प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2024 | योजनेसाठी असा करा अर्ज पहा संपूर्ण माहिती…

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2024 | योजनेसाठी असा करा अर्ज पहा संपूर्ण माहिती…

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2024 : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात, सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुधारावे यासाठी शासन सतत प्रयत्नशील असते. त्यासाठी सरकार वेळोवेळी अनेक योजना देखील सुरुवात करत असते. आज आपण केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी सुरू झालेली प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2024 योजना या विषयी माहिती पाहणार आहोत. महिलांच्या सुरक्षितेसाठी व त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे.

देशाच्या ग्रामीण भागामध्ये अनेक महिला या लाकूड, कोळसा, गोवऱ्या यापासून स्वयंपाक बनवत असतात, परंतु या पारंपारिक इंधनाच्या वापरामुळे महिलांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावरती फार मोठा त्याचा विपरीत परिणाम होतो, याच्या वरती आळा घालण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलासाठी 1 मे 2016 रोजी उज्वला गॅस योजनेची सुरुवात केली.

उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना मोफत गॅस सिलेंडरचे कनेक्शन उपलब्ध करून दिले जाते. म्हणजेच लाभार्थी महिलांना कोणत्याही प्रकारे गॅस कनेक्शन देण्यासाठी पैसे आकारले जात नाहीत. तसेच लाभार्थ्यांना प्रतिवर्षी 12 सिलेंडर व त्यावरती 200 रुपये अनुदान देखील दिले जाते. दिले जाणारे 200 रुपये अनुदान हे लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी च्या साह्याने थेट जमा केले जाते.

या योजनेचा मूळ हेतू म्हणजे ग्रामीण भागातील आणि आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबातील महिलांना एलपीजी सारखे स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देणे, तसेच महिलांना त्यांच्या आरोग्यासाठी कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेणे व चुलीवरच्या धुरापासून होणारा महिलांना त्रास कमी करणे, या हेतूनही प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2024 सुरू केलेले आहे. या लेखाच्या माध्यमातून आज आपण प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना कोणाला मिळते.? कोणत्या महिला पात्र आहेत.? कागदपत्रे कोणकोणती लागतात.? अर्ज कुठे व कसा करायचा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे वाचकांनी लेख हा शेवटपर्यंत वाचावा.

वाचकांसाठी महत्वाची सूचना

नवीन शासन निर्णयानुसार 1 सप्टेंबर 2023 पासून प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरवर 400 रुपयांची सबसिडी दिली जाते, व 2024 च्या शासन निर्णयानुसार 3 सिलेंडर मोफत दिले जातात.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2024
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2024

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2024 Highlight

योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
उद्देश देशातील महिलांना एलपीजीच्या वापरासाठी प्रोत्साहन देणे
योजनेचे लाभार्थी ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिला
लाभ मोफत गॅस कनेक्शन देणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन/ऑफलाइन

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2024 चे मुख्य उद्दिष्टे

● देशातील ग्रामीण भागातील महिलांना जीवाश्म इंधनाच्या जागी एलपीजीच्या वापरासाठी अधिकचे प्रोत्साहन देणे.
● चुलीच्या धुरापासून महिलांना होणारा त्रास तसेच घरातील लहान मुलांना होणारा त्रास यापासून त्या कुटुंबाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना सुरू केली आहे.
● चुलीच्या धुरापासून अनेक श्वसनाचे आजार पसरतात त्या रोखण्याचे हेतूने ही योजना महत्त्वाची आहे.
● देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे हे देखील या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
● प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2024 योजनेच्या प्रक्रियेमध्ये महिलाव्यतिरिक्त ST, OBC आणि अल्पसंख्याक समुदायातील पुरुषही LPG कनेक्शन साठी पात्र आहेत.

