Tractor Anudan Yojana 2024 शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर

Tractor Anudan Yojana 2024 शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर

Tractor Anudan Yojana 2024 : भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषिप्रधान देशांमध्ये सर्वाधिक क्षेत्र हे शेतीने व्यापलेला आहे. परंतु या क्षेत्राचा विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात, शेतकऱ्यांनी शेतीच्या उद्योगातून आर्थिक विकास साधावा व पारंपारिक शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करावी, या उद्देशाने ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र शासनाने राबवलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान दिले जाते.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुलभ पद्धतीने शेती करता यावी, व शेतीचे काम जलद गतीने व्हावे आणि त्यांच्या शेतीतील उत्पन्न अधिक वाढून आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने एक योजना सुरू केली आहे, या योजनेचे नाव म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना आहे. ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 8HP ते 70HP ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी 50% म्हणजेच जास्तीत जास्त 1.25 लाख रुपयांच्या अनुदान देण्यात येते.

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेले शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात पैसा नसतो, त्यामुळे हे शेतकरी वर्षानुवर्ष पारंपरिक पारंपरिक पद्धतीने शेती करतात. त्यामुळे शेतीमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते व उत्पन्न कमी प्रमाणात मिळते. राज्यातील बहुतांश शेतकरी हे मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळी भागामध्ये शेती करतात, अशा शेतकऱ्यांना यंत्रसामग्री करण्यासाठी पैसा उपलब्ध नसतो, त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होऊन आत्महत्या सारखे प्रकार घडतात, हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कसा करायचा, लाभार्थी, पात्रता या सर्व विषयावरती माहिती घेणार आहोत त्यामुळे वाचकांनी लेख हा शेवटपर्यंत वाचावा.

Tractor Anudan Yojana 2024
Tractor Anudan Yojana 2024

Tractor Anudan Yojana 2024 Highlight

योजनेचे नाव Tractor Anudan Yojana 2024
उद्देश शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे
लाभ 1.25 लाखाचे अनुदान दिले जाते
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन व ऑफलाईन

 

Tractor Anudan Yojana 2024 मुख्य उद्दिष्टे

● राज्यातील आर्थिक दृष्ट्या जे शेतकरी गरीब आहेत, अशा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कार्यासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% म्हणजे 1.25 लाख रुपये अनुदान उपलब्ध करून देणे ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
● महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती न करता आधुनिक साधनसामग्रीचा उपयोग करून आधुनिक पद्धतीने शेती करावी व शेतीमधील उत्पन्न हे वाढवावे हे देखील या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
● आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीची कामे जलद गतीने व्हावे, शेतकऱ्यांना शारीरिक कष्टाची कामे करण्याची वेळ येऊ नये.
● ज्या शेतकऱ्यांकडे आधुनिक साधने घेण्यासाठी पैसे नाहीत अशा शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात पैसे पुरवणे व शेती आधुनिक पद्धतीने करून त्यांचे उत्पादन वाढवणे.
● शेतीची कामे जलगतिने करून शेतकऱ्यांचा पैसा व वेळ या दोन्ही गोष्टींची बचत करून शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन वाढवणे हे देखील शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Tractor Anudan Yojana 2024 योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

1. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ट्रॅक्टर अनुदान योजना राबवली आहे, ही एक महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना आहे.
2. ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी 8HP ते 70HP पर्यंत ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान म्हणजेच 1 लाख 25 हजार रुपये अनुदान दिले जाते.
3. महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकरी या योजनेला अर्ज करू शकतात.
4. या योजनेमध्ये केंद्र शासनाचा 60% सहभाग आणि राज्य शासनाच्या 40% सहभाग आहे.
5. या योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटीचे साह्याने जमा करण्यात येते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार या योजनेमध्ये आढळून येत नाही.
6. सदर योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप सोयीस्कर आहे.

