राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना | विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती पहा संपूर्ण माहिती…
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना : महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना या योजनेच्या माध्यमातून शालांत परीक्षेत 75 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या व इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी दरमहा 300 रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते सदरची दिली जाणारी शिष्यवृत्ती ही भारत सरकारच्या शिष्यवृत्ती आणि Freeship व्यतिरिक्त दिली जाते.
राज्यातील ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थी ही शहरी भागात स्थलांतरित होतात, व उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात परंतु आजच्या युगामध्ये शिक्षण महाग झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे हे परवडत नाही. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून शाहू महाराज स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. या योजनेचा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
राज्यामध्ये अनेक भागांमध्ये शिक्षणापासून वंचित असलेले विद्यार्थी शिक्षणाकडे आकर्षित व्हावेत तसेच त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे हा राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना वार्षिक 300 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. याच अनुदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तके वह घेण्यासाठी आर्थिक मदत होते. राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात.? योजनेसाठी लाभार्थी कोण.? पात्रता काय.? अर्ज कसा करायचा.? याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे वाचकांनी लेख हा शेवटपर्यंत वाचावा.
वाचकांना विनंती :
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ही एक शासनाच्या माध्यमातून चालवली जाणारी योजना आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी बदलही केले जातात, त्यामुळे वाचकांनी माहिती व्यवस्थित पहावी ही विनंती.
राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना Highlight
योजनेचे नाव | राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
उद्देश | विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे |
लाभ | प्रति महिना 300/- रुपये वार्षिक 3000/- हजार रुपये |
लाभार्थी | इयत्ता आणि 11वी व 12वी मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना मुख्य उद्देश
● महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आवड निर्माण करणे.
● ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या योजनेतून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
● पैशाअभावी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा देखील शासनाचा मुख्य उद्देश आहे.
● विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे, व त्यांना शिक्षण घेत असताना इतरांकडे पैसे मागण्याची वेळ येऊ नये.
● कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याकारणाने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात त्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना चे मुख्य वैशिष्ट्ये
1. राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग या माध्यमातून चालवली जाते.
2. जे योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम ही विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटी च्या साह्याने जमा करण्यात येते.
3. राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये कोणताही प्रकारचा अडथळा येऊ नये त्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे हा राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप योजनेचा मूळ हेतू आहे.
4. या योजनेचे आणखीन महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना घरी बसून स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून या योजनेसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतात. व त्या योजनेचा लाभ मिळवू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टींची बचत होते.
अर्ज भरण्याचा कालावधी
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना या योजनेची शेवटची तारीख निश्चित केली जात नाही. ती प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या असते, त्यामुळे अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यावर आम्ही शेवटची तारीख काय असेल याची नोंद करू.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
● अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
● सदरचा विद्यार्थी हा अनुसूचित जाती श्रेणीतील असावा.
● सदर विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेमध्ये 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा.
● विद्यार्थी इयत्ता 11वी किंवा 12वी वर्गात शिकणारा असावा.
राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना चे फायदे
● राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आर्थिक मदत झाल्यामुळे इतरांकडून पैसे मागण्याची वेळ विद्यार्थ्यांवरती येणार नाही.
● या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शिक्षणाची गळती देखील कमी होण्यास मदत होईल.
● योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी चांगली संधी मिळेल व विद्यार्थ्यांना भविष्यात चांगली नोकरीही मिळेल.
● ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या आर्थिक पैशाची अडचण दूर होईल.
● महाराष्ट्र राज्यामध्ये साक्षर विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढेल.
● विद्यार्थी शिक्षण घेत असताना स्वावलंबी बनतील.
● महाराष्ट्र राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आवड निर्माण होईल.
● या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःचे शिक्षण हे स्वतः पूर्ण करू शकतील, व त्यांना भविष्यात शिक्षणाची आवड देखील निर्माण होईल. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
शासनाच्या इतर योजना पहा
- सौर पंप विकत घेण्यासाठी शेतकर्यांना 90 टक्अके अनुदान देण्यात येते. असा करा अर्ज
- तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी लेक लाडकी योजना पहा संपूर्ण माहिती
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना निशुल्क उपचारासाठी व अपघात झाल्यानंतर कुटुंबांना 2 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते. पहा संपूर्ण योजना
राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना चे नियम व अटी
● सदरची योजना ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे कर्नाटक राज्यसभा भागातील विद्यार्थी देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
● अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपये पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
● शासनाच्या नियमानुसार कुटुंबातील दोन विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.
● सामान्य श्रेणी आणि एसइबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
● अर्जदार विद्यार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
● अर्जदार विद्यार्थी प्रत्येक विषयात पास होऊनही अनिवार्य आहे. व विद्यार्थ्यांनी प्रत्येक परीक्षा देणे आवश्यक राहील. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा
राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे (Important Document)
1. आधार कार्ड
2. रहिवासी प्रमाणपत्र
3. इयत्ता 10वीचे गुणपत्रक
4. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
5. जात प्रमाणपत्र
6. शाळा सोडल्याचा दाखला
7. इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतल्याची पावती
8. मोबाईल नंबर
9. ईमेल आयडी
10. इत्यादी
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्याची प्रक्रिया
● राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध नाही. त्यासाठी खालील प्रक्रियाचा अवलंब करा.
● अर्जदार विद्यार्थ्याला सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
● सदरच्या वेबसाईट वरती गेल्यानंतर अर्जदाराने नवीन अर्जदार नोंदणी यामध्ये क्लिक करावे व आपली नोंदणी करून घ्यावी.
● आता पुढे अर्जदार विद्यार्थ्याने Username आणि Password टाकून Login करून घ्यावे.
● आता अर्जदार विद्यार्थ्याला होम पेजवर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर सोशल जस्टीस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट वर क्लिक करून राजश्री शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप वर क्लिक करावे लागेल.
● आता पुढे राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा फॉर्म उघडेल त्यामध्ये आवश्यक असलेले सर्व माहिती भरून व योग्य ती कागदपत्रे अपलोड करून रजिस्टर या बटणावर क्लिक करावे.
● अशाप्रकारे राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनासाठी तुमचा फॉर्म भरला जाईल.
राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना | अर्ज करा |
सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप | जॉईन करा |
सारांश :
अशाप्रकारे तुम्ही वरील संपूर्ण माहिती वाचून राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनासाठी अर्ज करू शकता, अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचे उत्तर देऊ. माहिती आवडली असल्यास इतर विद्यार्थ्यांना देखील शेअर करा जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांचा फायदा होईल.