सुकन्या समृद्धी योजना 2024 : तुमच्याही मुलींच्या नावावर भरा पैसे पहा संपूर्ण योजना…
सुकन्या समृद्धी योजना 2024 : देशातील मुलींच्या शिक्षणासाठी, तसेच आरोग्यासाठी व भविष्यात मुलींच्या लग्नाचा विचार करून केंद्र सरकारच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजना राबवली आहे. सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या पालकांना मुलीच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आणि लग्नासाठी पैसे जमा करण्यासाठी योजना प्रोत्साहन देते, तसेच ही योजना विशेष करून मुलींसाठी सुरू केली गेली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली ही योजना कमी गुंतवणुकीची एक बचत योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्माला आल्यापासून ती दहा वर्षाची होईपर्यंत आपल्या क्षेत्रातल्या कुठल्याही राष्ट्रीय बँकेत किंवा पोस्ट कार्यालयात जाऊन मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात येते.
सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी हा 21 वर्षापर्यंत निर्धारित केला आहे. त्यामुळे खाते सुरू झाल्यापासून मुलीचे एकूण वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व व्याजासह मुलीच्या पालकांना दिली जाते. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलीच्या शिक्षणासाठी तसेच मुलगी एखादा आजाराने जर त्रस्त असेल तर तिच्या उपचारासाठी या योजनेतून 50% रक्कम काढता येते, उर्वरित रक्कम ही मुलीचे वय 21 वर्षे झाल्यानंतर काढता येते. सुकन्या समृद्धी योजना 2024 या योजनेचा कालावधी जरी 21 वर्ष असला तरी मुलींच्या पालकांना मुलीचे वय 14 वर्षे होईपर्यंतच खात्यात पैसे भरायची गरज आहे. त्यानंतर 15 ते 21 वर्षापर्यंत खात्यावर कोणत्याही प्रकारे पैसे भरण्याची आवश्यकता भासत नाही.
योजनेच्या अंतर्गत बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये दरवर्षी सुकन्या समृद्धीत खात्यामध्ये किमान 250/- रुपये किंवा जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येते, खाते उघडल्यानंतर मुलीचे 21 वर्षे वय पूर्ण होईपर्यंत जेव्हा मुलीला मॅच्युरिटी येते तेव्हा संपूर्ण व्याजदराने रक्कम मुलीच्या आई-वडिलांना दिली जाते, त्याचा उपयोग मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच मुलीच्या लग्नासाठी केला जाऊ शकतो, त्यामुळे मुलगी मोठी झाल्यानंतर पालकांना मुलीच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता करण्याची आवश्यकता भासणार नाही.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आयुर्विमा महामंडळ मार्फत राबवल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजना अंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून फक्त 100/- रुपये प्रतिवर्षी हप्ता जमा करून सदर मुलीच्या पालकांचा विमा उतरवला जातो, ज्यामुळे पालकाचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास लाभार्थ्यांच्या वारसाला 30 हजार ते 75 हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते. सदर योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की, राज्यातील मुलींचे आरोग्य त्यांचे शिक्षण, त्यांचे लग्न व भविष्य सुरक्षित व्हावे व महिलांना आत्मनिर्भर आणि सशक्त बनवणे, या दृष्टिकोनातून ही योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी कोणत्या मुली पात्र आहेत.? कोण अर्ज करू शकते.? अर्ज कुठे करायचा.? याची संपूर्ण माहिती या लेखांमधून पाहणार आहोत लेख शेवटपर्यंत वाचावा.
सुकन्या समृद्धी योजना 2024 Highlight
योजनेचे नाव | सुकन्या समृद्धी योजना |
लाभार्थी | देशातील सर्व राज्यातील 10 वर्षाखालील मुली |
लाभ | आर्थिक सहाय्य देने |
उद्देश | मुलींचे भविष्य उज्वल बनवणे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
सुकन्या समृद्धी योजना 2024 मुख्य उद्दिष्टे
● देशातील मुलींचे शिक्षण, आरोग्य, मुलींचे लग्न तसेच मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजना अमलात आणली आहे.
● देशातील मुलींचे प्रमाण वाढावे व देशातून मुलीनी आत्मनिर्भर बनावे या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.
● देशातील मुलींच्या पूर्ण हत्या थांबवणे हा देखील या योजना मागचा मुख्य उद्देश आहे.
● मुलगी जन्माला आल्यानंतर प्रत्येक मुलीच्या पालकांनी आनंदोत्सव साजरा करावा हा देखील या योजनेमागचा हेतू आहे.
