मुलींसाठी सायकल वाटप योजना 2024 | असा करा अर्ज पहा संपूर्ण माहीती..

मुलींसाठी सायकल वाटप योजना 2024 | असा करा अर्ज पहा संपूर्ण माहीती..

मुलींसाठी सायकल वाटप योजना 2024 : महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना घरातून शाळेत येण्या जाण्यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत सायकलीचे वाटप करण्यात येते.

महाराष्ट्र राज्यामध्ये सुरुवातीपासूनच स्त्री शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे ;कारण शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे मूलभूत साधन आहे. महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरण बरोबरच माध्यमिक शाळांचा विकास व विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे पण ग्रामीण भागामध्ये अजूनही मुलींच्या शिक्षणामध्ये गळतीचे प्रमाण दिसून येते. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाकडे आकर्षित करून घेण्यासाठी दारिद्र्य रेषेखालील माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या म्हणजेच इयत्ता आठवीच्या मुलींसाठी मोफत सायकल वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार मुलींसाठी सायकल वाटप योजना 2024 योजना सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये अजूनही असा काही ग्रामीण भाग आहे की ज्या ठिकाणी शाळेची संख्या ही अतिशय विरळ प्रमाणात आहे. ज्या ठिकाणी शाळा उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेणे प्रत्येक मुलीला शक्य नाही कारण शाळा व त्यांचे घर यामधील अंतर याचा विचार करून मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते. मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाऊ नये व त्यांची शैक्षणिक क्षमता वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासन राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना राबवीत आहे. मुलींच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या आरोग्य सुधारणीमध्ये सुद्धा महाराष्ट्र शासन हातभार लावत आहे; यामुळे मुलींना चालत जाण्याची गरज भासणार नाही व तसेच त्यांचा वेळही वाचेल. मुलींसाठी सायकल वाटप योजना 2024

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना शिक्षणाकडे आकर्षित करून घेणे हा आहे.

मुलींसाठी सायकल वाटप योजना 2024
मुलींसाठी सायकल वाटप योजना 2024

मुलींसाठी सायकल वाटप योजना 2024 highlight

योजनेचे नाव राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजना
उद्देश मुलींना शिक्षणासाठी आकर्षित करणे
लाभार्थी इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी
लाभ मोफत सायकलीचा लाभ
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन

 

मुलींसाठी सायकल वाटप योजना 2024 योजनेची मुख्य उद्दिष्टे

◆ महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी सायकल वाटप योजना सुरू केली आहे .
◆ मुलींची शिक्षणाकडे आवड निर्माण करणे.
◆ मुलींच्या शिक्षणाला चालना देणे व त्यांना दुसऱ्यावर अवलंबून न राहता आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे.
◆ अप्रत्यक्षपणे मुलींच्या आरोग्यामध्ये सुधारणा आणणे म्हणजेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनवणे.
◆ मुलींसाठी सायकल वाटप योजना 2024 योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेणे अधिक सोयीचे होईल.

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचे मुख्य वैशिष्ट्य

◆ राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक वर्षी २० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जातो.
◆ लाभ घेणाऱ्या प्रत्येक मुलीला सायकल खरेदी करण्यासाठी ५ हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाते.

मुलींसाठी सायकल वाटप योजना 2024 योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ

◆लाभार्थी विद्यार्थिनींना सायकल खरेदी करण्यासाठी 5000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. लाभाची राशी मुलींच्या किंवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींची निवड

◆ लाभार्थी मुलीची निवड करताना ती मुलगी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असावी, ग्रामीण भागातील व नगरपरिषदेतील तसेच शहरी भागातील झोपडपट्टीत असणाऱ्या मुलींना प्राधान्य दिले जाईल. मुलींसाठी सायकल वाटप योजना 2024

मोफत सायकल वाटप योजनेसाठी आवश्यक पात्रता

◆ लाभार्थी मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
◆ अर्जदार मुलगी ही शाळेमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असावी.
◆ अर्जदार मुलीचे घरापासून ते शाळेपर्यंतचे अंतर हे २ किलोमीटर व त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
◆ या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्जदार मुलीने सायकल खरेदी केलेले बिल सादर करणे आवश्यक आहे.
◆ लाभार्थी मुलीला इयत्ता सातवी मध्ये 75 टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
◆ लाभार्थी मुलीचे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असावे व त्या कुटुंबातील एकही व्यक्ती सरकारी नोकरदार नसावी.
◆ या योजनेचा फायदा फक्त ग्रामीण भागातील मुलींना मिळणार आहे त्यामुळे शहरी भागातील मुलींनी अर्ज करू नये.
◆ अर्जदार मुलीकडे ७ पास असलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

शासनाच्या इतर योजना पहा 

  1. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपये आर्थिक अनुदान देण्यात येते असा करा अर्ज..
  2. सुकन्या समृद्धी योजना 2024 मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक बचत साठी महत्वाची योजना 
  3. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना ही 1 मे 2016 पासून देशभरातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिले, जाते पहा संपूर्ण योजना 

 

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेच्या अटी व शर्ती

◆ मुलींसाठी सायकल वाटप योजना 2024 योजनेचा लाभ घेणारी विद्यार्थिनी ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
◆ लाभार्थी विद्यार्थिनीने सायकल खरेदी केल्याचे बिल शाळेमध्ये जमा करणे आवश्यक आहे.
◆ ग्रामीण भागातील व नगरपरिषद क्षेत्रातील मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
◆ शहरी भागातील मुलींना सदर योजनेचा लाभ भेटणार नाही शहरी भागातील मुलींनी या योजनेसाठी अर्ज करू नये.
◆ अर्जदार मुलीच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी कर्मचारी असल्यास अशा मुलीला या योजनेचा लाभ भेटणार नाही.
◆ अर्जदार मुलगीही माध्यमिक शाळेमध्ये इयत्ता ८वी च्या वर्गामध्ये शिक्षण घेत असावी.
◆ लाभार्थी मुलीला इयत्ता ७ वी मध्ये 75 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
◆ अर्जदार मुलीने महाराष्ट्र शासनाच्या इतर योजनांमधून सायकलीचा लाभ घेतला असल्यास त्या मुलीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
◆ मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ फक्त मुलींना भेटणार आहे; त्यामुळे मुलांनी या योजनेसाठी अर्ज करू नये.
◆ अर्जदार मुलीचे घर आणि शाळा यामधील अंतर कमीत-कमी २ किलोमीटर असणे आवश्यक आहे.
◆ अर्जदार मुलीने 7 वी पास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचे फायदे

◆ महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबामधील मुलीला आर्थिक मदत दिली जाईल.
◆ लाभार्थी विद्यार्थिनीला सायकल खरेदीसाठी मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत 5 हजार रुपये आर्थिक मदत मिळेल.
◆ मुलींना शाळेत चालत जाण्याची गरज भासणार नाही तसेच त्यांचा वेळही वाचेल.
◆ महाराष्ट्र शासनाच्या राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत मुलींच्या आयुष्यात सुधारणा होईल. मुलींसाठी सायकल वाटप योजना 2024

सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

◆ आधार कार्ड
◆ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचा दाखला
◆ रहिवाशी प्रमाणपत्र( विज बिल, रेशन कार्ड इत्यादी)
◆ अर्जदार मुलीचा शाळेचा दाखला
◆ ७ वी पास प्रमाणपत्र
◆ पासपोर्ट आकाराचे फोटो
◆ मोबाईल नंबर
◆ ई-मेल आयडी
◆ स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र

राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया

● अर्जदार विद्यार्थिनीला स्वतःच्या जिल्ह्यातील शिक्षण व क्रीडा विभागात जाऊन, मोफत सायकल वाटप योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.

● अर्ज दिलेली सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील व संपूर्ण भरलेला अर्ज हा सदरच्या कार्यालयात जमा करावा लागेल.

● तुम्ही दिलेल्या अर्जाची सर्व प्रकारे पडताळणी होऊन या योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाईल.

शाळेतून अर्ज करण्याची प्रक्रिया

● अर्जदार विद्यार्थिनीला स्वतःच्या शाळेतून राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना चा अर्ज घ्यावा लागेल.

● अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून अर्ज शाळेतील मुख्याध्यापक कडे जमा करावा.

● मुख्याध्यापक हा अर्ज शालेय शिक्षण व क्रीडा विभागात जमा करतील.

● शिक्षणाधिकारी या अर्जाचे संपूर्ण पडताळणी करून त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा GR पाहण्यासाठी क्लिक करा
सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

 

सारांश :

अशाप्रकारे तुम्ही वरील माहिती वाचून राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना साठी अर्ज करू शकता, अर्ज करत असताना तुम्हाला कोणत्याही अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, आम्ही नक्की त्याचे उत्तर देऊ, माहिती आवडली असल्यास तुमच्या परिसरातील सर्व विद्यार्थिनींना ही माहिती शेअर करा.

Leave a Comment