
Pradhanmantri jan-dhan yojana 2025
Pradhanmantri jan-dhan yojana 2025 | कसे खाते खोलायचे पहा संपूर्ण माहिती..
Pradhanmantri jan-dhan yojana 2025 : PMJDY भारत देशामध्ये गेल्या अकरा वर्षापासून देशातील गरीब लोकांसाठी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ देशातील सर्व आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांना होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली. देशातील गरजू नागरिकांचा विचार करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “प्रधानमंत्री जनधन योजना” अमलात आणली. आज पर्यंत देशातील लाखो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. PMJDy आपला भारत देश हा जसा संस्कृती जपणार आहे तसाच पारंपारिक विचार व पद्धती ही जपतो. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी व्यक्ती अशी असते की, कुटुंबासाठी बचत करणे आवश्यक समजते. बचत केलेली रक्कम घरातच ठेवली तर त्याचा कोणताही फायदा होत नाही; कारण त्याला कसलेही व्याजदर भेटत नाही व इतर कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे लाभ करून घेण्यासाठी बचत केलेली रक्कम बँकेत जमा केली जाते किंवा अनेक ठिकाणी गुंतवली जाते जेणेकरून आपल्याला व्याजदर मिळण्यास मदत होते.
बचत केलेली रक्कम सतत बँकेत जमा करत राहिल्याने आपले व्यवहाराच्या दृष्टीने बँकेशी चांगले नाते निर्माण होते. म्हणून आपल्याला लोन मिळण्यास मदत होते. तसेच भारत सरकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या सबसिडीचा देखील फायदा मिळू शकतो. कुटुंबामध्ये अनेक समस्या असतात जशा की आरोग्यासाठी खर्च, शिक्षणासाठी लागणारी फी, घर घेण्यासाठी पैसे अशा अनेक खर्चांना सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून भारत सरकारने प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली आहे.

प्रधानमंत्री जनधन योजना 2025 ची थोडक्यात माहिती पाहूया
आपणास या लेखनातून Pradhanmantri jan-dhan yojana 2025 योजना संबंधित संपूर्ण माहिती बघायला मिळेल. या योजनेसाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, या योजनेचे फायदे पाहायला मिळतील. सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री जनधन योजना ही अत्यंत फायदेशीर योजना आहे या योजनेचा लाभ देशातील प्रत्येक नागरिक घेऊ शकतो. PMJDY
Pradhanmantri jan-dhan yojana 2025 overwiev
योजनेचे नाव | Pradhanmantri jan-dhan yojana 2025 |
श्रेणी | केंद्र सरकार |
योजनेची स्थापना | 28 ऑगस्ट 2014 रोजी |
विभाग | वित्त मंत्रालय, भारत सरकार |
उद्देश | देशातील नागरिकांना आर्थिक सुविधा मिळवून देणे |
लाभार्थी | भारत देशातील सर्व नागरिक |
लाभ | विनामूल्य बँक खाते व इतर आर्थिक सुविधा |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
प्रधानमंत्री जनधन योजनेचा थोडक्यात आढावा
केंद्र सरकार म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 ऑगस्ट 2014 रोजी प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात केली होती. या योजनेची सुरुवात करण्यामागे वित्त मंत्रालय व केंद्र सरकार या विभागाचे योगदान आहे. प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत देशातील गरीब नागरिकांना अनेक सुविधा दिल्या जातात, त्याचबरोबर मोफत बँक खाते उघडण्याची संधी दिली जाते.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील नागरिकांना आर्थिक सेवा व सुविधा उपलब्ध करून देणे आहे. तसेच मोफत बँक अकाउंट उघडून देणे, त्याचबरोबर लाभार्थ्यांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे. ज्यामध्ये क्रेडिट कार्ड, विमा, पेन्शन, लोन आणि सेविंग व ठेव खाते अशा विविध प्रकारच्या सुविधांचा लाभ या योजनेमार्फत दिला जातो.
प्रधानमंत्री जनधन योजना फायदे
१. देशातील प्रत्येक नागरिकाला Pradhanmantri jan-dhan yojana 2025 योजनेचा फायदा घेता येतो.
२. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला मोफत बँक खाते उघडून दिले जाते.
३. बँक खाते उघडल्यानंतर लाभार्थ्याला मोफत डेबिट कार्ड दिले जाते.
४. लाभार्थ्याला जनधन खाते काढल्यानंतर २ लाखापर्यंत चा आरोग्य विमा देखील दिला जातो.
५. नागरिकांना अकाउंट उघडून झाल्याच्या 6 महिन्यानंतर 10,000 रुपयांचे Overdraft (OD) सुविधा सुद्धा पुरविली जाते.
६. लाभार्थी मिळालेल्या १० हजार रुपये मधील २ हजार रुपये वापरण्यासाठी कोणत्याही अटीची गरज लागत नाही.
७. लाभार्थ्याला 30,000 पर्यंतचा जीवन विम्याचा लाभ देखील दिला जातो.
८. या योजनेअंतर्गत भारत देशातील आजपर्यंत जवळपास 53 कोटी लोकांनी खाते उघडले आहेत.
सरकारच्या माध्यमातून मोफत निर्धूर चुकीची योजना सुरू केली आहे. Mofat chul vatap yojana 2025
प्रधानमंत्री जनधन योजनेसाठी आवश्यक पात्रता
१. लाभार्थी व्यक्ती ही भारत देशाची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
२. अर्जदाराचे वय अर्ज करण्यासाठी 18 ते 65 वर्षे असणे आवश्यक आहे.
३. अर्जदार व्यक्ती ही सरकारी कर्मचारी नसावा, सरकारी कर्मचारी असल्यास या योजनेसाठी अर्ज करता येत नाही.
४. या योजनेमध्ये 18 वर्षाखालील मुलांना जॉईंट अकाउंट च्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज करता येतो.
५. खातेधारकांनी सतत अकाउंट चालू ठेवणे गरजेचे आहे.
६. अर्जदार व्यक्ती जर भारत सरकारला टॅक्स भरत असेल तर तो या योजनेस पात्र नाही.
७. देशाबाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ भेटणार नाही. Pradhanmantri jan-dhan yojana 2025
प्रधानमंत्री जनधन योजना आवश्यक कागदपत्रे/ important documents
१. अर्जदाराचे आधार कार्ड
२. अर्जदाराचे पॅन कार्ड
३. मोबाईल नंबर
४. रहिवासी प्रमाणपत्र
५. पासपोर्ट आकाराचे फोटो
६. ई-मेल आयडी
७. जन्माचा दाखला
Pradhanmantri jan-dhan yojana 2025 योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने वरील बाबी लक्षात घेणे व आवश्यक कागदपत्रे जमा करणे अनिवार्य आहे.
प्रधानमंत्री जनधन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
जनधन खाते उघडण्यासाठी प्रथमता तुम्ही जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन उघडू शकता. बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये गेल्यानंतर योजनेची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. त्यानंतर तेथील अधिकारी तुम्हाला योजनेचा फॉर्म देतील.
त्या फॉर्ममध्ये खाते उघडण्यासाठी संबंधित माहिती विचारलेली असते ती माहिती काळजीपूर्वक वाचून संपूर्ण माहिती भरून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स काढून फॉर्म सोबत जोडणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पासपोर्ट आकाराचे फोटो फॉर्म वरती चिटकवावे लागतील.
खाते उघडण्याचा फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावा. अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करू शकता.
सरकारी योजनेसाठी आमचा whatsapp ग्रुप | जॉईन करा |
जण-धन योजना अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
योजनेचा निष्कर्ष
आपण Pradhanmantri jan-dhan yojana 2025 योजनेबद्दल या लेखांमधून संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे .यामध्ये आपण सुरुवातीला योजना कधी सुरू झाली? कोणी सुरू केली? कोणा मार्फत ही योजना सुरू आहे? लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता काय? अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे? या योजनेतून कोणता फायदा होतो? या सर्व बाबींची माहिती जाणून घेतली आहे.