शासनाच्या इतर योजना पहा 

  1. मागेल त्या शेतकर्यांना आत्ता मिळणार शेततळे पहा संपूर्ण योजना Magel tyala shettale Yojana 2024-25
  2. ट्रक्टर घेण्यासाठी शेतकर्याना मिळत आहे सबसिडी Tractor Anudan Yojana 2024

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2024 चे मुख्य वैशिष्ट्ये

1. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ही 1 मे 2016 पासून देशभरातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते, त्यामुळे देशातील एक सर्वात महत्त्वाची योजना आहे.
2. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने 8 करोड कुटुंबांना लाभ देण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.
3. देण्यात आलेल्या गॅस सिलेंडर वरती प्रत्येक सिलेंडरच्या पाठीमागे 400 रुपये अनुदान देखील देण्यात येते.
4. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून महिलांना चुलीवरच्या स्वयंपाका पासून होणारा त्रास कमी झाला आहे. व अनेक महिलांनचे श्वसनाचे आजार कमी झाले आहेत.
5. केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जाणारी ही योजना आर्थिक दृष्ट्या कुमकुवत कुटुंबना विशेष करून महिलांना खूप दिलासादायक आहे.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2024 चा फायदा

● देशभरातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना मोफत LPG कलेक्शन दिले जाते, सोबत दिलेल्या सिलेंडर वरती 400 रुपये अनुदान देखील दिले जाते.

● सुरक्षित आणि स्वच्छ इंधन हे लाकूड आणि शेणखत यासारखे पारंपारिक इंधनापेक्षा स्वच्छ आणि सुरक्षित इंधन आहे.

● LPG मुळे कोणत्याही प्रकारचा वायू प्रदूषण होत नाही, किंवा आरोग्यास कोणताही त्रास नाही, त्यामुळे महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

● ग्रामीण भागातील महिलांना लाकूड गोळा करण्यासाठी रानावनात भटकावे लागत होते, परंतु गॅस कनेक्शनच्या माध्यमातून आता महिलांना हा त्रास कमी झाला आहे.

● प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना मुळे महिलांना सशक्तीकरणास वाव मिळतो, व घरात निर्णय घेण्याची क्षमता आणि आर्थिक दृष्ट सक्षम होण्याची शक्ती देखील मिळते. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2024

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या नियम व अटी

● कुटुंबातील फक्त एकाच महिलेच्या नावावरती कनेक्शन दिले जाते.
● प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ही 18 वर्षावरील महिलांना दिली जाते.
● अर्जदाराच्या नावावर याच्या अगोदर कधीही गॅस कनेक्शन घेतलेले नसावे, तसेच घरात इतर सदस्यांनी एलपीजी कनेक्शन घेतलेले नसावे.
● जर अर्ज तर इतर कोणत्याही राज्याचा रहिवासी असल्यास त्याला Self deceleration form भरावा लागेल.
● लाभार्थी अर्जदार महिलेचे कोणतेही एका राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे अनिवार्य आहे.
● अर्जदार महिलांनी बीपीएल कुटुंबातील असणे आवश्यक आहे.

jk

 

सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा 

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेसाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे

1. ओळखीसाठी आधार कार्ड
2. कुटुंबाचे रेशन कार्ड
3. मतदान ओळखपत्र
4. अर्जदार महिलेचा पासपोर्ट आकाराचा फोटो
5. विज बिल/पाणी बिल/घरपट्टी यापैकी एक प्रमाणपत्र
6. कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स
7. बँक पासबुक झेरॉक्स (अर्जदार महिलेचे)
8. मोबाईल नंबर
9. ईमेल आयडी (अनिवार्य नाही)

उज्वला योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना साठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे महिला अर्ज करू शकतात.

ऑफलाइन प्रक्रिया :

● अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम उज्वला गॅस योजनेसाठी जवळच्या गॅस वितरण केंद्रात जावे लागेल, व प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
● अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्राची झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज हा गॅस वितरण केंद्रात मध्ये जमा करावा.
● तुम्ही जमा केलेला अर्ज गॅस वितरण केंद्राकडून संपूर्ण तपासला जाईल, व कागदपत्रांची देखील तपासणी केली जाईल त्यानंतर तुम्हाला गॅस वितरक मंजुरी देईल.
● अशाप्रकारे तुमचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरला जाईल.

ऑनलाइन प्रक्रिया :

● अर्जदार महिलेला सर्वप्रथम प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल
● संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पुढील प्रक्रिया करायची आहे.

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना अर्ज भरण्यासाठी  क्लिक करा
सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा

 

सारांश :

अशाप्रकारे तुम्ही प्रधान मंत्री उज्वला गॅस योजना 2024 साठी सर्व माहिती वाचून व्यवस्थितपणे अर्ज भरू शकता, तुम्हाला काही अडचणी येत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचे उत्तर देऊ, माहिती आवडली असल्यास तुमच्या परिसरातील इतर महिलांना देखील सांगा व माहिती शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment