Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारी योजना माहिती
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 : देशामध्ये केंद्र शासनाच्या अंतर्गत किंवा राज्य शासनाच्या अंतर्गत समाजातील घटकांसाठी वेगवेगळे योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून समाजातील घटकांचा आर्थिक व सामाजिक विकास साधला जातो. केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना ह्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाते. तर राज्य शासनाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजना ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने राबवले जातात. या योजनेच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या घटकातील उदा : शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक, बालके व शालेय विद्यार्थी यांच्यासाठी या योजनेची अंमलबजावणी केली जाते.
राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व इतर मागास प्रवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असलेले किंवा दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे व त्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या माध्यमातून Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 योजना राबविण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरांमध्ये जावे लागते, शहरामध्ये गेल्यानंतर या विद्यार्थ्यांना शहरातील आर्थिक दृष्ट्या परवडणारा खर्च झेपत नसल्यामुळे मुलांना अर्धवट शिक्षण सोडावे लागते. व शहरात राहण्यासाठी त्यांना खर्चही परवडत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहतात या सर्वांचा विचार करून राज्य शासनाने या योजनेची सुरुवात केली आहे. Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना निवासी, निर्वाह तसेच भोजनासाठी भत्ता देऊन त्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना हातभार ही शासनाकडून लावण्यात येतो. ज्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहू नये व बुद्धिमत्ता असूनही त्या विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडायला लागू नये, या दृष्टिकोनातून ही योजना राबविली आहे. आणि याच योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 43 हजार रुपये भत्ता देण्यात येतो.
ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी शहरी भागात गेल्यानंतर वास्तव्यासाठी अनेक वस्तीग्रहणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु वाढती विद्यार्थ्यांची लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येक वस्तीग्रह विद्यार्थ्यांना देणे शक्य नाही. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी रुम करून राहण्यासाठी ही योजना अमलात आणलेली आहे.
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, लाभ, कशाप्रकारे दिला जातो, या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो, व कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे तरी वाचकांना विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत वाचावा.
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना Highlight
योजनेचे नाव | पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना |
विभाग | समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य |
लाभार्थी | अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थी |
लाभ | ६० हजार रुपये/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
पंडित दीनदयाळ योजनेचे मुख्य उद्दिष्टे
1. पंडित दीनदयाळ उपाध्ये योजनेच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी निर्वाह, निवासी व भोजन भत्ता दिला जातो. जेणेकरून ग्रामीण भागातील आलेला विद्यार्थी हा शहरी भागामध्ये राहण्यासाठी त्या विद्यार्थ्याला कोणतीही अडचण होणार नाही. या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
2. सदर योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागात आल्यानंतर कोणत्याही प्रकारे अडचणी निर्माण होणार नाहीत.
3. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना देखील आता शहरी भागामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेता येणार आहे.
4. कोणत्याही विद्यार्थ्याला अर्धवट शिक्षण सोडावे लागणार नाही.
5. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्यक मिळाल्या कारणाने अल्पसंख्याक समाजातील मुले हे शिक्षणाने समृद्ध होतील.
6. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजनेचा सर्वात जास्त फायदा होतो, आता ग्रामीण भागातील कोणतीही मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.
7. सदर योजनेचा मूळ उद्देश हाच आहे की हा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील मुले ही शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, त्यांच्या अडचणी दूर केल्या जाव्यात, या दृष्टिकोनातून ही योजना राबवली गेली आहे.
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
● महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्ग अल्पसंख्याक व आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या दुर्बल घटकांसाठी ही योजना राबवलेली आहे.
● महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत या योजनेच्या अंमलबजावणी केली जाते.
● शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, हा दृष्टिकोन समोर ठेवून पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेची सुरुवात केली आहे.
● सदर योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी आत्मनिर्भर बनू शकतात.
● Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे वेळ व पैसा दोन्हींची बचत होते.
● विद्यार्थ्यांना दिली जाणारी लाभाची रक्कम ही DBT च्या साह्याने थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
● तसेच संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे विद्यार्थी घरी बसून आपल्या मोबाईलच्या सहाय्याने या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
● ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदतीचा हातभार लागू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
इतर शासकीय योजना पहा
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) महाराष्ट्र मधील लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज वाटप करणारी योजना
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024
पंडित दीनदयाळ उपाध्य स्वयं योजना अंतर्गत दिला जाणारा आर्थिक लाभ
ग्रामीण भागातील विद्यार्थी जेव्हा मुंबई, नागपूर, संभाजीनगर, पुणे, तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा जिल्हा ठिकाणी गेल्यानंतर काही विद्यार्थ्यांना वस्तीगृहाची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांना इतरत्र ठिकाणी राहावे लागते, त्यासाठी निवासी भत्ता, भोजन भत्ता, निर्वाह भत्ता असे एकूण त्यांना वार्षिक खर्च योजनेच्या माध्यमातून दिला जातो तो खालील प्रमाणे पाहूया.
