Shauchalay Yojana 2024

Shauchalay Yojana 2024 | असा करा अर्ज संपूर्ण माहिती 

Shauchalay Yojana 2024

केंद्र सरकारच्या माध्यमातून असो किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून  Shauchalay Yojana 2024 जनतेसाठी लोककल्याणकारी अनेक योजना राबवलl जातात.. त्या योजनेच्या माध्यमातून जनतेचा विकास व्हावा हाच दृष्टिकोन राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा असतो, आपल्या भारत देशामध्ये स्वच्छता निर्माण व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन ही योजना अमलात आणली गेली आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात त्यापैकीच शौचालय अनुदान योजना ही एक योजना आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला गेलं तर बहुतांश कुटुंब हे आपले जीवन दारिद्र्यरेषेखाली जगत असतात, त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी ते कुटुंब असमर्थ ठरतात, अशा कमजोर आर्थिक परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते शौचालयासाठी उघड्यावर बसताना आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे परिसरात दुर्गंधी व रोगराई, आजार पसरत असतात, या गोष्टीचा सारासार विचार करून केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र शौचालय अनुदान योजना सुरू करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे.

शौचालय अनुदान योजना अंतर्गत राज्यातील गरीब तसेच आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेली कुटुंबे शौचालय बांधण्यासाठी इच्छुक असतात परंतु आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे ते वैयक्तिक संडास बांधण्यास असमर्थ ठरतात. अशा कुटुंबांना शौचालय अनुदान योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनुदान देण्यात येते.

सदर योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते, तसेच देण्यात येणारी अनुदान रक्कम ही दोन टप्प्यात देण्यात येते. शौचालय अनुदान योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या विद्यमानाने राबविण्यात येते, यात केंद्र सरकारचा 75/- टक्के म्हणजेच 9 हजार रुपये आणि राज्य शासनाचा 25% म्हणजे 3000 रुपये वाटा असतो.

Shauchalay Yojana 2024
Shauchalay Yojana 2024

हे लक्षात घ्या Shauchalay Yojana 2024

आम्ही या लेखाच्या माध्यमातून शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र या योजनेची संपूर्ण माहिती या लेखामध्ये देत आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि योजनेचा लाभ मिळवा. तुमच्या आजूबाजूला समाजामध्ये अशी गरीब कुटुंब असतील तर या योजनेबद्दल नक्कीच त्यांना माहिती द्या.

शौचालय योजना 2024 Overview

योजनेचे नाव शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र विभाग सामाजिक सुरक्षा विभाग राज्य महाराष्ट्र द्वारा सुरू केंद्र सरकार लाभार्थी राज्यातील गरीब कुटुंब लाभ 12 हजार रुपयांचे आर्थिक साहेब अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन ऑफलाइन

शौचालय योजना महाराष्ट्र चा उद्देश

● शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाते, जेणेकरून राज्यात स्वच्छता निर्माण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

● सद्री योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागातील कुटुंबाचे राहणीमान सुधारणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहेत.

● महाराष्ट्र सारख्या सुजलम सुफलाम राज्यांमध्ये ग्रामीण भागातील काही कुटुंबामध्ये शौचालय नसल्यामुळे ते उघड्यावरती जाऊन बसतात, त्यामुळे रोगराई, दुर्गंधी, आजार यासारख्या परिणामांना सामोरे जावे लागते, त्यामुळे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

● ग्रामीण व दुर्गम भागातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन त्यांच्यामध्ये जनजागृती घडवून आणणे.

● ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा योजनेचा देखील मुख्य उद्देश आहे.

