श्रावण बाळ योजना 2024 | 1500 रुपये आर्थिक अनुदान पहा संपूर्ण योजना…

श्रावण बाळ योजना 2024 | 1500 रुपये आर्थिक अनुदान पहा संपूर्ण योजना…

श्रावण बाळ योजना 2024 : महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील व्यक्तींना स्वतःचे जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांचे घरातील वयोवृद्ध व्यक्तींकडे दुर्लक्ष होते. दारिद्र्यरेषेखालील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील व्यक्तींना वयोवृद्ध व्यक्तींच्या औषध उपचाराचा तसेच त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च परवडणारा नसतो; म्हणून त्या व्यक्तींकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने राज्यातील 65 वर्षावरील गरीब कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेची सुरुवात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्रावण बाळ योजना 2024

महाराष्ट्र शासन राज्यातील निराधार व वंचित वयोवृद्ध व्यक्तींसाठी त्यांचे आर्थिक मनोबल वाढवण्यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे श्रवण बाळ योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागातर्फे अशा अनेक योजना राबविल्या जातात. महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 21000 पेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तींना श्रवणबाळ योजनेचा फायदा घेता येतो, या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना दरमहा 1500 रुपये भेटतात. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही; कारण या योजनेमुळे त्यांचा खर्च ते स्वतः करू शकतील. या दृष्टिकोनातूनच महाराष्ट्र शासनाने श्रवणबाळ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकंदरीतच राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील वृद्धपकाळात नागरिकांना आधार मिळावा या हेतूने श्रावण बाळ योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक नागरिकांचा फायदा होणार असून, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. आज आपण या लेखांमधून श्रावणबाळ योजनेसाठी कोण अर्ज करू शकते पात्रता काय आवश्यक राहील लाभार्थी कोण आहेत अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती लेखांमधून पाहणार आहोत वाचकांनी लेख हा शेवटपर्यंत वाचावा.

वाचकांना विनंती :

श्रावणबाळ योजना ही राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विशेष अर्थसहाय्य विभागातले चालवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून योजनेमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. वाचकांनी ते बदल तपासणे आवश्यक राहील, योजना संपूर्ण समजावून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचकांना काळजीपूर्वक वाचावा लागेल.

श्रावण बाळ योजना 2024
श्रावण बाळ योजना 2024

श्रवणबाळ योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नाव श्रावण बाळ योजना 2024
उद्देश राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना प्रति महिना निवृत्ती वेतन देणे
लाभ दरमहा 1500 रुपये
राज्य  महाराष्ट्र 
टोल फ्री क्रमांक 1800-120-8040
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन

 

श्रावण बाळ योजना 2024 ची मुख्य उद्दिष्ट्ये 

● महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे आर्थिक मनोबल वाढवून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे.
● वयोवृद्ध व्यक्तींना आर्थिक मदत देणे.
● राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.
● वयोवृद्ध व्यक्तींना कुटुंबामध्ये सन्मानाने जगता यावे.
● राज्यातील 65 वर्षावरील नागरिकांना त्यांच्या शेवटच्या काळात जीवन जगणे सोपे व्हावे.
● वृद्ध नागरिकांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे, त्यांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न या योजनेमार्फत केला आहे.
● या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनेक नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात लाभ मिळणार आहे त्यामुळे या नागरिकांना आर्थिक दृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणार आहे. श्रावण बाळ योजना 2024

श्रावण बाळ योजना 2024 ची मुख्य वैशिष्ट्ये

1. श्रावण बाळ योजना 2024 योजना ही राज्य शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष अर्थसाह्य या विभागाद्वारे चालवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
2. महाराष्ट्रामध्ये श्रावणबाळ योजना हे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात आली आहे.
3. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दरमहा 1500 रुपये दिले जातात.
4. महाराष्ट्र शासनाने श्रावण बाळ अनुदान योजना ही राज्यातील सर्व प्रवर्गातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली आहे.
5. या योजनेअंतर्गत राज्यातील वयोवृद्ध व्यक्ती स्वावलंबी बनतील.
6. श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक फायदा हा ग्रामीण भागातील वयस्कर वृद्धांना होणार आहे.
7. श्रावणबाळ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही अतिशय सोपी ठेवण्यात आलेली आहे. जेणेकरून अर्जदारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत.

श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी

● महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील सर्व नागरिक श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेऊ शकतात.

शासनाच्या इतर योजना पहा 

  1. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ही 1 मे 2016 पासून देशभरातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांना मोफत गॅस असा करा अर्ज 
  2. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट वाटप योजना असा करा अर्ज 

श्रावणबाळ योजनेचे फायदे

● राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शेवटच्या काळात औषधोपचारासाठी तसेच दैनंदिन जीवनात पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
● राज्यातील वृद्ध नागरिकांना समाजामध्ये सन्मानाने जगता येईल.
● महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21 हजारापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींना राज्य शासनाकडून श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेचा लाभ मिळेल.
● या योजनेअंतर्गत राज्यातील वयोवृद्ध व्यक्तींना महाराष्ट्र शासनाकडून दरमहा 1500 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते.
● राज्यातील कोणत्याही प्रवर्गातील 65 वर्षावरील प्रत्येक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
● ज्येष्ठ नागरिकांचे आर्थिक मनोबल वाढवण्यास मदत मिळेल.
● राज्यातील वृद्ध व्यक्तींना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही. श्रावण बाळ योजना 2024

श्रावणबाळ योजनेच्या नियम अटी व शर्ती

● लाभार्थी व्यक्ती ही महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
● लाभार्थी व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 21 हजारापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
● लाभार्थी व्यक्ती ही महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 65 वर्षे पूर्ण झालेली असावी.

श्रवणबाळ योजनेसाठी आवश्यक पात्रता
● अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची कमीत कमी 15 वर्षे रहिवाशी असणे गरजेचे आहे.
● अर्जदार व्यक्ती ही 65 वर्षे पूर्ण झालेली असावी.
● या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील व्यक्तींनाच भेटणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य बाहेरील व्यक्तींनी या योजनेसाठी अर्ज करू नये.
● अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 21,000 किंवा त्यापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.
● अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे ज्या व्यक्तीकडे बँक खाते नाही अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ भेटणार नाही.
● अर्जदार व्यक्ती ही आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असणे अनिवार्य आहे.

सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा

श्रावण बाळ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

श्रावण बाळ योजनेसाठी खालील प्रमाणे जी कागदपत्रे दिलेली आहेत ती आवश्यक राहतील.

1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. बँक पासबुक
4. पॅन कार्ड
5. रहिवाशी प्रमाणपत्र
6. वार्षिक उत्पन्नाचा दाखला
7. ज्येष्ठ नागरिक कार्ड
8. मतदान कार्ड
9. जन्माचा दाखला
10. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
11. मोबाईल नंबर

श्रावणबाळ योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे

● अर्जदार व्यक्तीने सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय यामध्ये संजय गांधी योजना/ तलाठी कार्यालयामध्ये संपर्क साधावा व सदर कर्मचाऱ्यांकडून श्रावणबाळ योजनेचा अर्ज घ्यावा.
● कर्जत विचारलेली संपूर्ण माहिती पाहून संपूर्ण अर्ज हा भरायचा आहे त्यानंतर विचारलेली कागदपत्रे सोबत झेरॉक्स जोडावी लागतील.
● भरलेला अर्ज हा सदरच्या कार्यालयात जमा करायचा आहे.
● अर्ज जमा केल्यानंतर सर्व माहिती पासून, तपासून व कागदपत्रांची तपासणी होऊन तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जातो.
● अशाप्रकारे श्रावणबाळ योजनेसाठी तुमची संपूर्ण अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

श्रावणबाळ योजनेचा फॉर्म डाऊनलोड करा
श्रावणबाळ योजना पीडीएफ डाऊनलोड करा
सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा

 

सारांश :

अशाप्रकारे वरील संपूर्ण माहिती वाचून तुम्ही श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज करू शकता व या योजनेच्या माध्यमातून महिन्याला 1500 रुपयांचा लाभ देखील मिळू शकता. फॉर्म भरत असताना कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, आम्ही त्याचे नक्की उत्तर देऊ, माहिती आवडली असल्यास इतर तुमच्या परिसरात असलेल्या व्यक्तींना जरूर पाठवा. श्रावण बाळ योजना 2024

Leave a Comment