. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही अत्यंत सोपी ठेवलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अडचण भासणार नाही.
6. Vihir Anudan Yojana 2024-25 योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. अर्जदार शेतकऱ्याला घरी बसून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याच्या आवश्यकता भासणार नाही. जेणेकरून शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टींची बचत होईल.
7. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मागील त्याला विहीर योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्याचे आव्हान केले आहे.
8. राज्यातील विदर्भ सारख्यां आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या हेतूने तसेच त्यांच्या शेतीसाठी आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरलेली आहे.
9. मागेल त्याला विहीर अनुदान योजना ची मिळणारी रक्कम शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे योजनेमध्ये कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाही.

शासनाच्या इतर योजना पहा 

1. महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार यांचे जीवनमान सुधारण्यासाठी Bandhkam Kamgar Yojana 2024 
 2. Krushi Drone Yojana 2024 शेतकर्यांना ड्रोन वाटप योजना 

 

Vihir Anudan Yojana 2024-25 योजनेचे होणारे फायदे

● Vihir Anudan Yojana 2024-25 योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना चार लाखाचे अनुदान मिळणार आहे.
● त्यामुळे राज्यातील शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये वीर बघण्यासाठी आत्मनेर्भर बनतील.
● शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी इतरांकडे पैसे मागण्याचे आवश्यकता भासणार नाही.
● शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये विहीर खोदल्यानंतर शेतामध्ये सिंचनाचा मुख्य स्रोत तयार होईल व शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात.
● राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याचा मुख्य स्रोत तयार झाल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक पिके घेण्यासाठी मदत होईल. तसेच त्याचा आर्थिक फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे.

विहीर अनुदान योजनेचे लाभार्थी

● अनुसूचित जाती व जमाती मधील शेतकरी.
● भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील शेतकरी
● इतर मागासवर्गातील शेतकरी
● दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी शेतकरी
● अल्पभूधारक शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी

मागेल त्याला विहीर योजना निवड प्रक्रिया

● मागेल त्याला विहीर अनुदान योजना अंतर्गत लाभार्थ्याची निवड ग्रामसेवक यांच्यामार्फत केली जाते.
● ग्रामसभा/ग्रामपंचायतच्या मान्यतेनंतर एका महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील, प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लगेच 15 दिवसाच्या आत मध्ये तांत्रिक मान्यता देण्याचे जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाची असते. Vihir Anudan Yojana 2024-25

विहीर अनुदान योजनेसाठी आवश्यक मुख्य कागदपत्रे

Vihir Anudan Yojana 2024-25अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना खालील कागदपत्रे बंधनकारक असतील.

1. आधार कार्ड
2. कुटुंबाचे रेशन कार्ड
3. मोबाईल नंबर
4. रहिवाशी दाखला
5. ई-मेल आयडी
6. रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड
7. उत्पन्नाचा दाखला
8. बँक खात्याचा तपशील
9. सातबारा उतारा 7/12 व 8 अ उतारा पासपोर्ट साईज आकाराचे फोटो.

सरकारी योजनेसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा 

मागेल त्याला विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

या योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतात.

ऑफलाइन प्रक्रिया –

सर्वप्रथम अर्जदार शेतकऱ्याला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल, व ग्रामसेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत मध्ये अर्ज जमा करावा लागेल.

तो अर्ज ऑनलाईन भरण्याचे काम ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात येईल.

ऑनलाइन प्रक्रिया –

● अर्जदार शेतकऱ्याला सर्वप्रथम शासनाच्या महाडीबीटी पोर्टल या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

● सदरच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अर्जाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर संपूर्ण अर्ज तपासून सबमिट या बटणावर क्लिक करून सबमिट करायचा आहे.

● अर्जदार शेतकऱ्याला स्वतः अर्ज भरता येत नसेल तर या शेतकऱ्याने जवळच्या सायबर कॅफेमध्ये किंवा महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरून घ्यायचे आहेत.

● अशाप्रकारे अर्जदार शेतकऱ्यांची अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्ण होऊन जाईल.

शासनाची अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा येथे क्लिक करा
शासकीय योजनेसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

सारांश :

अशाप्रकारे Vihir Anudan Yojana 2024-25 अनुदान योजनेची संपूर्ण प्रक्रिया वाचून तुम्ही तुमच्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळवू शकता. माहिती आवडली असल्यास इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करावी. आणि या योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळवून द्यावा. तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे नक्कीच “दैनिक माझा हे पोर्टल” उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.

Leave a Comment