● देशामध्ये महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा व मुलींच्या जन्मानंतर नकारात्मक विचार करू नये मुलींबद्दल सकारात्मक विचार वाढावे हा दृष्टिकोन समोर ठेवून ह्या योजनेची सुरुवात केली आहे.
सुकन्या समृद्धी योजना 2024 योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
1. सुकन्या समृद्धी योजना 2024 ही केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली योजना आहे. तसेच या योजनेला भारत सरकारचे पाठबळ असल्यामुळे या योजनेत पालकांना कुठलीच काळजी करण्याची आवश्यकता भासत नाही.
2. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून पालकांना आपल्या मुलींचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकेत तसेच पोस्ट कार्यालयात खोलता येते, तसेच एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा एका पोस्ट खात्यातून दुसऱ्या पोस्ट खात्यात ते खाते ट्रान्सफर देखील करता येते.
3. मुलींच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी तसेच मुलींच्या भविष्यात लग्नासाठी ही योजना पालकांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे.
4. सुकन्या समृद्धी योजना 2024 ही भारत सरकारची योजना असल्यामुळे यामध्ये 100% विश्वासहार्यता आहे.
5. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आतापर्यंत लाखो पालकानी आपल्या मुलीचीं खाती उघडली आहेत, व लाखो पालकांनी योजनेचा लाभ देखील घेतला आहे.
शासनाच्या इतर योजना पहा
- तुमच्या शेतामध्ये मोबाईलच्या साह्याने ई -पिक पाहणी करा, पिक पाहणी करण्यासाठी क्लिक करा
- प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ही 1 मे 2016 पासून देशभरातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. अर्ज करण्यासाठी क्लिक करा
सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी
● सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पालकांनी मुलीचे खाते उघडल्यापासून तिचे वय 21 वर्षे होईपर्यंत मुदत ठेव कालावधी आहे. परंतु सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलींच्या पालकांना मुलगी 14 वर्षाची होईपर्यंत पैसे भरावे लागतात.
● मुलगी 14 वर्षाची झाल्यानंतर ते मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत या कालावधीमध्ये पालकांना कोणत्याही प्रकारे रक्कम भरण्याची आवश्यकता भासत नाही.
● सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जर तुम्ही दरवर्षी 5 हजार रुपये गुंतवणूक केल्यास 14 वर्षांनी 7.6% व्याजदराने चक्र व्याज व्याज पद्धतीने 1 लाख 26 हजार 607 रुपये इतकी रक्कम मिळेल, तर 21 वर्षानी एकूण 2 लाख 11 हजार 420 रुपये मिळतील. सुकन्या समृद्धी योजना 2024
सुकन्या समृद्धी योजनेतील महत्त्वाच्या बाबी
● सुकन्या समृद्धी योजना ही फक्त दहा वर्षाखालील मुलींनाच आहे.
● सुकन्या समृद्धी योजनेमध्ये कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच लाभ घेता येतो, कुटुंबातील तिसऱ्या मुलींला या योजनेचा लाभ घेता येत नाही.
● मातेच्या जर दुसऱ्या प्रसूती दरम्यान जर जुळ्या मुलींना जन्म दिला तर अशा परिस्थितीत त्या दोन्ही जुळ्या मुलींना व पूर्वी असलेल्या मुलींना देखील सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो.
● मुलीच्या 18 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेमधून 50% रक्कम ही मुलीच्या आरोग्यासाठी किंवा शिक्षणासाठी काढता येते, परंतु उर्वरित राहिलेली रक्कम ही मुलीचे 21 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतरच काढता येते.
● मुलीच्या 21 वर्षानंतर सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत झालेली संपूर्ण रक्कम व्याजासहित पालकांच्या स्वाधीन केली जाते.
सुकन्या समृद्धी योजना 2024 योजना लाभार्थी
● प्रत्येक राज्यातील सर्व जाती धर्मातील मुली सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवू शकतात.
● तसेच अनाथ व दत्त घेतलेल्या मुलींना देखील या योजनेचा लाभ दिला जातो.
सुकन्या समृद्धी योजनेची मुख्य फायदे
● देशातील मुलींचे भविष्य उज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून सुकन्या समृद्धी योजना ही खूप लाभदाय आहे.
● सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलींचे भविष्य सुरक्षित करता येते.
