ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र शेतकऱ्यांना मिळत आहे 80% अनुदान | असा करा अर्ज

ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र शेतकऱ्यांना मिळत आहे 80% अनुदान | असा करा अर्ज

ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात, यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे ठिबक सिंचन योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान देण्यात येते फक्त उर्वरित 20% खर्च हा शेतकऱ्यांना करायचा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये ठिबक सिंचन सुविधा ही उपलब्ध व्हावी व त्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडत असतो, उदाहरणार्थ मराठवाडा, विदर्भ यामधील काही जिल्हे हे दुष्काळग्रस्त आहेत, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील देखील काही तालुके हे दुष्काळग्रस्त असल्यामुळे पाण्याची कमतरता भासून येते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पाणी हे खूप जपून वापरावे लागते. पाण्याचा अतिरिक्त वापर होऊ नये म्हणून प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा व पाण्याची बचत करावी यासाठी महाराष्ट्र शासनाने ठिबक सिंचन योजना सुरू केली आहे.

राज्यातील बहुतांश शेतकरी हे वर्षानुवर्ष व पिढ्यानपिढ्या पारंपारिक शेती करत आहेत. परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेक अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यामुळे शेतामध्ये देखील या यंत्रांचा वापर करून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येते. त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर कसा टाळता येतो, आणि त्याच्या माध्यमातून उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करून जास्तीत जास्त पिकांना सूक्ष्म सिंचन उपलब्ध करून देऊन पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा अपव्यय थांबवता येईल व उत्पादन क्षमता ही वाढवता येईल.

आज आपण या लेखांमधून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजना विषयी संपूर्ण माहिती देणार आहोत. ठिबक सिंचन योजनेसाठी किती अनुदान दिले जाते.? कागदपत्रे कोणती लागतात.? कोणते शेतकरी पात्र असणार आहेत.? अर्ज कुठे करायचा व कसा करायचा.? याची संपूर्ण माहिती या लेखांमधून पाहणार आहोत त्यामुळे वाचकांनी लेख हा शेवटपर्यंत वाचावा.

वाचकांना विनंती

शासनाच्या माध्यमातून ठिबक सिंचन योजनेमध्ये काही वेळा बदलही केले जातात, त्यामुळे या योजनेचा लाभ घेत असताना शेतकऱ्यांनी योजना तपासून पाहणे आवश्यक राहील. तसेच आम्ही आमच्या वेब पोर्टल वरती प्रत्येक योजनेचे अपडेट देतच राहतो त्यामुळे लाभ घेत असताना अपडेट माहिती पहावी.

ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र
ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र

ठिबक सिंचन योजना थोडक्यात आढावा Highlight

योजनेचे नाव ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र 
द्वारे सुरू राज्य शासन
उद्देश पाण्याचा अतिरिक्त वापर टाळणे व सूक्ष्म पिकांच्या मुळापर्यंत पाणी पोहोचवने
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
लाभ सिंचन बसवण्यासाठी 80 टक्के अनुदान
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन

 

प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना मुख्य उद्दिष्टे

● महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये ठिबक बसवण्यासाठी आर्थिक अनुदान देणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
● राज्यातील अनेक शेतकरी हे आज देखील पाठाने पिकांना पाणी देतात, त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर होतो हा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देऊन पाण्याची बचत करणे हा शासनाचा उद्देश आहे.
● अनेक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन विकत घेण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे त्यांना बाहेरून व्याजाने पैसे काढावे लागतात, त्यामुळे शेतकऱ्यांना बाहेरून पैसे घेण्याची वेळ येऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या योजनेसाठी अनुदान दिले जाते.

प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना चे मुख्य वैशिष्ट्ये

1. ठिबक सिंचन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून चालवली जाणारी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे.
2. ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र ही योजना मुंबई व मुंबई उपनगर उघडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी राबविण्यात आलेले आहे.
3. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज कराव्या लागतात त्यामुळे शेतकऱ्यांना घरी बसून मोबाईलच्या माध्यमातून देखील या योजनेसाठी अर्ज करता येतात.
4. ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र या योजनेमध्ये कागदपत्रांच्या अटी देखील कमी ठेवण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सहज या योजनेचा लाभ मिळू शकतो.
5. ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र या योजनेची मिळणारी रक्कम ही डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा होते.
6. ठिबक सिंचन योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे.