Tractor Anudan Yojana 2024 नियम व अटी

● जरी या योजनेअंतर्गत 50% इतके अनुदान दे असले तरीसुद्धा 1.25 लाखापेक्षा जास्त अनुदान देण्यात येत नाही.
● सदर योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच दिला जातो.
● जे महाराष्ट्र बाहेरील शेतकरी असतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
● फक्त राज्यातील शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ दिला जातो.
● अर्जदार शेतकऱ्याकडे शेती करण्यासाठी स्वतःची जमीन आवश्यक आहे.
● अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळवलेला नसावा.
● अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकरी असल्यास शेतकऱ्यांना जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
● जर एखाद्या शेतकऱ्याने एखाद्या घटकासाठी अर्ज केल्यास पुढील दहा वर्षात त्याला त्याच घटकासाठी अर्ज करता येणार नाही, परंतु तो शेतकरी इतर घटकांसाठी अर्ज करू शकतो.

शासनाच्या इतर योजना पहा 

1. शेतकर्यांना मिळणार 4 लाख अनुदान  मागेल त्याला विहिर अनुदान योजना  
2. शिक्षण घेण्यासाठी शासन देत आहे सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप पहा संपूर्ण माहीती 

 

Tractor Anudan Yojana 2024 योजनेतून दिले जाणारे अनुदान

● ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान म्हणजेच 1.25 लाख रुपयांचे आर्थिक अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येते.
● सदर योजनेच्या माध्यमातून 8HP ते 20HP पर्यंत असलेल्या ट्रॅक्टर साठी 40% म्हणजेच 75 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.
● तसेच 20HP ते 40HP पर्यंत ट्रॅक्टर साठी 1 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते.
● जर ट्रॅक्टर हा 40HP पेक्षा जास्त व 70HP पर्यंत असेल तर हे अनुदान 1 लाख 25 हजार रुपये असेल.

सरकारी योजनेसाठी व्हाट्सअप ग्रुप join करा 

Tractor Anudan Yojana 2024 आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे

1. आधार कार्ड
2. कुटुंबाचे रेशन कार्ड
3. रहिवासी प्रमाणपत्र
4. सातबारा उतारा (7/12)
5. 8 अ उतारा
6. मोबाईल नंबर
7. ईमेल आयडी
8. पासपोर्ट आकाराचे फोटो
9. जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
10. प्रतिज्ञापत्र
11. इत्यादी

Tractor Anudan Yojana 2024 योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

अर्जदार शेतकऱ्याला हा ऑनलाईन अर्ज करताना प्रमुख तीन टप्प्यांमधून माहिती भरावी लागते.

पहिला टप्पा

● अर्जदार शेतकऱ्याला सर्वप्रथम शासनाच्या या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
● होमपेज वर गेल्यानंतर शेतकऱ्याला नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करावे लागेल.
● आता पुढे एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
● माहिती भरून झाल्यानंतर रजिस्टर वर क्लिक करावे लागेल.
● अशा प्रकारे तुमचा नोंदणी करण्याचा पहिला टप्पा पूर्ण होईल.

दुसरा टप्पा

● अर्जदाराला आपला User Name आणि Password टाकून नवीन लॉगिन करावे लागेल.

तिसरा टप्पा

● आता अर्जदाराला होम पेजवर गेल्यावर कृषी विभागात जावे व कृषी विभागात ट्रॅक्टर अनुदान योजना वरती क्लिक करावे लागेल.
● आता तुमच्यासमोर नवीन अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली माहिती सविस्तर भरून योग्य कागदपत्रे अपलोड करून शेवटी सबमिट या बटणावर क्लिक करावे.
● अशाप्रकारे तुम्ही ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
● तुम्हाला स्वतः अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही जवळच्या महा-ई-सेवा केंद्रामध्ये किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरू शकता.

शासनाचे अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
सरकारी योजनेसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

सारांश

अशाप्रकारे तुम्ही सर्व वरील माहिती वाचून ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज भरू शकता, तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आम्ही नक्की त्याचे उत्तर देऊ, माहिती आवडली असल्यास इतरांना देखील शेअर करा, तसेच या योजनेबद्दल तुम्ही इतरांना देखील माहिती देऊ शकता.

Leave a Comment