● भविष्यात मुलींना शिक्षणासाठी त्यांच्या आरोग्यासाठी तसेच त्यांचे लग्न करण्यासाठी मुलींच्या पालकांना पैशासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
● संपूर्ण देशामध्ये सर्व जाती धर्मातील मुलींना या योजनेचा लाभ मिळतो.
● सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत चक्रवाढ पद्धतीने व्याजदर मिळतो.
● सुकन्या समृद्धी योजनेची मुदत वाढ ही 21 वर्षापर्यंत जरी असली तरी पालकांना फक्त 14 वर्षापर्यंतच पैसे भरावे लागणार आहेत, 15 वर्षापासून ते 21 वर्षापर्यंत कोणते प्रकारचे पैसे भरण्याची पालकांना आवश्यकता नाही. सुकन्या समृद्धी योजना 2024
● सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मिळणाऱ्या पैशावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही.
● सुकन्या समृद्धी योजनेमध्ये व्याजदर हा चांगल्या प्रकारे मिळतो व सुरक्षित गुंतवणूक असल्या कारणाने अनेकांची विश्वासार्हता आहे.
सुकन्या समृद्धी योजना 2024 योजनेच्या नियम व अटी
1. सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मापासून 10 वर्षाच्या आत मध्ये सुकन्या समृद्धी खाते उघडणे आवश्यक आहे.
2. महाराष्ट्र मध्ये जर अर्ज करत असेल तर अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा लागतो.
3. मुलीचे वय दहा वर्षे झाल्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडता येत नाही.
4. देशातील फक्त मुलींनाच योजनेचा लाभ दिला जातो, मुलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
5. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये एकदा भरलेले पैसे मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत पैसे काढता येत नाहीत, परंतु 18 वर्षाची झाल्यानंतर 50% रक्कम काढता, येते व उर्वरित रक्कम ही मुलीचे 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दिली जाते.
6. लाभार्थी मुलीचा कोणत्याही कारणामुळे जर मृत्यू झाल्यास खात्यावरील जमा रक्कम मिळा जस एक मुलींच्या आई-वडिलांना देण्यात येते.
7. सुकन्या समृद्धी योजनेसाठी दरवर्षी खात्यात किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. परंतु काही कारणास्तव खात्यात पैसे जमा केले गेले नाहीत तर अशा परिस्थितीत सदर खाते बंद करण्यात येईल. व पुन्हा खाते सुरू करण्यासाठी 50 रुपये दंड आकाराला जातो व खाते पुन्हा सुरू करता येते.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1. सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज
2. आधार कार्ड
3. पॅन कार्ड
4. रेशन कार्ड
5. रहिवासी दाखला
6. मोबाईल नंबर
7. ईमेल आयडी
8. पासपोर्ट करायचे फोटो
9. मुलीच्या जन्माचा दाखला
10. इत्यादी
सुकन्या समृद्धी योजना 2024 पोस्टात खाते उघडण्याची प्रक्रिया
● सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
● कर्जत विचारलेले संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे वाचून ती भरावी लागेल व अर्जात विचारलेले कागदपत्रे सोबत जोडावे लागतील, त्यानंतर तो अर्ज पोस्ट खात्यात जमा करावा लागेल.
● अशाप्रकारे तुमच्या मुलीचा पोस्ट खात्यामधून अर्ज भरला जाईल.
सुकन्या समृद्धी योजना 2024 योजनेसाठी बँकेमधून अर्ज करण्याची प्रक्रिया
● अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम आपल्या जवळच्या राष्ट्रीय अधिकृत बँकेमध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
● अर्जात विचारलेली माहिती भरून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील व अर्ज हा बँकेमध्ये जमा करावा लागेल.
● यानंतर आपल्या अर्जाची व कागदपत्रांची संपूर्ण तपासणी केली जाईल.
● अशाप्रकारे सुकन्या समृद्धी योजनेसाठी बँकेमधून अर्ज भरला जाऊ शकतो. सुकन्या समृद्धी योजना 2024
सरकारी योजनेसाठी आमचा Whatsappa ग्रुप | जॉईन करा |
सारांश :
अशाप्रकारे तुमच्या जर कुटुंबामध्ये मुलगी जन्माला अली असेल तर सुकन्या समृद्धी योजना 2024 तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून त्या मुलीचे खाते उघडू शकता, व या योजनेचा लाभ मिळू शकता. तुम्हाला जर काही अडचण येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचे उत्तर देऊ माहिती आवडली असल्यास तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील इतरांना देखील ही माहिती शेअर करा.