प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 | लाभार्थी कागदपत्रे, असा करा अर्ज

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 | लाभार्थी कागदपत्रे, असा करा अर्ज

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 : भारत देशामधील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील गरोदर महिलांना मजुरीसाठी अजूनही काम करावे लागते. गरीब परिस्थितीमुळे गरोदर महिलेला मोलमजुरी करणे गरजेचे असते यामुळे महिलेचे स्वतःकडे दुर्लक्ष होते. म्हणजेच पौष्टिक आहार, आराम, उत्तम पोषण, पोषक आहार यापासून ती वंचित राहते. यामुळे त्या महिलेबरोबर जन्माला येणाऱ्या नवजात बालकाच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे.  प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

महाराष्ट्र शासनाने 21 नोव्हेंबर 2017 पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राज्यांमध्ये लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही राज्यात 8 डिसेंबर 2017 पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक गरजू गरोदर महिलेने घेतला पाहिजे. केंद्र सरकारने गरोदर महिलांच्या व जन्माला येणाऱ्या नवजात बालकाच्या आरोग्याचा विचार करून ही योजना सुरू करण्यात आली आहे. गर्भवती महिलांना अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा शारीरिक क्षमता नसताना देखील त्यांना मजुरीसाठी काम करावे लागते. त्यांना सकस आहार मिळावा, उत्तम पोषण मिळावे, पोषक आहार मिळावा, आराम मिळावा म्हणूनच केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबातील गरोदर महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. गर्भवती महिला व त्यांच्यापासून जन्माला येणाऱ्या आपत्यांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी शासनाने या योजनेची अंमलबजावणी केली आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

एकंदरीतच शासनाच्या माध्यमातून गरोदर असलेल्या महिलांना कोणत्याही प्रकारे आर्थिक अडचणी येऊ नये, यासाठी इतरांकडे पैसे मागण्याची आवश्यकता भासू नये, या उद्देशाने शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू करण्यात आली आहे.

वाचकांसाठी महत्वाची सूचना :

शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी योजनेमध्ये बदल केले जातात. त्यामुळे लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत असताना, योजना संपूर्ण खात्रीशीर तपासून घ्यावी. योजनेमध्ये काही बदल आढळल्यास आम्ही वेळोवेळी अपडेट करत राहू.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची थोडक्यात माहिती

योजनेचे नाव प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
कोणी सुरू केली पंतप्रधान नरेंद्र मोदी
कधी सुरू झाली जानेवारी 2017
लाभार्थी देशातील गरोदर महिला व स्तनपात करणाऱ्या महिला
उद्देश गर्भवती महिलांना त्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी आर्थिक मदत
विभाग महिला व बाल विकास मंत्रालय, केंद्र सरकार
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ ऑफलाइन

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 ची उद्दिष्टे

● दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबातील गरोदर महिलांना सकस आहार, उत्तम पोषण, पोषक आहार, आराम मिळावा म्हणून ही योजना सुरू केली आहे.
● देशातील गरोदर महिलांना आर्थिक मदत दिली जाते.
● कुपोषणापासून गरोदर महिला व नवजात बालक वंचित राहतात.
● लाभार्थी महिलेला गरोदरपणा त मजुरी करण्याचे आवश्यकता भासणार नाही.
● महिला गरोदर असताना खाण्यापिण्याच्या कोणत्याही वस्तू कमी पडू नये यासाठी शासनाच्या माध्यमातून ही योजना सुरू केली आहे.
● योजनेच्या माध्यमातून महिलांना सकस आहार मिळेल, त्यामुळे जन्माला येणारे बालक हे चांगले जन्माला येईल.
● एकंदरीतच राज्यातील महिलांचा विकास व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही योजना अमलात आणली आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची वैशिष्ट्ये

● महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर 2017 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मातृ वंदना योजना लागू करण्याचा निर्णय घेतला.
● मातृ वंदना योजनाही महाराष्ट्र राज्यांमध्ये 8 डिसेंबर 2017 दिवशी लागू करण्यात आली.
● लाभार्थी महिलेला या योजनेअंतर्गत 5 हजार रुपये एवढी रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.
● पहिला हप्ता हा 1000 रुपयाचा असून गर्भधारणेपासून 150 दिवसापर्यंत हा हप्ता त्या महिलेच्या खात्यात जमा होतो.
● दुसरा हप्ता 2 हजार रुपयांचा असून हा हप्ता गर्भधारणेपासून सहा महिने झाल्यानंतर हा हप्ता त्या महिलेच्या खात्यामध्ये जमा केला जातो.
● तिसरा हप्ता रुपये 2000 असून जन्माला आलेल्या आपत्याची जन्म नोंदणी व प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर हा हप्ता महिलेच्या खात्यामध्ये जमा होते.
● लाभार्थी महिलेला या योजनेचा फायदा फक्त एका वेळीच घेता येणार आहे कारण ही योजना पहिल्या अपत्त्यापुरतीच मर्यादित आहे.
● जन्माला आलेल्या आपत्याला प्रथमता बीसीजी, ओपीव्ही, हिपॅटटीस बी, ओपीव्हीच्या 3 लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या बँक खात्यात तिसरा हप्ता जमा होतो.

इतर सरकारी योजना पहा 

1. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना सुरू Namo Shetakri Yojana Online Apply 2024

आंतरजातीय विवाह केल्यास राज्य शासनाकडून 50 हजार रुपये व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून 2.50लाख रुपये अशी दोन्ही मिळून 3 लाख रुपये पर्यंतचे विवाहित जोडप्यास अनुदान दिले, पहा संपूर्ण योजना 

मातृ वंदना योजनेच्या नियम अटी व शर्ती

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024
● लाभार्थी महिलाही भारत देशाची मूल रहिवासी असणे गरजेचे आहे.
● लाभार्थी महिलेला मातृ वंदना योजनेचा एकदाच आर्थिक लाभ घेता येतो.
● मातृ वंदना योजनाही जानेवारी 2017 नंतरच्या गरोदर महिलांसाठी आहे.
● या योजनेचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर गरोदर महिलेचा गर्भपात झाल्यास दुसऱ्या वेळेस गर्भवती राहिल्यानंतर या योजनेचे राहिलेले हप्ते घेऊ शकते.
● या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकूण 5 हजार रुपये एवढे रक्कम मदत म्हणून दिली जाते.

प्रधानमंत्री मातृत्व योजनेसाठी पात्रता

● लाभार्थी महिला जानेवारी 2017 नंतर गरोदर असणे आवश्यक आहे.
● लाभार्थी महिला दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील कुटुंबातील असावी.
● अर्जदार महिला भारतीय रहिवासी असणे गरजेचे आहे.
● लाभार्थी महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
● लाभार्थी महिलेचा मोबाईल नंबर हा बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

मातृ वंदना योजनेचे मुख्य फायदे 

● प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 योजने अंतर्गत प्रत्येक गरोदर महिलेला 5 हजार रुपये एवढी रक्कम मिळेल.
● या योजनेमुळे गरोदर व स्तनपात करणाऱ्या महिलांना आराम करण्याची संधी लाभेल.
● महिला व आपत्य कुपोषणापासून वंचित राहतील.
● पोषण आहारामुळे गरोदर महिलेचे आरोग्य सुधारले जाईल.

राज्यातील आर्थिक दृष्ट्या  गरीब  शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कार्यासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% म्हणजे 1.25 लाख रुपये अनुदान उपलब्ध करून दिले जाते, असा करा अर्ज 

मातृत्व वंदना योजनेसाठी आवश्यक महत्वाची कागदपत्रे

● महिला व पती या दोघांचे आधार कार्ड अनिवार्य आहे.
● बँक पासबुक व पोस्ट खाते
●रेशन कार्ड
● मोबाईल नंबर
● पासपोर्ट साईज 2 फोटो
● माता बाळ संरक्षण कार्ड

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धत

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024 योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतो, या योजनेसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांना ऑफलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करता येतात. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

● अर्जदार महिलेने हा अर्ज करण्यासाठी प्रथमता जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा अंगणवाडीमध्ये नाव नोंदणी करावे.

● सदरच्या कार्यालयातून महिलांनी अर्ज भरण्यासाठी सदरच्या कार्यालयामधून योजनेसाठी अर्ज घ्यावा.

● त्यानंतर महिलांनी घेतलेल्या अर्जातील सर्व माहिती भरून व आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे जोडून अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य अधिकारी कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
● अशाप्रकारे तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल.

सरकारी योजनेसाठी whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

सारांश :

अशा प्रकारे तुम्ही वरील माहिती वाचून प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना साठी अर्ज करू शकता, अर्ज करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही नक्की त्याची उत्तर देऊ, माहिती आवडली असल्यास इतर गरजू महिलांना देखील ही माहिती शेअर करा.

Leave a Comment