स्वाधार योजना संपूर्ण मराठी माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2024-25 असा करा अर्ज

स्वाधार योजना संपूर्ण मराठी माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2024-25 असा करा अर्ज

स्वाधार योजना : महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी राज्य शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेले आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्याला वार्षिक 51 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता अकरावी व इयत्ता बारावी मध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना पात्रता असून देखील शासकीय वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध होत नाही किंवा त्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना अमलात आणलेली आहे.

राज्यामध्ये आणि कुटुंब हे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत. अनेक विद्यार्थ्यांची शिकण्याची इच्छा असून देखील त्यांना शिक्षण घेण्यास मिळत नाही. इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर 11वी च्या व 12वी च्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी जाऊन राहावे लागते, त्यासाठी भोजनाचा खर्च, वस्तीग्रहाचा खर्च हा वाढला जातो. तो खर्च त्यांच्या कुटुंबांना झेपत नाही त्यामुळे शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील नवबौद्ध व एससी एसटी या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते.

दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय उपलब्ध नसते, त्यामुळे विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील महाविद्यालय शिक्षणासाठी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी स्वतःच्या घरापासून कुठेतरी दूर शहरात जाऊन राहावे लागते. शिक्षण पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या शहरात वास्तव्य करावे लागते, अशा विद्यार्थ्यांची वाढती संख्या व अपुरे शासकीय वस्तीगृह यामुळे बहुत अंश विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी इतरत्र ठिकाणी रूम घेऊन राहण्याची सोय करावी लागते. परंतु राज्यातील अनेक कुटुंब हे आर्थिक दृष्ट्या मागासलेले असल्याने हा खर्च त्या कुटुंबांना परवडत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण देखील सोडावे लागते, अशा सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून शासनाने इयत्ता 11वी व त्यापुढील शिक्षण तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ दिला जातो.

गेल्या काही वर्षांमध्ये व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेले आहेत त्यामुळे शासकीय वस्तीगृहांची सुविधा प्रत्येक विद्यार्थ्याला उपलब्ध होत नाही त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वास्तव्य करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थ्यांना तात्काळ वस्तीग्रह सुरू करून तेथे प्रवेश देणे जागेची उपलब्ध व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता शासनाला त्वरित प्रवेश देता येत नाही. त्यामुळे दहावी मध्ये 60% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना थेट आर्थिक स्वरूपात स्वाधार योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.

वाचकांना विनंती

स्वाधार योजनेही शासनाच्या माध्यमातून चालवली जाणारी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध तरुणांसाठी ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचे फॉर्म भरण्याची तारीख ही प्रत्येक वर्षी वेगवेगळे बदलत असते, तसेच योजनेमध्ये ही काही प्रमाणात बदलही केले जातात. त्यामुळे योजनेचा लाभ घेत असताना अपडेट माहिती पाहणे विद्यार्थ्यांनी गरजेचे आहे. स्वाधार योजना

स्वाधार योजना
स्वाधार योजना

स्वाधार योजना आढावा Overview

योजनेचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
द्वारा सुरू महाराष्ट्र शासन
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमाती मधील विद्यार्थी
उद्देश शिक्षणासाठी आर्थिक स्वरूपाची मदत
विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन

 

स्वाधार योजनेचे मुख्य उद्दिष्टे

● महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना 11वी व 12वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवासी भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
● आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
● ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे.
● स्वाधार योजनेच्या माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वस्तीगृह तसेच भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून देऊन त्यांना शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येऊ नये या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

स्वाधार योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही योजना महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण विभागातून चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे.
2. महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैसे नाहीत अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या माध्यमातून 51 हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते.
3. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्या चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतील व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. स्वाधार योजना
4. योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी रक्कम ही विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था व वसतिगृहाची सुविधा उपलब्ध होईल,
5. योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे आर्थिक सहाय्य विद्यार्थ्याच्या थेट बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा होते.

शासनाच्या इतर योजना पहा 

  1. मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेमध्ये महिलांना 100% अनुदान दिले जाते, असा करा अर्ज 
  2. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी सायकल वाटप योजना सुरू केली आहे, तुम्हीही असा करा अर्ज 

योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम

घटक मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अनुदान महसूल विभागीय शहर व क वर्ग मनपा शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उर्वरित शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक अनुदान
भोजन भत्ता 32000/- रुपये 28000/- रुपये 25000/- रुपये
निवासी भत्ता 20000/- रुपये 15000/- रुपये 12000/- रुपये
निर्वाह भत्ता 8000/- हजार 8000/- हजार 6000/- हजार
एकूण 60000/- रुपये 51000/- रुपये 43000/- रुपये

 

वरील दिलेल्या तक्त्याप्रमाणे वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येते.

स्वाधार योजनेच्या नियम व अटी शर्ती

● फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो.
● महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
● राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध तरुणांना स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो अन्य कॅटेगिरीतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
● विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी मध्ये किमान 60 टक्के गुण घेणे आवश्यक राहील.
● विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या अभ्यासक्रमाचा कालावधी हा किमान दोन वर्षाचा असावा, दोन वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या अभ्यासक्रमाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
● अर्जदार विद्यार्थी हा शिक्षण घेण्यासाठी स्वतःचे शहर सोडून दुसऱ्या शहरात वास्तव्य करणारा असावा.
● मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षी किमान 60% गुण मिळवणे अनिवार्य आहे अन्यथा या योजनेस अपात्र राहील. स्वाधार योजना

स्वाधार योजनेसाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे

1. आधार कार्ड
2. जातीच्या दाखल्याचे प्रमाणपत्र
3. अर्जदाराचे पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
4. बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स
5. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
6. बोनाफाईड
7. मोबाईल नंबर
8. ईमेल आयडी
9. शेवटच्या शिकलेल्या वर्गाचा शाळा सोडल्याचा दाखला
10. शपथपत्र/हमीपत्र
11. मागील वर्षाच्या निकालाची प्रत

स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

● स्वाधार योजनासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करता येतात.

ऑफलाइन प्रक्रीया

● अर्जदार विद्यार्थ्याला सर्वात प्रथम आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जावे लागेल.
● समाज कल्याण कार्यालयात जाऊन स्वाधार योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेले सर्व माहिती भरून आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावे लागतील व तो अर्ज त्याच कार्यालयात जमा करावे लागेल.
● अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील स्वाधार योजनेसाठी अर्ज करू शकता.

ऑनलाइन प्रक्रिया :

● अर्जदार विद्यार्थ्याला सर्वप्रथम शासनाच्या या अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे.
● सदरील वेबसाईट वरती जाऊन नवीन युजरनेम आणि पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. ( नोंदणी करणे)

● त्यानंतर सदरच्या वेबसाईट वरती जाऊन आवश्यक माहिती भरून व आवश्यक लागणारी कागदपत्रे देखील सदरील वेबसाईट वरती अपलोड करावे लागतील.
● संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर शेवटी सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.
● अशाप्रकारे तुमचा स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरला जाईल.

स्वाधार योजना फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारी योजनेची माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी  येथे क्लिक करा

 

सारांश :

अशाप्रकारे तुम्ही वरील माहिती सर्व वाचून स्वाधार योजनेसाठी अर्ज करू शकता, अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही नक्की त्याचे उत्तर देऊ, माहिती आवडली असल्यास इतर विद्यार्थ्यांना देखील ही माहिती शेअर करा.

Leave a Comment