ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना, शेतकऱ्यांना मिळणार 40 टक्के अनुदान पहा संपूर्ण योजना…
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना : महाराष्ट्र राज्यामध्ये उसाचे उत्पन्न तुलनेने जास्त दिसून येते; म्हणूनच महाराष्ट्र शासनाने शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांना ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी मजुरांचे आवश्यकता असते आणि वेळेवर मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे हाताशी आलेला उत्तम माल तोडता येत नाही म्हणूनच त्या शेतकऱ्याचे खूप नुकसान होते अशा प्रकारचे नुकसान होऊ नये, म्हणूनच महाराष्ट्र शासनाने ऊसतोड यंत्राची सोय करून दिली आहे. या यंत्रामुळे शेतकरी तसेच ऊस उत्पादकाला खूप फायदा होणार आहे. व्यवसायिकांना देखील या यंत्राद्वारे व्यवसाय करणे सोपे जाणार आहे. ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्याला ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी ऊस तोडणी यंत्राच्या किमतीच्या 40% अथवा 35 लाख रुपये यापैकी एक रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल.
राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी, उत्पन्न वाढीसाठी तसेच त्यांचे आर्थिक मनोबल वाढवण्यासाठी, आर्थिक पाठिंबा देण्यासाठी, राज्य शासन कायम प्रयत्नशील असते आणि म्हणूनच त्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी अनेक योजना राबवीत असते. शेतकऱ्यांना मजदूरांद्वारे ऊस तोडणी करणे शक्य नाही; कारण मजुरांना व्यवसायाच्या तसेच मजुरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांची संख्या पाहिली तर अत्यंत विरळ प्रमाणात दिसून येते. म्हणूनच शेतकऱ्याला ऊस तोडणी यंत्र घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांन बरोबरच उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेतकरी उत्पादक संस्था यांना देखील ऊस तोडणी यंत्राचा फायदा होणार आहे. ऊस तोडणी उशीर झाल्यास पिकाचे नासाडी होते व उत्पन्नामध्ये घट दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्याचे जास्त प्रमाणात नुकसान होते; असे नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासन वेळोवेळी विविध योजना राबवीत असते.
राज्यात उसाच्या क्षेत्रामध्ये व उसाच्या उत्पन्नामध्ये वर्षांवर्षी वाढ होत चाललेली आहे. व त्यासाठी जे मजूर लागतात त्यांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे साखर कारखाना सतत ऊस तोडीची समस्या होत असल्याचे व्यक्त करते. महाराष्ट्र कितीही विकासाच्या दृष्टीने चालत असला तरी राज्यात काही ठिकाणी अजून सुद्धा पारंपारिक पद्धतीने ऊस तोडणी केली जाते. परंतु आता मजुरांची संख्या कमी असल्याने जुन्या पद्धतीने ऊस तोडणी करणे शक्य नाही त्यासाठी ऊस तोडणी यंत्र घेणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन ही योजना राबवीत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक मनोबल वाढविण्यास मदत होईल.
वाचकांना विनंती
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना ही योजना शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून चालवली जाते परंतु योजनेमध्ये वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून बदल देखील केले जातात. त्यामुळे तुम्ही लाभ घेत असताना योजना तपासून पाहणे आवश्यक आहे.
ऊस तोडणी यंत्राची थोडक्यात माहिती
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या गरीब असल्यामुळे ऊस तोडी यंत्र खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी अथवा साखर कारखान्यांना ऊस तोडी यंत्र खरेदी करणे शक्य होत नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी राज्य शासन ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना राबवित आहे. या योजने संदर्भात पाहूया थोडक्यात माहिती.
योजनेचे नाव | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना |
लाभ | ऊस तोडणी यंत्राच्या किंमतीच्या 40% किंवा 35 लाख रुपये |
उद्देश | ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक अनुदान देणे |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना ची मुख्य उद्दिष्टे
● महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, उद्योजक तसेच इतर शेतकरी संस्था यांना ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक मदत देणे हा उद्देश महाराष्ट्र शासनाचा आहे.
● शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये त्यांच्या ऊसाची योग्य वेळेत तोडणी व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
● राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे तसेच त्यांना आर्थिक पाठबळ देणे.
● ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे व राज्यातील इतर शेतकऱ्यांना ऊस उत्पादनाकडे आकर्षित करणे.
● राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आवड निर्माण करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना चे मुख्य वैशिष्ट्ये
● ही योजना राज्य सरकार राबवित असल्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी, उद्योजक, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
● राज्यातील ज्या नागरिकाकडे शेती आहे तो नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
● ऊस उत्पादन घेणाऱ्या राज्यातील कोणत्याही प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.
● शेतकऱ्यांना लाभाची राशी ही शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ
● राज्यातील शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी ऊस तोडणी यंत्राच्या एकूण किमतीच्या 40% किंवा 35 लाख रुपये एवढी रक्कम या योजनेअंतर्गत अनुदान म्हणून दिली जाईल.
