शबरी घरकुल योजना 2024 | कागदपत्रे, पात्रता, लाभार्थी अर्ज कसा करायचा पहा सविस्तर
शबरी घरकुल योजना 2024 : जसे केंद्र शासन सर्वसामान्य जनतेसाठी वेळोवेळी अनेक योजना राबवत असते, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन देखील सर्वसामान्य नागरिकांना विविध योजना राबवत असते, याच अनुषंगाने महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांना स्वतःचे घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन राज्यातील गरीब कुटुंबांना मोफत घर बांधून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, आणि त्यासाठीच शबरी घरकुल योजना अमलात आणली आहे.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील अनुसूचित जाती-जमाती मधील जे नागरिक आहेत किंवा ते आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत, ज्यांना राहायला स्वतःचे घर उपलब्ध नाही, किंवा जे स्वतःसाठी घर बांधण्यासाठी असमर्थ आहेत. अशा कुटुंबांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत स्वतःचे 269 चौरस फूट क्षेत्र असलेले पक्के घरकुल बांधण्यासाठी 2 लाखापर्यंत आर्थिक अनुदान दिले जाते. सोबतच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी देखील 12 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. शबरी घरकुल योजना 2024
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व डोंगराळ भागांमध्ये ज्या अनुसूचित जाती जमाती राहतात अशा कुटुंबातील अनेक नागरिक हे आज देखील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत. त्यांच्याजवळ स्वतःचे राहण्यासाठी पक्की घरे देखील उपलब्ध नाहीत. अशी अनेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे, ते कुटुंब स्वतःचे घर बांधण्यासाठी देखील असमर्थ ठरत आहेत, त्यामुळे अशा कुटुंबांना कच्या, पडक्या घरामध्ये राहावे लागत आहे. त्यामुळे ऊन, वारा पाऊस थंडीचा सामना अनेक नागरिकांना करावा लागतो. अशा प्रकारे खूप सार्या अडचणींचा सामना या कुटुंबांना करावा लागतो, त्यामुळे राज्यातील अनुसूचित जाती जमाती मधील आर्थिक दृष्ट्या जे गरीब कुटुंब आहेत त्या सर्वसामान्य कुटुंबांचा विचार करून शबरी घरकुल योजना 2024 ची सुरुवात करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनुसूचित जाती जमाती मधील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंब आहेत, त्यांना स्वतःचे 269 चौरस फूट क्षेत्र असलेली पक्की घरे बांधून देण्यासाठी 2 लाख रुपये पर्यंत अनुदान देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आज या लेखांमधून आपण शबरी गुरुकुल योजना साठी कोण कोणती कागदपत्रे लागतात, लाभार्थी कोण आहेत, पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे वाचकांनी लेख हा शेवटपर्यंत वाचावा.
शबरी घरकुल योजना 2024 Highlight
योजनेचे नाव | शबरी गुरुकुल योजना 2024 |
विभाग | समाज कल्याण विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील अनुसूचित जमातीमधील राहायला स्वतःचे घरे नसलेले कुटुंब |
लाभ | प्रति कुटुंब 2 लाख आर्थिक साह्य देणे |
उद्देश | घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्यता करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
शबरी घरकुल योजना 2024 चे मुख्य उद्दिष्टे
● महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती मधील आर्थिक दृष्ट्या जे गरीब कुटुंब आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही, अशा कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शबरी घरकुल योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
● राज्यातील ग्रामीण भागामध्ये तसेच डोंगराळी भागामध्ये जे कुटुंबे आज देखील उघड्यावर ते राहतात, त्या कुटुंबांना घर बांधून देण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना अमलात आणली आहे.
● ज्या कुटुंबाकडे स्वतःचे राहायला घर नाही अशा कुटुंबांना अशा कुटुंबाने योजनेच्या माध्यमातून घरे बांधून दिली जातात.
● राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी इतरांकडे पैसे मागण्याची वेळ येऊ नये त्यासाठी त्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हे देखील या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे.
● जे कुटुंब सध्याच्या घडीला कच्च्या व पडक्या घरात राहतात अशा कुटुंबांना या योजनेअंतर्गत घरे बांधून दिली जातात. व त्यांचे ऊन वारा पाऊस थंडीपासून संरक्षण केले जाते.
● महाराष्ट्र राज्यातील जे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंब आहे त्यांनी स्वतःचे घर बांधण्यासाठी आत्मनिर्भर व्हावे या दृष्टिकोनातून योजना सुरू करण्यात आली आहे. शबरी घरकुल योजना 2024
शबरी घरकुल योजना 2024 ची मुख्य वैशिष्ट्ये
1. महाराष्ट्रातील जे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत, किंवा जे दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत, त्यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून व त्यांना पक्की घर बांधून देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यातील समाज कल्याण विभाग याद्वारे घरी बांधून दिली जातात त्यामुळे ही योजना खूप महत्त्वपूर्ण ठरलेले आहे.
2. या योजनेच्या माध्यमातून ज्या अर्जदार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो, त्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी देखील 12 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. हे देखील या योजनेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे.
3. शबरी घरकुल योजना अंतर्गत 18 हजार 544 कुटुंबांना घरे बांधून देण्याचे लक्ष शासनाने केले आहे.
4. शबरी घरकुल योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना पाच टक्के आरक्षण दिले आहे.
5. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील तसेच काही शहरी भागातील व डोंगराळ भागातील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांना घरे उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना स्वतःसाठी राहण्यासाठी निवारा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे राज्यांमध्ये ही योजना खूप महत्त्वाची आहे.
शबरी घरकुल योजना 2024 मध्ये दिला जाणारा प्राधान्यक्रम
● राज्यातील जे आदिवासी जमात आहे. पारधी जमात, आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंब विधवा महिला,निराधार महिला, दुर्गम क्षेत्रातील कुटुंब, दिव्यांग महिला, घटस्फोटीत महिला, दिव्यांग व्यक्ती या नागरिकांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते त्यानंतर इतर नागरिकांना प्राधान्य देण्यात येते.
● तसेच शबरी घरकुल योजनेमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबांना 5% आरक्षण देखील देण्यात येते.
शासनाच्या इतर योजन पहा
ट्रक्टर अनुदान योजना शेतकर्यांना ट्रक्टर घेण्यासाठी अनुदान उपलब्ध
मागेल त्याला विहिर योजना पहा सविस्तर प्रक्रिया, असा करा अर्ज
शबरी घरकुल योजना 2024 चा फायदा
● महाराष्ट्र राज्यातील जे अनुसूचित जमातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंब आहेत ज्यांच्याजवळ स्वतःसाठी राहण्यासाठी पक्की घरे नाहीत, अशा कुटुंबांना योजनेअंतर्गत बांधण्यासाठी तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
● शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबांचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे.
● ज्या कुटुंबाकडे राहायला स्वतःचे घर नाही, त्या कुटुंबांना शबरी घरकुल योजना अंतर्गत घर दिले जाते. त्यामुळे कुटुंबांचा ऊन, वारा, पाऊस, थंडी यामुळे संरक्षण होते.
● आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या कुटुंबांना स्वतःचे घर बांधण्यासाठी इतरांकडून पैसे मागावे लागतात व ते कुटुंब व्याजदराने पैसे घेऊन घर बांधतात नंतर कर्जबाजारी होतात, त्यामुळे या कुटुंबांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, परंतुशबरी घरकुल योजना 2024 योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी तब्बल 2 लाख रुपयांचे आर्थिक मदत केली जाते.
दिले जाणारे आर्थिक सहाय्य
ग्रामीण क्षेत्र | 1.32 लाख रुपये |
नक्षलवादी व डोंगराळ भाग | 1.42 लाख रुपये |
नगरपरिषद क्षेत्र | 1.50 लाख रुपये |
नगरपालिका क्षेत्र | 2 लाख रुपये |
घर बांधण्यासाठी लाभार्थी हा त्याच्या आवडीनुसार घर बांधू शकतो परंतु जर निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जास्त खर्च झाल्यास वरील खर्च हा लाभार्थ्याला स्वतःजवळ घालावा लागेल, वरील आलेल्या खर्च हा शासनाच्या माध्यमातून दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
शबरी घरकुल योना 2024 च्या नियम व अटी
● महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या शबरी घरकुल योजना 2024 लाभ दिला जातो.
● महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
● महाराष्ट्र राज्यातील फक्त अनुसूचित जमाती मधील कुटुंबाना योजनेचा लाभ दिला जातो.
● अर्जदार व्यक्तीकडे घर बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे.
● अर्जदार व्यक्तीकडे स्वतःचे घर असता कामा नये.
● शहरी भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त असू नये.
● ग्रामीण भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असता कामा नये.
● अर्जदार व्यक्तींनी यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेद्वारे घरकुल घेतलेले नसावे.
● अर्जदार कुटुंबातील व्यक्ती कोणत्याही शासकीय नोकरीत असता कामा नये.
शबरी घरकुल योजनेसाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. कुटुंबाचे रेशन कार्ड
3. रहिवासी प्रमाणपत्र
4. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
5. मोबाईल नंबर
6. ईमेल आयडी
7. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
8. जातीचा दाखला
9. अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
10. अर्जदार विधवा असल्यास (पत्तीचे मृत्यू प्रमाणपत्र)
11. अर्जदार महिला घटस्फोटित असल्यास न्यायालयाचा आदेश
12. आवश्यक असल्यास (सातबारा उतारा)
13. ग्रामपंचायतचा नाहरकत प्रमाणपत्र
14. बँक खात्याचे झेरॉक्स
शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
ग्रामीण भाग
ग्रामीण भागातील अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा कार्यालयात जावे लागेल, तेथील शबरी घरकुल योजनेचा अर्ज द्यावा लागेल. सर्व माहिती भरून व आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे जोडून अर्ज सदर कार्यालयात जमा करावा लागेल. शबरी घरकुल योजना 2024
शहरी भाग
शहरी भागातील अर्जदार व्यक्तीला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालय जावे लागेल, तेथील कर्मचाऱ्यांकडून शबरी घरकुल योजनेचा अर्ज घ्यावा, अर्जात विचारलेले सर्व माहिती भरून आवश्यकते कागदपत्रे जोडून सदर अर्ज हा त्याच कार्यालयात जमा करावा.
अशाप्रकारे तुम्ही शही व ग्रामीण भागासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण कागदपत्राचे पडताळणी करून या योजनेचा लाभ दिला जातो. शबरी घरकुल योजना 2024
शबरी घरकुल योजना 2024 अर्ज | येथे क्लिक करा |
सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप | जॉईन करा |
सारांश –
अशाप्रकारे तुम्ही वरील संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे वाचून शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकता, अर्ज करत असताना तुम्हाला कोणत्याही अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचे उत्तर देऊ, माहिती आवडली असल्यास इतरांना देखील शेअर करा किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना ही माहिती जरूर द्या.