
Namo shetakri yojana 2025
Namo shetakri yojana 2025 | नमो शेतकरी योजनेमध्ये मोठा बदल आता वर्षाला 3 हजार रुपये…
Namo shetakri yojana 2025 : केंद्र शासनाच्या PM किसान योजनेच्या धर्तीवरती राज्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. या योजनेमधून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला PM किसान योजनेचे 6 हजार रुपये व नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेचे 6 हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जातात. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून आता या योजनेमध्ये काही बदल देखील केलेले आहेत. Namo shetakri yojana 2025
राज्यातील बहुतांश शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील अवजारे, कीटकनाशके, बी- बियाणे शेतीच्या मशागतीसाठी पुरेसे पैसे उपलब्ध नसतात, त्यामुळे शेतकरी शेती करण्यासाठी स्वतःचे घर-दार दागिने, शेतजमीन घाण ठेवून व्याजाने पैसे घेतो, परंतु अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट, दुष्काळ यामुळे शेतकऱ्याची निराशा होते, व अपेक्षेप्रमाणे शेतीमध्ये पिकाचे उत्पन्न निघत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडतो व शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून काही प्रमाणावरती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये दिले जातात. या केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचा राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होतो, यासाठी राज्य सरकारकडून 6 हजार 900 कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले गेले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते, व राज्यातील तरुणांनी शेती क्षेत्राकडे आकर्षित व्हावे हा देखील शासनाचा मुख्य उद्देश आहे.
सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता नुकताच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे. व त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना शासनाने आणखीन एक खुशखबर दिलेले आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेत बदल करून आता शेतकऱ्यांना आणखी 3 हजार रुपये वाढवून देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. म्हणजेच सुरुवातीला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जात होते, परंतु आता या योजनेमध्ये बदल करू शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार रुपये दिले जाणार आहेत. Namo shetakri yojana 2025
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून नुकतेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्याप्तीचे वाटप झाले, राज्यस्तरीय कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथे उपस्थित असताना यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, PM किसान योजनेच्या धरतीवर राज्याने नमो शेतकरी योजना सुरू केली होती, यामध्ये आता बदल करून अधिकचे 3 हजार रुपये दिले जाणार आहेत, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.
नमो शेतकरी योजनेबद्दल महत्वाची सूचना
● नमो शेतकरी योजनेसाठी नवीन शेतकऱ्यांना अर्ज करता येणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी 2019 च्या पूर्वी खरेदी केलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना फक्त नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेमध्ये अर्ज करता येणार आहेत, याचीही सर्व वाचकांनी नोंद घ्यावी. Namo shetakri yojana 2025
नवीन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना फेरफार हे दस्तऐवज अनिवार्य आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नियम व अटी
● फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच Namo shetakri yojana 2025 योजनेचा लाभ दिला जात आहे.
● महाराष्ट्र राज्य बाहेर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जात नाही.
● नमो शेतकरी योजना ही फक्त शेतकऱ्यांनाच योजना लागू आहे.
● अर्जदाराकडे स्वतःची शेत जमीन असणे अनिवार्य आहे.
● अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचे अधिकृत बँकेचे पासबुक खाते असणे आवश्यक आहे.
● अर्जदार शेतकऱ्याकडे बँक खाते हे आधार कार्ड ला लिंक असणे गरजेचे आहे.
● अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावरती 2019 पूर्वी जमीन खरेदी केलेली असावी.
● 2019 नंतर ज्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन केलेले आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
● सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जात नाही.
मोफत शौचालय योजनेसाठी राज्य शासनाकडून अर्ज सुरू.. येथे करा अर्ज..
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे [Namo shetakri yojana 2025]
1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. रहिवासी प्रमाणपत्र
4. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
5. मोबाईल नंबर
6. ईमेल आयडी
7. अधिकृत बँक खात्याचा तपशील
8. जमिनीचे कागदपत्रे 7/12 उतारा व 8अ
9. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
ऑनलाईन प्रक्रिया :
अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम आपल्या जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन नमो शेतकरी या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
अर्ज केल्यानंतर सदरील अर्जाची पावती घेऊन जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन भरलेला अर्ज व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जसे की, सातबारा उतारा, फेरफार यासारखी कागदपत्रे घेऊन सदरील अर्ज जमा करायचा आहे.
सारांश :
नमो शेतकरी योजनेमध्ये शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी बदल केले जातात जसे की, योजनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी सहा हजार रुपये दिले जात होते परंतु आता येणाऱ्या काळामध्ये वर्षाला 9 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत. व नवीन शेतकऱ्यांना अर्ज करता येणार नाहीत, 2019 पूर्वीच्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज करता येतो. वरील माहिती आवडली असल्यास इतर शेतकऱ्यांना देखील ही माहिती आवर्जून शेअर करा.