Vasantrao Naik Karj Yojana 2024 : राज्यातील तरुणांना बिनव्याजी कर्ज
Vasantrao Naik Karj Yojana 2024 : देशातील तरुणांची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे, शिक्षणाानुसार प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामध्ये अनेक तरुणांची व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु व्यवसायासाठी लागणारे भांडवल, आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक तरुण आपला व्यवसाय उभा करू शकत नाही. व त्यांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न देखील पूर्ण होत नाही. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून राज्य शासनाने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. जेणेकरून या महामंडळाच्या माध्यमातून तरुणांनी कर्ज घेऊन आपला व्यवसाय उभा करावा व रोजगार निर्मिती करावी.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना 1 लाख रुपयाचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जेणेकरून राज्यातील तरुणांनी आपला स्वतःचा एखादा उद्योग सुरू करावा व नोकरीची संधी उपलब्ध करावी. हा या मागचा मुख्य हेतू आहे.
महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या विशेष मागास वर्गातील असून आज देखील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत. या जमातीतील तरुणांना त्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी व त्यांच्या स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे.
Vasantrao Naik Karj Yojana 2024 Overview
योजनेचे नाव | Vasantrao Naik Karj Yojana 2024 |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील नागरिक |
उद्देश | व्यवसायासाठी आर्थिक मदत देणे |
लाभ | एक लाख रुपयांपर्यंत |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
Vasantrao Naik Karj Yojana 2024
Vasantrao Naik Karj Yojana 2024 ची मुख्य उद्दिष्टे
1. महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
2. राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध हव्यात या दृष्टिकोनातून हे कर्ज दिले जाते.
3. महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या कमी करणे.
4. विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील घटकांची आर्थिक परिस्थिती सुधारणे.
5. महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या विशेष मागास प्रवर्ग घटकात मोडतात या प्रवर्गातील व्यक्तींचा आर्थिक दृष्ट्या विकास करणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.
6. विमुक्त जाती व भटक्या जमाती मधील तरुणांना व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणे व त्यांना आर्थिक पाठबळ देणे.
7. राज्यातील औद्योगिक दृष्ट्या विकास करणे व तरुणांच्या हाताला काम देणे.
वसंतराव नाईक कर्ज योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
● वसंतराव नाईक कर्ज योजना ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
● या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.
● Vasantrao Naik Karj Yojana 2024 या योजनेची सर्व प्रक्रियेही ऑनलाईन असल्यामुळे या योजनेमध्ये अत्यंत पारदर्शकता आढळून येते.
शासनच्या इतर योजना पहा
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना | असा करा अर्ज
Annasaheb patil karj yojana 2024
Vasantrao Naik Karj Yojana 2024 योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता
1. अर्जदार व्यक्ती हा विमुक्त जाती व भटक्यात जमाती या विशेष मागास प्रवर्गातील असावा.
2. अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
3. अर्जदार व्यक्तीचे वय हे 18 ते 55 वर्ष दरम्यान असावे.
4. अर्जदार व्यक्तीने या अगोदर या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतलेले नसावे.
सदरील योजनेच्या नियम व अटी
Vasantrao Naik Karj Yojana 2024 योजनाही फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे.
● महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
● अर्जदार व्यक्तींनी या आधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
● अर्जदार व्यक्तीची कोणत्याही शासकीय सेवेत नसावी.
● अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
● वसंतराव नाईक योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला 75 हजार रुपये पहिला हप्ता दिला जाईल. व त्यानंतर दुसरा हप्ता हा प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर साधारण तीन महिन्याच्या कालावधीनंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणीनंतर 25 हजार रुपये खात्यावर जमा करण्यात येईल.
● अर्जदार लाभार्थी व्यक्तीला फक्त महाराष्ट्रातच उद्योग सुरू करता येईल.
● नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थ्याला जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रकमेवर दसादशे 4% व्याज आकारण्यात येईल.
● अर्जदार व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला एकदाच लाभ घेता येईल.
● सदर योजनेसाठी दोन जामीनदार असणे ही आवश्यक आहे त्यापैकी एक शासकीय व निमशासकीय जामीनदार असावा.
● अर्जदार लाभार्थ्याने स्थापन केलेल्या व्यवसायाचा विमास व खर्च आणि उतरवणे आवश्यक राहील व त्या विम्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक राहील.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. रहिवासी दाखला
3. डोमासाईल
4. कुटुंबाचे रेशन कार्ड
5. पॅन कार्ड आवश्यक
6. जातीचा दाखला
7. जन्माचा दाखला
8. मोबाईल नंबर
9. ई-मेल आयडी
10. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
11. स्वयंघोषणापत्र
12. बँक खाते
13. व्यवसायाचे कोटेशन
सदरील योजने अंतर्गत या व्यवसायांना कर्ज दिले जाते
1. मत्स्य व्यवसाय
2. कृषी क्लिनिक
3. पॉवर टिलर
4. हार्डवेअर व पेंट शॉप
5. सायबर कॅफे
6. संगणक प्रशिक्षण केंद्र
7. झेरॉक्स सेंटर
8. स्टेशनरीचे दुकान
9. सलून
10. ब्युटी पार्लर
11. मसाल्याचे उद्योग
12. मसाला मिरची कांडप व्यवसाय
13. वडापाव विक्री केंद्र
14. भाजी विक्री केंद्र
15. रिक्षा खरेदीसाठी
16. स्वीट मार्ट
17. ड्राय क्लीनिंग सेंटर
18. हॉटेल
19. टायपिंग इन्स्टिट्यूट
20. ऑटो रिपेरिंग
21. वर्कशॉप
22. गॅरेज
23. मोबाईल शॉपी
24. फ्रिज दुरुस्ती
25. एसी दुरुस्ती
26. चिकन व मटन शॉप
27. इलेक्ट्रिक शॉप
28. आईस्क्रीम शॉप
29. भाजीपाला विक्री केंद्र
30. फळ विक्री केंद्र
31. किराणा दुकान
32. अशा लघु व्यवसायासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
सरकारी योजनेसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही संपूर्ण ऑनलाइन आहे.
● अर्जदाराला अर्ज करण्यासाठी या योजनेमध्ये महत्त्वाचे सहा टप्पे दिलेले आहेत.
पहिला टप्पा –
यामध्ये अर्जदाराला स्वतःची वैयक्तिक माहिती भरायचे आहे व सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.
दुसरा टप्पा –
पहिला टप्पा भरून झाल्यानंतर अर्जदाराला पत्त्याचा तपशील म्हणून सर्व माहिती भरायचे आहे, त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे.
तिसरा टप्पा –
तिसऱ्या टप्प्यामध्ये अर्जदाराला उत्पन्न व्यवसाय व बँक तपशील भरून द्यायचा आहे.
चौथा टप्पा –
अर्जदाराला आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
पाचवा टप्पा –
पाचव्या टप्प्यामध्ये अर्जदाराला घोषणापत्र भरायचे आहे.
अशाप्रकारे वसंतराव नाईक कर्ज योजनेचा अर्ज भरला जाईल. व त्यानंतर तुम्ही डाऊनलोड या बटणावर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरलेली पावती घेऊ शकता.
शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
योजनेसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
सारांश –
Vasantrao Naik Karj Yojana 2024 योजनेसाठी अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन घरबसल्या अर्ज करू शकता, व तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी व व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज मिळवू शकता, माहिती उपयुक्त वाटल्यास इतरांना देखील शेअर करा.