Mofat Pithachi Girani Yojana 2024-25 | मोफत पिठाची गिरणी योजना असा करा अर्ज..
Mofat Pithachi Girani Yojana 2024-25 : महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना, या योजनेच्या माध्यमातून महिलांनी एखादा छोटासा लघु उद्योग उभा करावा या हेतून राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांना मोफत गिरणी वाटप केल्या जातात, यावरती 100% अनुदान देखील दिले जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे महिलांना पैसे भरण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे राज्य सरकारने सुरू केलेली एक महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण योजना आहे.
महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील महिलांनी आपले स्वतःचे कुटुंब चालवण्यासाठी हातभार लावावा या हेतूने महाराष्ट्र सरकारने मोफत गिरणी वाटप योजना सुरू केलेले आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला पिठाची गिरणी चालवून आर्थिक उत्पन्न मिळवू शकतील, तसेच त्यांना रोजगार उपलब्ध होईल व संपूर्ण कुटुंबाच्या गरजा महिला देखील भागवतील हा दृष्टिकोन समोर ठेवून महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक कुटुंब हे दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. त्यामुळे उत्पन्नाचा मुख्य स्रोत त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक समस्येची झळ बसत आहे. बहुतांश कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही खूप हालाखीची व कुमकुवत आहे. त्यामुळे राज्यातील महिलांना स्वतःचा उद्योग उभा करून त्या उद्योगातून थोडेफार पैसे कमावता देखील यावे या हेतूने मोफत पिठाची गिरणी योजना ही खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्यातील मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत राज्यामध्ये असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील महिलांना मोफत पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 100% अनुदान देण्यात येते त्यामुळे महिलांना कोणत्याही प्रकारे पैसे भरण्याचे आवश्यकता भासत नाही. Mofat Pithachi Girani Yojana 2024-25
आज या लेखांमधून आपण मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेचा महिलांना कशाप्रकारे लाभ दिला जातो.? तसेच अर्ज कुठे करायचा आहे.? अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत.? लाभार्थी महिला कोण आहेत.? याची संपूर्ण माहिती या लेखांमधून घेणार आहोत त्यामुळे वाचकांनी लेख हा शेवटपर्यंत वाचावा.
वाचकांना विनंती
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवल्या जातात परंतु काही योजनेमध्ये वेळोवेळी बदल देखील केले जातात. त्यामुळे योजनेचा फॉर्म भरत असताना वाचकांनी संपूर्ण योजनेची माहिती अपडेट पद्धतीने मिळवायचे आहे.
मोफत पिठाची गिरणी योजना आढावा Overview
योजनेचे नाव | Mofat Pithachi Girani Yojana 2024-25 |
द्वारा सुरू | राज्य शासन |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील महिला |
योजनेचा उद्देश | महिलांना मोफत पिठाची गिरणी वाटप करणे |
विभाग | महिला व बालकल्याण विभाग |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
Mofat Pithachi Girani Yojana 2024-25 योजनेचा मुख्य उद्देश
● महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य ग्रामीण भागातील व शहरी भागातील महिलांनी पिठाची गिरणी हा उद्योग सुरू करून महिलांनी आर्थिक गरजा पूर्ण कराव्यात यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
● या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण हे देखील शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
● महिलांना औद्योगिक क्षेत्रामध्ये सक्षम बनवणे व कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे.
● महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे
● महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगाराची संधी देणे हे देखील शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहेत.
मोफत पिठाची गिरणी योजना मुख्य वैशिष्ट्ये
1. मोफत पिठाची गिरणी योजना ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण ण विभागातर्फे राबवली जाते.
2. महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
3. मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेमध्ये महिलांना 100% अनुदान दिले जाते. त्यामुळे महिलांकडे स्वतः कडील कोणत्याही प्रकारचे आर्थिक रक्कम भरावी लागत नाही.
4. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या जातीमधील महिलांसाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे.
Mofat Pithachi Girani Yojana 2024-25 योजनेचा फायदा
● महाराष्ट्र राज्यातील सर्व सामान्य कुटुंबातील महिलांसाठी घरगुती रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
● योजनेसाठी 100 टक्के अनुदान असल्यामुळे महिलांना कोणत्याही प्रकारे पैसे भरण्याचे आवश्यकता भासत नाही.
● राज्यातील महिलांना घरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे बाहेर जाऊन नोकरी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
● ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
● राज्यातील अनेक महिला ह्या स्वतःच्या पायावरती उभे राहून आत्मनिर्भर बनतील.
शासनाच्या इतर योजना पहा
- महाराष्ट्र राज्यातील लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांना व बालकांना आर्थिक १० लाख रुपये मदत पहा संपूर्ण योजना
- राज्यातील शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी ऊस तोडणी यंत्राच्या एकूण किमतीच्या 40% किंवा 35 लाख रुपये एवढी रक्कम या योजनेअंतर्गत अनुदान म्हणून दिली जाईल असा करा अर्ज
मोफत पिठाची गिरणी योजना नियम व अटी शर्ती
● सदर योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठीच आहे.
● महाराष्ट्र बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
● फक्त आर्थिक दृष्ट्या कुमकुवत असणाऱ्या गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
● अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय कार्यालयात नोकरी करत असता कामाँ नये.
● एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल.
● अर्जदार महिलेचे वय हे 18 ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक राहील.
● अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजारापेक्षा जास्त असू नये.
● अर्जदार महिलेला आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य राहील.Mofat Pithachi Girani Yojana 2024-25
सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा
मोफत पिठाची गिरणी योजना आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे
1. महिलेचे आधार कार्ड
2. कुटुंबाचे रेशन कार्ड
3. रहिवासी प्रमाणपत्र
4. उत्पन्नाचा दाखला
5. अनुसूचित जाती जमातीचा दाखला
6. बँक पासबुक तपशील
7. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
8. मोबाईल नंबर
9. ईमेल आयडी
10. प्रतिज्ञापत्र
मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज करण्याची प्रक्रिया
● अर्जदार महिलेला सर्वप्रथम आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय मधून किंवा जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजना चा अर्ज घ्यावा लागेल.
● अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स च्या प्रत जोडाव्या लागतील.
● भरलेला संपूर्ण अर्ज तपासून व आवश्यक ती कागदपत्रे जोडून सदरील अर्ज हा त्याच कार्यालयात जमा करावा.
● अर्ज जमा केल्यानंतर तुमच्या कागदपत्राची पडताळणी करून तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाईल.
● अशाप्रकारे मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेसाठी ऑफलाईन तुमचा अर्ज भरला जाईल. Mofat Pithachi Girani Yojana 2024-25
मोफत पिठाची गिरणी योजना | अर्ज डाऊनलोड करा |
सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप | जॉईन करा |
सारांश :
अशाप्रकारे तुम्ही Mofat Pithachi Girani Yojana 2024-25 योजना या योजनेसाठी वरील माहिती सर्व व्यवस्थितपणे वाचून अर्ज करू शकता. तुम्हाला अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचे नक्की उत्तर देऊ, माहिती आवडले असल्यास ती तर महिलांना देखील शेअर करा.