● ऊस उत्पादक शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत जे अनुदान दिले जाईल त्या अनुदानापैकी 60 टक्के अनुदान हे केंद्र शासनाचे असेल व 40 टक्के अनुदान हे राज्य शासनाचे असेल.
शासनाच्या इतर योजना पहा
- मुलींच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी तसेच मुलींच्या भविष्यात लग्नासाठी सुकन्या योजना ही पालकांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. आजच आपल्या मुलीच्या नावे पोस्टात उघडा पहा संपूर्ण माहीती.
- महाराष्ट्रातील जे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत, किंवा जे दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत, त्यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून व त्यांना पक्की घर बांधून देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील समाज कल्याण विभाग याद्वारे घरी बांधून दिली जातात, असा करा ऑनलाईन अर्ज
ऊस तोडणी यंत्र योजनेचे फायदे
● या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तसेच उद्योजकांना ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळेल.
● ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणी यंत्र खरेदी केल्याने शेतकऱ्यांना मनुष्यबळाचे गरज भासणार नाही.
● या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच औद्योगिक विकास होईल.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना नियम अटी व शर्ती
1. ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठीच आहे.
2. महाराष्ट्राच्या बाहेरचे वास्तव्य शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
3. अनुदानाच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांनी यंत्र खरेदी केले तर त्या लाभार्थी व्यक्तीला कारखाना परिसरातील संपूर्ण ऊस तोडणी संपेपर्यंत ऊस तोडणे बंधनकारक राहील.
4. ऊस तोडणी यंत्राची निवड करण्याचे संबंधित जबाबदारी ही साखर कारखाना अथवा अर्जदार लाभार्थ्यांची असेल.
5. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ऊस तोडणी यंत्राचा वापर फक्त महाराष्ट्र राज्यात करणे आवश्यक राहील तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना या ऊस तोडणी यंत्राचा वापर बाहेरील राज्यांमध्ये करता येणार नाही. असे आढळून आल्यास संबंधित लाभार्थ्यावरती कारवाई करून अनुदानाचे राशी वसूल केली जाईल.
6. लाभार्थी अर्जदार व्यक्तीला ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याच्या अगोदर यंत्र हाताळण्याची संपूर्ण जबाबदारी ही लाभार्थी अर्जदार व्यक्तीची असेल.
7. लाभार्थी व्यक्तीला ऊस तोडणी यंत्र खरेदी केल्यानंतर किमान सहा वर्ष ते यंत्र विकता येणार नाही. असे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
8. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी इच्छुक अर्जदार व्यक्तीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना खरेदीसाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे
1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. रहिवासी प्रमाणपत्र
3. कुटुंबाचे रेशन कार्ड
4. बँक खात्याचा तपशील
5. 7/12 (सातबारा उतारा) व 8 उतारा
6. ऊस तोडणी यंत्राचे कोटेशन
7. प्रतिज्ञापत्र पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
8. मोबाईल नंबर
9. ईमेल आयडी
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया
ऊसतोड यंत्र अनुदान योजना साठी अर्जदाराला ऑनलाइन च्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अर्जदार हा स्वतःच्या मोबाईल मधून, लॅपटॉप मधून किंवा सायबर कॅफे, महा-ई-सेवा केंद्र, इत्यादी ठिकाणी जाऊन अर्ज करू शकतो. त्यासाठी खालील प्रक्रियेचा वापर करा.
पहिली स्टेप
● अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम या शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावं लागेल.
● होमपेजवर आल्यानंतर अर्जदाराला स्वतःची नोंदणी करायची आहे.
दुसरी स्टेप
● अर्जदाराची नोंदणी झाल्यानंतर आता अर्जदाराला User name आणि Password च्या साह्याने लॉगिन करायचे आहे.
तिसरी स्टेप
● आता लॉगिन झाल्यानंतर अर्जदार शेतकऱ्याला योजना या Option वरती क्लिक करायचे आहे.
● आता अर्जदार शेतकऱ्यांसमोर नवीन एक पेज ओपन होईल त्यामध्ये अर्ज करा या Option वर क्लिक करायचे आहे.
● आता पुन्हा तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये कृषी यांत्रिकीकरणाच्या समोर बाबी निवड वर क्लिक करा.
● आता तुमच्यासमोर नवीन एक फॉर्म ओपन होईल.
● त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायचे आहे व आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
● त्यानंतर सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
● अशाप्रकारे तुमचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
शासनाचे अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सरकारी योजनेची माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी ग्रुप | जॉईन करा |
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना हेल्पलाइन क्रमांक | 022 6131 64 29 |
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा शासन निर्णय जीआर | येथे क्लिक करा |
सारांश :
अशाप्रकारे तुम्ही ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना योजनेसाठी वरील दिलेले माहिती संपूर्ण वाचून ऊस तोडणी यंत्रासाठी 40% अनुदान मिळवू शकता. अर्ज करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचे नक्की उत्तर देऊ. माहिती आवडली असल्यास तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना जरूर ही माहिती शेअर करा.