मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना | असा करा अर्ज पहा संपूर्ण माहिती
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना : राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात, देशातील व राज्यातील नागरिकांना आपले जीवन समृद्ध करण्यासाठी या योजना महत्त्वपूर्ण ठरतात, यासाठी शासनाच्या माध्यमातून आरोग्याच्या संदर्भात अनेक योजना राबवल्या जातात, आणि या योजना महत्त्वपूर्ण देखील ठरलेल्या आहेत. त्यामुळे आज आपण या लेखाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत.? लाभार्थी व्यक्ती कोण असणार आहे.? अर्ज कुठे व कसा करायचा.? त्याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये मध्ये दिलेली आहे त्यामुळे वाचकांनी लेख हा शेवटपर्यंत वाचावा.
वाचकांना विनंती
कोणत्याही राज्य शासनाच्या योजना व केंद्र शासनाच्या योजना या योजनेचा लाभ घेत असताना ती योजना अधिकृतपणे पाहणे गरजेचे आहे. कारण वेळोवेळी योजनेमध्ये बदल देखील केले जातात.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेचा आढावा
योजनेचे नाव | मुख्यमंत्री सहाय्यता निधी |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील गरीब व गरजू नागरिक |
उद्देश | महाराष्ट्रातील गरजूंना औषधोपचारासाठी निधी उपलब्ध करून देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन व ऑफलाइन |
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना महाराष्ट्र राज्यामध्ये अचानकपणे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यामुळे राज्यातील लोकांचे जीवितहानी, वित्तहानी तसेच आर्थिक नुकसान ही होते. अशा वेळेस त्या परिसरातील लोकांना मदतीची आवश्यकता असते. काहींना वैद्यकीय मदतीची गरज भासते तर काहींना आर्थिक मदतीची गरज भासते. अशा लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात या हेतूने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे आपत्तीग्रस्त लोकांना तत्काळ मदत मिळते. या योजनेचा लाभ अपंग व्यक्ती, वृद्ध व्यक्ती तसेच आपत्तीग्रस्त व्यक्ती घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त एक लाख रुपये एवढी रक्कम लाभार्थ्याला दिली जाते.
महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती आली होती. त्यावेळेस आपत्तीग्रस्त लोकांना तत्कालीन मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीची स्थापना केली. यामुळे आपत्तीग्रस्त लोकांना तत्काळ मदत दिली जाते. नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या गरीब कुटुंबांना या योजनेचा फायदा होतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना
मुख्यमंत्री सहायता निधी योजनेचा उपयोग
राज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती म्हणजेच भूकंप, ज्वालामुखी, पूर, वादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्ती अचानकपणे उद्भवतात. त्यामुळे राज्यातील नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेअंतर्गत आपत्तीग्रस्त व्यक्ती तसेच शेतकरी यांना नुकसान भरपाई दिली जाते.
योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरत असताना घ्यावयाची काळजी
- कोणतेही पेशंटला डिस्चार्ज दिल्यानंतर किंवा त्याचे उपचार पूर्ण झाल्यानंतर पेशंटला आलेल्या खर्चाची प्रतिकृती म्हणून अर्थसहाय्य दिले जाणार नाही याची नोंद अर्जदारांनी घ्यावी.
- शासनाच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या या योजनेचा लाभ मिळत असल्यास महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम धर्मदाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही एका योजनेचा जर लाभ भेटत असल्यास त्या अर्जदारांचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- कर्जत विचारलेली व सांगितलेली संबंधित कागदपत्रे प्रमाणपत्रे अर्ज करणे व साक्षांकित करून सोबत जोडणे अनिवार्य आहे संशयात पर्व खोटी बनवत माहिती दिलेली आढळल्यास तो अर्ज पूर्णपणे रद्द करण्यात येईल व त्या अर्जदारावर कायदेशीर कारवाही करण्यात येईल.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेचा उद्देश
महाराष्ट्र राज्यातील जे नागरिक आपले जीवन दारिद्र्य रेषेखालील जगत आहेत अशा कुटुंबांना महागडे औषध उपचार परवडणारे नसतात त्यामुळे शासनाच्या माध्यमातून त्यांना पैसे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
● वैद्य खर्चाचे अंदाजपत्रक/ प्रमाणपत्र मूळ प्रत
● डॉक्टरांचे सही व शिक्यासह खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जन यांच्याकडे प्रमाणिपत्र असणे आवश्यक आहे.
● तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला ज्यामध्ये उत्पन्न 1.60 हजार पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
● रुग्णालयाचे आधार कार्ड, रुग्णालयाचे रेशन कार्ड
● संबंधित आजाराचा रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
● रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
● अपघात असल्यास FIR किंवा MLC असणे आवश्यक आहे.
● अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र किंवा ZTTC येथे नोंदणी केल्याचे पावती असणे ही आवश्यक आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे
● अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना
● सदरील संकेतस्थळावर गेल्यानंतर अर्जदाराने अर्जदाराचे संपूर्ण नाव, अर्जदाराच्या आधार कार्ड क्रमांक, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, अर्जदाराचा इमेल, अर्जदाराचा मोबाईल क्रमांक, रुग्णाशी आपले कोणते नाते आहे.? ही सर्व माहिती भरून सबमिट या बटनावर क्लिक करावे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज भरण्यासाठी | जॉईन करा |
सरकारी योजनेसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप | जॉईन करा |
सारांश :
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आरोग्यदायी व दीर्घायुष्य लाभण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना सुरू केली असून, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला चांगले औषध उपचार देण्यासाठी व गरजू रुग्णांना औषध उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यात येत असते. आजपर्यंत या योजनेच्या माध्यमातून लाखो गरजवंतापर्यंत निधी पोहोचलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातील गरजूंना या योजनेचे आवश्यकता असेल तर या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी हे आमचे आर्टिकल इतरांना देखील शेअर करावे व योग्य ती मदत गरजूंना व गरिबांना मिळवून द्यावी ही विनंती. मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना