
Nanaji Deshmukh krushi sanjivani yojana 2025
Nanaji Deshmukh krushi sanjivani yojana 2025 | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2025 संपूर्ण माहिती…
Nanaji Deshmukh krushi sanjivani yojana 2025 : महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. त्यापैकी महत्त्वाची योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2025, भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे सर्वाधिक लोकसंख्या देशांमध्ये व राज्यांमध्ये शेतकऱ्यांची आहे. राज्यातील शेतकरी हा रात्रंदिवस काबाडाविष्ट करून शेती पिकवतो. राज्यातील शेतकरी हा अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ यासारख्या महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तूंचा उत्पादक आहे. त्यामुळे तिन्ही ऋतूमध्ये पाऊस, थंडी, ऊन, वारा अशा संकटाचा कोणत्याही प्रकारे विचार न करता अहोरात्र काबाडकष्ट करून शेती पिकवतो त्यामुळे शेतकऱ्याला जगाचा अन्नदाता म्हणून संबोधले जाते.
Nanaji Deshmukh krushi sanjivani yojana 2025 या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवड आणि हवामान बदल या अनुषंगाने शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी ही योजना मदत करते. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात पिकाची लागवड करता यावी आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाच्या लागवडीवर भर देण्यात यावा यासाठी नानाजी देशमुख योजना सुरू करण्यात आली आहे.
Nanaji Deshmukh krushi sanjivani yojana 2025 ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये 25 जिल्ह्यातील 5142 खेड्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही राज्यातील एक महत्त्वकांक्षी योजना असून, ही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचावणे, तसेच सामाजिक व आर्थिक उन्नती शेतकऱ्यांची वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
सदरील योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील दुष्काळ मुक्त होण्यास मदत होणार आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागातील मातेचे परीक्षण करून त्यामध्ये कोणती कमतरता आहे याची परीक्षण करून ती भरून काढण्यात येते व जमीन पीक लागवडीसाठी योग्य करण्यात येते. तसेच जमीन लागवडीसाठी योग्य आहे का नाही तेथे शेतीपूरक व्यावसायिक करता येईल का नाही याच्यावर देखील संशोधन केले जाते. NDKSY या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक स्तर उंचावेल व त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारेल महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत होणार आहे.
वाचकांना विनंती
शासनाच्या माध्यमातून योजनेमध्ये वारंवार बदल केले जातात त्यामुळे कोणतीही शासकीय योजनेचा लाभ घेत असताना अर्जदारांनी सर्वप्रथम शासकीय संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना Overview 2025
योजनेचे नाव | नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2025 |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र शासन |
योजनेची सुरुवात | 2017 पासून सुरू |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील छोटे आणि मध्यमवर्गीय शेतकरी |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे शेतीसंबंधी समस्येचे निराकरण करणे |
विभाग | कृषी विभाग |
वर्ष | 2025 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2025 मुख्य उद्दिष्ट
● Nanaji Deshmukh krushi sanjivani yojana 2025 योजनेच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळी भागातील जिल्ह्यामधील असलेली नापीक जमीन सुपीक करणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
● सदरील योजनेच्या माध्यमातून राज्यातील बराचसा भाग हा दुष्काळ मुक्त होण्यास मदत होईल.
● सदरील योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती उंचावेल.
● या योजनेमुळे राज्यातील कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होईल.
● राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये पाण्याची उपलब्धता करून शेतीसाठी सुनील शेट्टी निर्माण करणे हे देखील शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
गाय-म्हैस खरदेसाठी 5 लाख कर्ज | अर्ज कुठे करायचा पहा संपूर्ण माहिती…
योजनेअंतर्गत येणारे महत्त्वपूर्ण प्रकल्प खालील प्रमाणे
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत विविध योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित अत्यंत महत्त्वच्या योजना असून सदरील योजनेसाठी अर्ज कुठे करायचा.? पात्रता काय आहे.? कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत.? याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या खालील प्रमाणे योजना आहेत.
1. फळबाग लागवड
2. शेडनेट हाऊस
3. वृक्षारोपण
4. पॉलिहाऊस
5. रेशीम
6. मधमाशी पालन
7. गोड्या पाण्यातील मत्स्य पालन
8. गांडूळ खत युनिट
9. शेततळे
10. विहिरी
11. ठिबक सिंचन
12. पाईपलाईन
13. बंदिस्त शेळीपालन
14. कुक्कुटपालन योजना
15. भाडेतत्त्वावर कृषी अवजारे/ यंत्राची निर्मिती योजना
योजनेअंतर्गत येणारे महाराष्ट्रातील जिल्हे
1. छत्रपती संभाजी नगर
2. बुलढाणा
3. धाराशिव
4. बीड
5. अकोला
6. नांदेड
7. जालना
8. परभणी
9. वाशिम
10. हिंगोली
11. जळगाव
12. यवतमाळ
13. लातूर
14. अमरावती
15. वर्धा
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना योजनेसाठी आवश्यक पात्रता
● अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
● महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
● या योजनेसाठी अर्जदाराच्या नावावरती शेती असणे आवश्यक आहे.
● सदरील योजना ही राज्यातील लघु व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठीच आहे.
● राज्यातील फक्त शेतकरी या घटकासाठीच Nanaji Deshmukh krushi sanjivani yojana 2025 योजना राबवली जाते. त्यामुळे इतर घटकातील लोकांनी योजनेसाठी अर्ज करू नयेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे
● अर्जदाराचे आधार कार्ड
● रहिवासी दाखला
● उत्पन्नाचा दाखला
● मोबाईल नंबर
● पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
● इत्यादी
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
सदरील योजनेसाठी राज्यातील अर्जदार शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने सर्व घटकासाठी अर्ज करता येणार आहेत. Nanaji Deshmukh krushi sanjivani yojana 2025
● अर्जदार शेतकऱ्यांना सर्वप्रथम शासनाच्या या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
● सदरील वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल.
● त्यामध्ये जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यावा लागेल किंवा registration केले असेल तर आधार क्रमांक टाकून Log in करावे लागेल.
● रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आधार क्रमांक टाकून लॉगिन करावे लागेल.
● आता पुढे तुम्हाला सदर योजनेचा अर्ज दिसेल, अर्जात विचारलेले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जिल्हा, संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे अचूक पद्धतीने भरायची आहे.
● सदरील संपूर्ण अर्ज भरून आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
● अशा पद्धतीने अर्जाची प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल. [Nanaji Deshmukh krushi sanjivani yojana 2025]
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
सरकारी योजनेसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना संपर्क माहिती | कृषी विभाग महाराष्ट्र शासन नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA), 30 अ/ब, आर्केड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफपरेड, मुंबई 400005. Phone: 022-22163351 Email: pmu@mahapocra.gov.in |
सारांश :
Nanaji Deshmukh krushi sanjivani yojana 2025 योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना असून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणारी ही योजना आहे. त्यामुळे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात योजनेमध्ये असलेल्या विविध छोट्या छोट्या योजनेचा लाभ घ्यावा. सदरील योजनेच्या माध्यमातून अनुदान देखील मोठ्या प्रमाणावरती देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावेत, तसेच इतर शेतकऱ्यांना देखील ही महत्त्वाची माहिती पाठवावी.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना FAQ
Q1. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना काय व कोणासाठी आहे.
Ans – सदरील योजना ही महाराष्ट्र राज्यातील अल्पभूधारक व मध्यम शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये 5142 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबवण्यात येत आहे.
Q2. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणते लाभ मिळतात.?
Ans – नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत, त्या वरीलप्रमाणे दिल्या आगेत.या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना लाभ दिले जातात