शहर | निवासी भत्ता | भोजन भत्ता | निर्वाह भत्ता | निर्वाह भत्ता |
मुंबई, नागपूर, संभाजीनगर, पुणे | 20000/- रुपये | 32000/- रुपये | 8000/- रुपये | 60000/- रुपये |
महानगरपालिका क्षेत्र | 15000/- रुपये | 28000/- रुपये | 8000/- रुपये | 51000/- रुपये |
जिल्हा ठिकाणी | 12000/- रुपये | 25000/- रुपये | 6000/- रुपये | 43000/- रुपये |
पंडित दीनदळ उपाध्याय स्वयं योजनेचे मुख्य फायदे
● महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील तसेच अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी या योजनेचा आर्थिक फायदा होतो.
● ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसोबतच महाराष्ट्र राज्यातील आदिवासी जाती जमाती मधील घटक साक्षर होऊन उच्चशिक्षित बनतील.
● विद्यार्थ्यां उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती उभे राहतील.
● तसेच स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनतील.
● विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना पैशासाठी इतर व्यक्तींवरती अवलंबून राहण्याची गरज नाही.
● खेडेपाड्यातील विद्यार्थ्यांना किंवा अनुसूचित जाती जमाती घटकातील विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण सोडण्याची आवश्यकता नाही.
● Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 योजनेमुळे तरुणांचे जीवनमानाचा दर्जा उंचावेत व त्यांचा सामाजिक आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
● आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन नवीन नोकरीची संधी निर्माण करतील, त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण देखील कमी होईल.
● एकंदरीतच या योजनेच्या माध्यमातून साक्षरतेचे प्रमाण वाढेल, तसेच मागासलेले घटक मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल.
योजनेसाठी समाविष्ट असलेली महाविद्यालये
1. तंत्रनिकेतन
2. आय.टी.आय
3. आय.आय.टी
4. वैद्यकीय महाविद्यालय
5. अभियांत्रिकी महाविद्यालय
6. उच्च महाविद्यालय
7. कला महाविद्यालय
8. तसेच ओपन युनिव्हर्सिटी आणि इतर कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम
सरकारी योजनेसाठी whatsapp ग्रुप जॉईन करा
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 योजनेच्या नियम व अटी
● पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यां हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
● या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व मागास प्रवर्ग आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असणे आवश्यक आहे.
● इतर घटकातील व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
● योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपये असणे आवश्यक.
● योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इतर शहरांमध्ये स्थलांतरित झालेला किंवा उच्च शिक्षण घेणारा असावा.
● अर्जदार विद्यार्थ्याने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेच्या माध्यमातून लाभ घेतलेला नसावा.
● या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपले जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
● सदर योजनेच्या पात्रतेसाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
● अर्जदार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक राहील.
● सदरील योजनेचा लाभ हा इतर राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिला जाणार नाही.
● एखाद्या विद्यार्थ्याने जर अर्धवट शिक्षण सोडले तर त्या विद्यार्थ्याला या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जाणार नाही.
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. कुटुंबाचे रेशन कार्ड
3. उत्पन्नाचा दाखला
4. मतदान कार्ड
5. बँक पासबुक झेरॉक्स
6. जन्म दाखला
7. मागील वर्षाचे गुणपत्रक
8. शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्याचे प्रमाणपत्र
9. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
10. मोबाईल नंबर
11. ईमेल आयडी
12. रहिवाशी प्रमाणपत्र
13. शिक्षणासाठी इतर कोणत्याही शहरात राहत असेल तेथील लाईट बिल
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
सदरी योजनेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी अर्ज करू शकतात.
● अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावं लागेल.
● तिथे गेल्यानंतर होमपेठ वर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर एक नवीन रजिस्ट्रेशन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती भरून Save या बटणावर क्लिक करावे.
● अशाप्रकारे तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.
● आता अर्जदाराने होमपेज वर जाऊन तुमचा Login Id आणि Password टाकून लॉगिन या बटनावरती क्लिक करावे.
● आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल, त्या पेज मध्ये विचारलेले सर्व माहिती भरून व सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून सबमिट या बटणावर क्लिक करावे.
● अशाप्रकारे तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइनच्या माध्यमातून पूर्ण होईल.
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सरकारी योजनेसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
सारांश –
Pandit Dindayal Upadhyay Yojana 2024 योजनेसाठी वरील प्रमाणे तुम्ही सर्व माहिती व्यवस्थितपणे वाचून या योजनेचा लाभ मिळवू शकता. तसेच इतर गरजू विद्यार्थ्यांना देखील ही माहिती शेअर करा. तुम्हाला काही अडचण येत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचे नक्की उत्तर देऊ.