आर्थिक अनुदान

● ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक बसवण्यासाठी 80 टक्के अनुदान देण्यात येते.
● अल्पभूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदान+25℅ पूरक अनुदान असे एकूण 80 टक्के अनुदान देण्यात येते.
● इतर शेतकऱ्यांसाठी 45℅+ 30 टक्के पूरक अनुदान म्हणजे एकूण 75 टक्के अनुदान देण्यात येते.

ठिबक सिंचन योजनेचा फायदा

● राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये ठिबक सिंचन बसवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक अनुदान देण्यात येते.
● शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी अतिरिक्त पाण्याचा वापर कमी होईल व शेतकऱ्यांना देखील शारीरिक कष्ट करण्याची आवश्यकता भासणार नाही.
● पाण्याअभावी होणारे पिकांचे नुकसान हे टाळता येणार आहे.
● शेती क्षेत्राचा विकास होऊन उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
● शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे दर्जेदार पिक घेता येईल.
● राज्यातील बेरोजगारी तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे राज्यातील अनेक तरुण शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील.
● शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल.

शासनाच्या इतर योजना पहा 

राज्यातील 65 वर्षावरील गरीब कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेची सुरुवात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे अर्ज करण्यासाठी क्लिक करा. 

महाराष्ट्र राज्यातील लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांना व बालकांना 10 लाख रुपये आर्थिक मदत पहा सविस्तर माहीती 

ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र योजनेच्या नियम व अटी

● ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र चा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिला जातो.
● महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शेती असणारे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
● शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
● सातबारा उतारा (7/12) व 8 अ प्रमाणपत्र ही शेतकऱ्यांकडे असणे गरजेचे आहे.
● शेतकऱ्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला असेल तर परत शेतकऱ्यांना लाभ घेता येणार नाही.
● शेतकरी हा एससी व एसटी या प्रवर्गातील असेल तर त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र ही आवश्यक राहील.
● ठिबक सिंचन योजनेचा अर्ज शेतकऱ्यांना ऑनलाइन पोर्टल वरतीच करावा लागेल.
● सामूहिक सिंचनाचे सुविधा उपलब्ध असल्यास इतर संबंधित करार पत्र शेतकऱ्यांना जोडावे लागतील.
● एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल.

ठिबक सिंचन योजनेसाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे

1. आधार कार्ड
2. रहिवासी प्रमाणपत्र
3. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
4. जमिनीचा 7/12 (सातबारा उतारा) व 8 अ
5. मागील तीन महिन्याचे वीज बिल
6. खरेदी केलेल्या ठिबक सिंचनाचे बिल
7. पूर्व संमती पत्र
8. बँक खात्याचा तपशील
9. मोबाईल नंबर
10. ईमेल आयडी

ठिबक सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

● अर्जदार शेतकऱ्याला सर्वप्रथम शासनाच्या या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
● वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी या ऑप्शन वरती क्लिक करून Longin आयडी बनवून घ्यावी लागेल.
● आता पुढे तुम्हाला तुमचे User name आणि Password टाकून लॉगिन करायचे आहे.
● त्यानंतर सिंचन साधने व सुविधा या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
● आता परत तुमच्यासमोर एक सिंचन साधने व सुविधेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून घ्यायची आहे.
● भरलेली माहिती व्यवस्थित बरोबर आहे की नाही हे तपासून जतन करा या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
● अशाप्रकारे तुमचा ऑनलाईन अर्ज भरला जाईल. ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र

शासनाचे अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी Whatsapp जॉईन करा

 

सारांश :

अशाप्रकारे तुम्ही ठिबक सिंचन योजना महाराष्ट्र या योजनेसाठी वरील माहिती वाचून अर्ज करू शकता, अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचे उत्तर देऊ, माहिती आवडली असल्यास तुमच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती द्यावी, व हे आर्टिकल इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करावे.

Leave a Comment