शौचालय अनुदान योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

  1. सदरील योजना ही केंद्राने राज्य सरकार यांच्या साह्याने सुरू करण्यात आलेले आहे.
  2. राज्यातील ग्रामीण भागातील जी कुटुंब शौचालय बांधण्यास इच्छुक आहेत अशा कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.
  3. सदर योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदत ही दोन टप्प्यात देण्यात येते.
  4. स्वच्छ भारत मिशन ला प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरुवात करण्यात आली आहे.
  5. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, जेणेकरून अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईलच्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करू शकतो, तसेच अर्ज करण्यापासून ते अनुदान मीळेपर्यंत आपल्या अर्जाची स्थिती वेळोवेळी जाणून घेऊ शकतात, त्यामुळे अर्जदाराला कोणत्याच सरकारी कार्यालयात फेरी मारण्याची आवश्यकता बसणार नाही.
  6. सदर योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी रक्कम ही अर्जदाराच्या बँक खात्यात डीबीटी च्या साह्याने जमा करण्यात येते.
  7. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकार द्वारा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदान देणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
  8. शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात येते.

शासनाच्या इतर महत्त्वपूर्ण योजना पहा

शौचालय अनुदान योजना या योजनेच्या फायदे

● शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12000/- रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येते.

● वैयक्तिक शौचालय बांधल्यामुळे शौचालयाला उघड्यावर जाण्याची वेळ येणार नाही. व गावात दुर्गंधी रोगराई आजारी यासारखे प्रकार घडणार नाहीत.

ग्रामीण भागामध्ये गावागावांमध्ये शौचालयाला उघड्यावर बसण्याची वेळ येणार नाही.

● नागरिकांची आजारापासून मुक्तता होईल रोगराई पसरणार नाही.

● योजनेच्या साह्याने महिलांना खुल्या वर्षाच्या जाण्याची वेळ देखील येणार नाही.

शौचालय अनुदान योजना लाभार्थी नागरिक

  1. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे
  2. अनुसूचित जाती
  3. अनुसूचित जमाती कुटुंबे
  4. लहान व अल्पभूधारक शेतकरी
  5. घरकुल असलेले भूमिहीन मजूर
  6. शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती असलेले कुटुंबे
  7. कुटुंबातील प्रमुख महिला

शौचालय अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता

● अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशासने आवश्यक आहे.
● ग्रामीण भागातील कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत.
● दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे या योजनेसाठी पात्र आहेत.

शौचालय अनुदान योजना मिळवण्यासाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. उत्पन्नाचा दाखला
  4. मोबाईल नंबर
  5. ई-मेल आयडी
  6. बँक खात्याची पासबुक झेरॉक्स
  7. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो

शौचालय अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

ऑनलाइन प्रक्रिया –

● अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम शासनाच्या या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

● अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यासाठी अर्जदाराला स्वतःचा मोबाईल नंबर, नाव, पत्ता, राज्य, कॅपच्या टाकून Submit या बटणावर क्लिक करायचे आहे.

● रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून Sign In करायचे आहे.

● Login केल्यावर तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड बदलण्याचे ऑप्शन येईल. आता तुम्हाला जुना पासवर्ड बदलून नवीन पासवर्ड टाकायचा आहे.

● आता त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन फेसबुक ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला New Application या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

● आता पुढे तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल, त्यामध्ये विचारलेले सर्व वैयक्तिक माहिती, पत्ता, तसेच तुमच्या बँकेची माहिती इत्यादी माहिती योग्य प्रकारे अचूकपणे भरायचे आहे, सर्व माहिती भरून झाल्यानंतर Apply या बटणावरती क्लिक करायचे आहे.

● अशा पद्धतीने तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

ऑफलाइन प्रक्रिया –

● अर्जदार व्यक्तीला सर्वात प्रथम आपल्या जवळच्या ग्रामपंचायती कार्यालयात जावे लागेल व शौचालय अनुदानाचा अर्ज घ्यावा लागेल.

● अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून व त्यासोबत विचारलेले सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा.

● ग्रामपंचायत द्वारे तुमच्या अर्जाची तसेच कागदपत्रांची छाननी करून तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाईल.

सरकारी योजनेची माहिती मिळवण्यासाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

सरकारची अधिकृत वेबसाईट

सारांश –

अशा पद्धतीने शौचालय अनुदान महाराष्ट्र योजनेचे सर्व माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे तसेच तुम्हाला या संबंधी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा 24 तासाच्या आत मध्ये आम्ही उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

Leave a Comment