प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 | दोन लाखापर्यंत कर्ज, असा करा अर्ज
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 : देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 17 सप्टेंबर 2023 पासून विश्वकर्मा योजना सुरू झाले आहेत भारत देशातील कारागिरांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे व त्यांची कला जोपासले जावी, त्या कलेला अधिक गती प्राप्त व्हावी तसेचत्या कारागिरांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केले आहे. देशामध्ये अनेक छोटे छोटे कारागीर आहेत जसे की, सुतार, कुंभार, लोहार यासारख्या अनेक कारागिरांना आर्थिक मदत मिळावी व त्यांचा व्यवसाय व्यवस्थितरीत्या चालावा या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केले जातात. त्यामुळे विश्वकर्मा योजनाही देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील अनेक छोट्या छोट्या कारागिरांना आपला व्यवसाय वाढवता येईल, व आपली कला देखील व्यवसायाबरोबर जोपासता येईल. देशातील अनेक कारागीरांना पैसे अभावी आपला व्यवसाय बंद करावा लागत आहे. हीच गोष्ट केंद्र सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांचा व्यवसाय वाढीसाठी 2 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024
देशात मध्ये अनेक कारागीर आहेत परंतु त्यांच्याकडे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असे प्रशिक्षण मिळत नाही. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागातील छोटी छोटी कैरागीर आपला व्यवसाय बंद करत आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून असे अनेक छोटे व्यवसाय करण्यासाठी मोफत ट्रेनिंग देखील दिले जाते व त्याचा खर्च देखील शासनाच्या माध्यमातून केला जातो त्यामुळे देशातील तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची ही योजना आहे. आज या लेखांमधून आपण या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जसे की, योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो, योजनेसाठी अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण माहिती लेखांमधून पाहणार आहोत, त्यामुळे वाचकांनी हा लेख शेवटपर्यंत वाचावा.
वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आलेले आहे या व्यवसायाचा लाभ घेत असताना व्यवसायाची अधिकृत संपूर्ण माहिती पाहणे गरजेचे आहे शासनाच्या माध्यमातून योजनेमध्ये वेळोवेळी बदल देखील केले जातात त्यामुळे ते बदल पाहणे देखील खूप महत्त्वाचे आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 आढावा Overwiev
योजनेचे नाव | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 |
योजनेची सुरुवात | 17 सप्टेंबर 2023 पासून |
द्वारा सुरू | केंद्र शासन |
लाभार्थी | देशातील छोटे छोटे व्यवसाय करणारे कारागीर यामध्ये एकूण 140 जातींचा समावेश |
मिळणारा लाभ | मोफत ट्रेनिंग सामान खरेदीसाठी पैसे कर्ज आणि प्रमाणपत्र |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे मुख्य उद्दिष्टे
● देशामध्ये अनेक प्रकारच्या जाती धर्माचे लोक राहतात, अनेक जाती धर्मामध्ये वेगवेगळे व्यवसाय केले जातात, परंतु अलीकडच्या काळामध्ये ते व्यवसाय अलिप्त होत आहेत. त्या व्यवसायांना चालना देण्यासाठी देशातील नागरिकांना या छोट्या व्यवसायांचे ट्रेनिंग दिले जाते व त्यामधून व्यवसाय उभा करता यावा हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
● तसेच शासनाचा आणखीन एक उद्देश म्हणजे देशामध्ये अनेक छोटे-छोटे कारागीर आहेत, परंतु त्यांच्याकडे व्यवसाय वाढीसाठी मुबलक प्रमाणावर पैसा उपलब्ध नाही. त्यामुळे असे कुशल कामगार त्यांना आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे ते नागरिक सक्षम होऊन देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देऊ शकतात.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
1. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
2. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून देशातील लोहार चांभार माळी शिंपी असे एकूण 140 छोट्या छोट्या व्यवसायांचा समावेश आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024
3. विश्वकर्मा योजनेअंतर्गत एकूण 18 प्रकारच्या पारंपारिक व्यवसायांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
4. अनेक कारागिरांना मोफत ट्रेनिंग देऊन त्यांना प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होईल.
5. कमीत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देऊन व्यावसाय कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून मदत केली जाते.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे फायदे
● विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून देशातील जे छोटे छोटे कारागीर आपल्या कलेच्या माध्यमातून व्यवसाय करतात अशा कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्या साठी शासनाचा आर्थिक मदत देणार आहे.
● देशातील अनेक कारागिरांना आधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण दिल्यामुळे व्यवसाय करण्यासाठी त्यांना मदत मिळणार आहे.
● देशाच्या उद्योगधंदे मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
● देशातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्याची उत्तम संधी निर्माण होईल.
या व्यावसायिकांना दिला जातो विश्वकर्मा योजनेचा लाभ
1. लोहार
2. सोनार
3. चांभार
4. धोबी
5. न्हावी
6. टेलर
7. शिल्पकार
8. कार्पेंटर
9. शेती अवजारे निर्माते
10. माळी
11. झाडू चटाई बनवणारे
12. असे एकूण 140 व्यवसायांना विश्वकर्मा योजनेचा लाभ दिला जातो.
सरकारी योजनेची माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे (Important Documents)
● अर्जदाराचे आधार कार्ड
● जातीचे प्रमाणपत्र
● रहिवासी प्रमाणपत्र
● बँक खात्याचे तपशील
● मोबाईल नंबर
● ईमेल आयडी
● पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया (Pm Vishvakrama Yojana Online Apply 2024)
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 योजनेसाठी अर्जदार व्यक्तीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो, त्याची प्रोसेस खालील प्रमाणे दिली आहे त्यानुसार तुम्ही अर्ज सादर करू शकता.
● अर्जदार व्यक्तीला सर्वात प्रथम शासनाच्या या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
● या वेबसाईट वरती गेल्यानंतर अर्ज करा येथे तुम्हाला क्लिक करावे लागेल.
● त्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून सीएससी हे पोर्टल लॉगिन करावे लागेल.
● आता पुढे तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून अकाउंट व्हेरिफाय करावे लागेल.
● आता तुम्हाला पुढे अर्ज दिसेल त्या अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
● संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज व्यवस्थितपणे तपासून पाहून शेवटी सबमिट या बटणावर क्लिक करावे.
● अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
सरकारी योजनेची माहिती Whatsapp वर मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
सारांश :
अशाप्रकारे तुम्हीप्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024 योजनेसाठी वरील माहिती संपूर्णपणे व्यवस्थित वाचून अर्ज दाखल करू शकता, अर्ज करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा नक्की आम्ही त्याचे उत्तर देऊ, माहिती आवडले असल्यास इतरांना देखील शेअर करा.