प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना | व्यवसायासाठी 10 लाखापर्यंत कर्ज
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना : देशभरामध्ये सध्या बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत चालल्यामुळे देशातील तरुणांनी स्वतःचा व्यवसाय स्वतः उभा करावा व इतरांना नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात. व स्वयंरोजगाराची निर्मिती करावी, या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा लोन योजनेची सुरुवात केली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) महाराष्ट्र मधील लघु आणि मध्यम उद्योगांना स्वयंरोजगार आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक स्वरूपाची या योजनेमधून मदत केली जाते.
देशातील लोकसंख्या लक्षात घेता सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नाही. लोकसंख्या वाढीमुळे शासनाला प्रत्येकाला नोकरी देणे शक्य नाही. त्यामुळे प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अमलात आणून या योजनेच्या माध्यमातून देशभरातील तरुणांना सूक्ष्म आणि लघुउद्योग करण्यासाठी 50 हजारापासून ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जेणेकरून देशातील कोणताही तरुण बेरोजगार राहू नये या संकल्पनेतून ही योजना अमलात आणली आहे.
सदर योजनेच्या माध्यमातून देशातील अनेक तरुण व्यवसाय क्षेत्राकडे वळतील व स्वतःचा रोजगार निर्माण करतील, तसेच देशातील औद्योगिक क्षेत्राला पुढे नेण्यास मदत करण्यात व देशातील औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन क्षमता ही वाढण्यास मदत होईल. तर आज आपण या लेखांमधून प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागणार आहेत, मुद्रा लोन योजनेसाठी लाभार्थी कोण आहेत, याची संपूर्ण प्रक्रिया या लेखांमधून पाहणार आहोत तर लेख शेवटपर्यंत वाचावा.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना Highlight
योजनेचे नाव | प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना |
द्वारा सुरू | केंद्र शासन |
योजनेची सुरुवात | 8 एप्रिल 2015 |
योजनेचा मुख्य उद्देश | देशातील लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करणे |
लाभार्थी | देशातील नागरिक |
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे मुख्य उद्दिष्टे
1. देशातील छोटे व्यावसायिक व लघुउद्योजक तसेच व्यवसायास सुरुवात करणारे तरुण यांना कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
2. लघु उद्योगांमध्ये दुकाने, फळभाजी विक्रेते, ट्रक आणि टॅक्सी व्यवसाय करणारे, अन्नसेवा पुरवणारे, इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करून देणारी दुकाने, घरगुती अन्नप्रक्रिया उद्योग, फेरीवाले, सलून, सायबर कॅफे, हाताने बनवण्यात येणाऱ्या घरगुती वस्तू, यामध्ये असंख्य छोटे छोटे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना प्रोत्साहित करणे व त्यांना बँकामार्फत कर्ज उपलब्ध करून देणे हा मुद्रा लोन योजने मागील प्रमुख उद्देश आहे.
3. ग्रामीण भागामध्ये उद्योगधंद्यांना चालना देणे.
4. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायाकडे आकर्षित करणे.
5. देशातील वाढत चाललेली बेरोजगारी कमी करणे.
6. देशातील उद्योगधंदे करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहित करून त्यांना कर्ज वाटप करणे.
7. एकंदरीतच मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून देशात उद्योगधंद्यांना चालना देणे, तरुणांना रोजगार निर्मिती करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना
मुद्रा लोन योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
● प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येणारी एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
● या योजनेचे संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे यामध्ये पारदर्शकता आढळते.
● मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून छोटे व्यवसायिकापासून ते मोठा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना 50 हजारापासून ते 10 लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो.
● या योजनेला केंद्र सरकारचे वीस हजार कोटींची भक्कम भांडवली पाठबळ आहे.
● सदर योजनेमध्ये कर्ज घेत असताना कोणतीही वस्तू तारण ठेवावी लागत नाही. तसेच कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जमिनीची आवश्यकता नाही.
● सदरची योजना ही फक्त सरकारी बँकांमध्येच आहे.
● सदरची योजना ही देशामध्ये उद्योगधंद्यांना चालना देणारी व ग्रामीण भागामध्ये तरुणांना रोजगार निर्माण करून देणारी योजना आहे.
