मागेल त्याला सौर कृषी पंप योजना : मोबाईल मधून कसा करा अर्ज..

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना : मोबाईल मधून कसा करा अर्ज..

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना : महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे “सौर कृषी पंप योजना” ज्या शेतकऱ्याकडे विहीर किंवा बोरवेल किंवा शेतीच्या पाण्याचे अन्य साधन उपलब्ध असल्यास त्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मोफत कृषी पंप दिला जातो.

महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी हा पारंपारिक दृष्ट्या शेती करतो, ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असतात, त्या शेतकऱ्यांकडे शेतीव्यतिरिक्त अन्य कोणतेही कमाईचे साधन उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती फार कमजोर असते. त्यामुळे शेतकरी हे अनेक बँकांकडून वित्तीय संस्था यांच्याकडून जास्त व्याजदराने कर्ज घेतात व शेती करतात. शेती करण्यासाठी पाण्याच्या आवश्यकता ही मोठ्या प्रमाणात लागते, विहीर, बोरवेल, नदी, नाले, कालवा यामधून डिझेल किंवा इलेक्ट्रिक पंपांच्या साह्याने पाण्याचा उपसा करतात, परंतु लोड शेडिंग मुळे विजेची अनियमितता निर्माण होते व शेतकऱ्यांना शेती सिंचन करण्यासाठी अनेक समस्या निर्माण होतात. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

नेहमीच शेतकरी अनेक संकटात सापडलेला असतो, कधी नैसर्गिक आपत्ती कधी दुष्काळ, रोगराई बाजारभाव या गोष्टीमुळे शेतकरी नेहमी तोट्यात जाताना आपल्याला पाहायला मिळतो, यामध्ये शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्याकडे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चालणाऱ्या मोटारी उपलब्ध नसतात, किंवा विकत घेणे इतपत शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती नसते, त्यामुळे शेतकरी हा कायम तोट्यात जाताना दिसत आहे. म्हणून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण योजना सुरू आहेत. त्यामध्ये PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, त्यानंतर मागील त्याला शेततळे योजना, विहीर अनुदान योजना आणि त्यामध्येच आणखी एक भर पडलेली योजना म्हणजे मागील त्याला कृषी पंप योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधने हे शासनाचे लक्ष आहे.

महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या समस्या आहेत की, दिवस पाळीला लाईट नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देण्यास अनेक अडचणी येत आहेत, त्यामध्ये अनेक वेळा लाईट वेळेवर न येणे, लाईटी संदर्भाच्या अनेक अडचणी येणे, या सर्व साधारण अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सौर कृषी पंप योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या वेळेनुसार आपल्या विहिरीचे किंवा बोरवेलची मोटर चालू करता येणार आहे.

सध्या मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ देखील घेतलेला आहे. त्यामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरलेली आहे. या योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज करता येतो, अर्ज करण्यासाठी पात्रता, लाभार्थी, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखांमधून आपण पाहणार आहोत.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

सौर कृषी पंप योजना Overview

योजनेचे नाव  नाव सौर कृषी पंप योजना
द्वारा सुरू महाराष्ट्र सरकार  
लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी
उद्देश सौर कृषी पंप विकत घेण्यासाठी अनुदान देणे
अर्ज करण्याची प्रक्रिया  ऑनलाईन

 

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाच्या माध्यमातून मोफत कृषी पंप देऊन शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान वाचवावे, या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 1 लाख मागेल त्याला सौर कृषी पंप योजना टप्प्याटप्प्यात उपलब्ध करून देण्याच्या योजनेला मान्यता प्राप्त झाली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची मुख्य उद्दिष्टे

1. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व शेतकऱ्यांना अत्यंत कमी खर्चामध्ये कृषी पंप देऊन शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्याचा उद्देश आहे.
2. शेतकऱ्यांना डिझेल पंपासाठी लागणाऱ्या डिझेल खर्चापासून व विजेच्या बिलापासून सुटका करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
3. आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करावी हा देखील या योजनेचा उद्देश आहे.
4. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे व त्यांचे जीवनमान सुधरावे त्यांनी सशक्त व आत्मनिर्भर बनावे हा देखील या योजनेचा उद्देश आहे.
5. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी व डिझेलच्या पंपामुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे हा देखील उद्देश आहे.
6. शासनावर विजेचा अतिरिक्त फार कमी करण्याच्या उद्देशाने सौर कृषी पंप योजना अमलात आणली आहे.
7. एकंदरीतच शेतकऱ्यांची विजेच्या बिलापासून मुक्तता व्हावी व शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा हा मुख्य उद्देश समोर ठेवून योजना महाराष्ट्र शासनाने अमलात आणलेले आहे.

कृषी पंप योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

● मागेल त्याला कृषी पंप योजना ही योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे.

● या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सौर पंप विकत घेण्यासाठी अनुदान देण्यात येते.

● याच योजनेला अटल सौर कृषी पंप योजना या नावाने देखील ओळखले जाते.

● राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी व त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

● केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या अनेक योजना पैकी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे.

● मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेसाठी अर्जदार हा घरी बसून मोबाईलच्या साह्याने ऑनलाइन पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतो, त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही. व शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत होणार आहे.

● या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी रक्कम ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीडीच्या साह्याने जमा करण्यात येईल.

शासनच्या इतर योजना पहा 

लेक लाडकी योजना मुलगी जन्माला आल्यानंतर मुलीला मिळतात 1 लाख 1 हजार रुपये पहा संपूर्ण माहीती 

Annasaheb patil karj yojana 2024 राज्यातील तरुणांना व्यवसायासाठी दिले जाते कर्ज 

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी कोण..?

● सदर योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हेच लाभार्थी असतील.
● महाराष्ट्र राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी.
● दुर्गम भागातील शेतकरी व आदिवासी भागातील शेतकरी.
● महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजना अंतर्गत लाभ न घेतलेले शेतकरी.
● ज्या शेतकऱ्यांकडे बोर विहीर किंवा अन्य कोणतेही पाण्याचे साधन उपलब्ध असल्यास ते शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया

● ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील.

● ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकर पर्यंत शेतजमीन आहे, त्यांना 3 अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप दिले जाणार आहेत. व 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 5 अश्वशक्ती क्षमतेचे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना दिली जातील.

● मागेल त्याला सौर कृषी पंप योजनासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून 10% व अनुसूचित जमातीच्या व अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांकरिता 5% लाभार्थी हिस्सा म्हणून भरणे आवश्यक राहील.

सौर कृषी पंप योजनेच्या नियम व अटी खालील प्रमाणे

1. फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू आहे.
2. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेती जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना दिली जाणार नाही.
3. फक्त महाराष्ट्र राज्यातीलच शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. अन्य कोणत्याही घटकांना योजनेचा लाभ दिला जात नाही.
4. एका शेतात फक्त एकदाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
5. शेत जमिनीमध्ये सहहिस्से असल्यास ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
6. ज्या क्षेत्रामध्ये 60 मीटर पेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरीमध्ये सौर कृषी पंप देण्यास पात्र नाही.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Document)

1. आधार कार्ड
2. कुटुंबाचे रेशन कार्ड
3. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
4. बँक खात्याचा तपशील
5. 7/12 उतारा
6. मोबाईल नंबर ईमेल आयडी
7. इत्यादी

सरकारी योजनेसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

सदर योजनेला अर्जदाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करता येतो त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे दिलेली आहे.

● अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
● होमपेज वर गेल्यानंतर लाभार्थी सुविधा या ऑप्शनवर क्लिक करावे.
● आता पुढे अर्ज करा हा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करावे.

● आता पुढे नवीन होमपेज ओपन होईल.

● ‘पैसे भरून प्रलंबित कृषी पंप विज जोडणी ग्राहक तपशील” हा तक्ता नवीन शेतकऱ्यांनी सोडून खालील सर्व तक्ते भरून घ्यायचे आहेत.
● सर्वप्रथम अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील हा तक्ता पूर्णपणे शेतकऱ्याला भरून घ्यायचा आहे.
● पुढे अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण ही माहिती भरायची आहे.
● त्यानंतर जलस्रोत आणि सिंचन माहिती भरायची आहे.
● पुढे कृषी तपशील भरून घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यमान पंप तपशील, आवश्यक पंप तपशील व शेवटी बँक तपशील भरून घ्यायचा आहे. व शेवटी घोषणापत्र भरायचे आहे.
● आता सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायचे आहेत जसे की, सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक तपशील, पासपोर्ट आकाराची छायाचित्र हे सर्व भरून झाल्यानंतर अर्ज सादर करा हे ऑप्शन वरती क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

शासनाचे अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा
सरकारी योजनेसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

सारांश –

वरती सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप योजनासाठी अर्ज करू शकता. माहिती आवडली असल्यास इतरांना देखील शेअर करायला विसरू नका. काही अडचणी आल्यास तात्काळ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा दैनिक माझा तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तर देईल.

Leave a Comment