शासनच्या इतर योजना पहा
आंतरजातीय विवाह योजना 2024 आंतर जातीय विवाह केल्यास 3 लाख रुपये अनुदान
लेक लाडकी ही योजना मुलगी जन्माला आल्यानंतर मुलाला शासन देत आहे 1 लाख 1 हजार रुपये
मुद्रा लोन योजनेची कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया 3 टप्प्यात
1. शिशु श्रेणी –
शिशु श्रेणीमध्ये 50 हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाते, व या कर्जावरती प्रत्येक महिन्याला 9% व्याजदर आकारले जाते, व वार्षिक 12% व्याजदर आकारला जातो. तसेच या श्रेणी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची परतफेड ही 5 वर्षापर्यंत करावी लागते.
2. किशोर श्रेणी –
या श्रेणीमध्ये व्यावसायिकांना 50 हजारापासून 5 लाखापर्यंत कर्ज वाटप केले जाते, या श्रेणीच्या माध्यमातून व्याजाचा दर हा बँक निश्चित करते, व कर्जाचा कालावधी कर्ज घेणाऱ्या व्यावसायिकाच्या नावलौकिकावर अवलंबून असतो.
3. तरुण श्रेणी –
या श्रेणी अंतर्गत व्यावसायिकांना 5 लाखापासून ते 10 लाखापर्यंत कर्ज वाटप करण्यात येते. या श्रेणीच्या माध्यमातून व्याजाचा दर हा बँकच निश्चित करते व श्रेणीतील कर्जाचा कालावधी व्याज घेणाऱ्या व्यक्तीवरती अवलंबून असतो तसेच बँकेचे धोरणही अवलंबून असते.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचा लाभ
1. देशातील व राज्यातील कोणताही नागरिक स्वतःचा लघुउद्योग सुरू करायचा असेल तो या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन व्यवसाय करू शकतो.
2. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी पन्नास हजार रुपये पासून ते दहा लाखापर्यंत कर्ज वाटप केले जाते.
3. कर्ज घेत असताना व्यवसायिकाला कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी आकारली जात नाही.
4. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला एक मुद्रा कार्ड दिले जाते, ज्याच्या मदतीने लाभार्थी त्याला गरज असेल त्यावेळेस तो पैसे काढू शकतो.
5. कर्जाचे परतफेड वेळेवर केल्यास व्याजदर सवलत मोठ्या प्रमाणावर मिळते.
6. PMMY अंतर्गत शासनाच्या माध्यमातून अनेक सूचना राबवल्या जातात. व कर्ज घेणाऱ्या व्यवसायिकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देखील मिळते.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Document)
● आधार कार्ड
● पॅन कार्ड
● पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
● मतदान ओळखपत्र
● रहिवासी दाखला
● विज बिल
● अर्जदार जो व्यवसाय करत आहे त्या व्यवसायाचा परवाना
● अर्जदाराच्या बँकेचे मागील सहा महिन्याची स्टेटमेंट
● व्यवसायासाठी विकत घ्यावयाच्या वस्तूचे कोटेशन व बिले
● अर्ज सादर केल्याच्या तारखेपर्यंत चालू आर्थिक वर्षात साधलेली विक्री
● अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती मधील असेल जातीचे प्रमाणपत्र
● इत्यादी
सरकारी योजनेसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अधिकृत बँकांची यादी
1. Corporation Bank
2. Dena Bank
3. Federal Bank
4. HDFC Bank
5. Allahabad Bank
6. Andhra Bank
7. Axis Bank
8. Bank of Baroda
9. J&K Bank
10. Karnataka Bank
11. Kotak Mahindra Bank
12. Oriental Bank of Commerce
13. Bank of India
14. Bank of Maharashtra
15. Canara Bank
16. Central Bank of India
17. IDBI Bank
18. Indian Bank
19. Indian Overseas Bank
20. United Bank of India
21. Syndicate Bank
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
● प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास आपल्याला जवळच्या बँकेत जाऊन मुद्रा लोन योजना कर्जाचा अर्ज घ्यावा, अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य कागदपत्रांची झेरॉक्स जोडून सदर अर्ज बँकेत जमा करावा.
● सदरचा अर्ज जमा केल्यानंतर बँक मॅनेजर कडून पाठपुरावा करून घ्यावा.
● तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर एका महिन्याने तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
सरकारी योजनेसाठी व्हाट्सअप ग्रुप | जॉईन करा |
सारांश –
वरील संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे वाचून तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 50 हजारा पासून ते 10 लाखापर्यंत कर्जाची मागणी तुमच्या जवळच्या बँकेकडे करू शकता. व पाठपुरावा करून तुम्ही हे कर्ज मिळवू शकता. माहिती आवडली असल्यास इतरांना देखील शेअर करा.