माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25 | मुलींसाठी 50 हजार रुपयांची योजना असा करा अर्ज

माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25 | मुलींसाठी 50 हजार रुपयांची योजना असा करा अर्ज

माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25 : महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जातात. देशातील मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1 ऑगस्ट 2017 रोजी माजी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली. महाराष्ट्र राज्यातील मुलींचा जन्माचा दर वाढावा व मुलगी जन्माला आल्यानंतर प्रत्येक कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, तसेच मुलींनाही समाजात समानतेची मुलांप्रमाणे वागणूक मिळावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना अमलात आणली आहे.

देशामध्ये आज देखील महिला व पुरुष यामध्ये असमानता पाहायला मिळते, त्याचबरोबर पुरुषांच्या लोकसंख्येमध्ये महिलांची लोकसंख्या याचे प्रमाण घटत चाललेले पाहायला मिळते. मुलगा हाच वंशाला दिवा हा समाजातील गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरला असल्यामुळे मुलींचे प्रमाण कमी होत चालले आहे. परंतु शासनाच्या माध्यमातून अनेक महिलांसाठी व मुलींसाठी योजना राबवल्या जातात त्याच्या माध्यमातून महिलांना समानतेची वागणूक मिळावी हाच शासनाचा मुख्य हेतू असतो. माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25

माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक कुटुंबामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर मुलीच्या माता-पित्याने एका वर्षाच्या आत नसबंदी करून घेतली की राज्य शासनाच्या माध्यमातून त्या मुलीच्या नावावर 50 हजार रुपये जमा केले जातात. तसेच दुसरी मुलगी जन्माला आल्यानंतर मुलीच्या मातापित्याने मुलीच्या जन्मानंतर नसबंदी करून घेतली असेल तर त्या मुलीच्या नावावरती 25 हजार रुपये जमा केले जातात. जेणेकरून मुली मोठ्या झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि विवाहासाठी या पैशांचा उपयोग होईल यासाठी ही योजना खूप महत्त्वपूर्ण आहे.

आज या लेखांमधून आपण माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना कोणासाठी लागू आहे.? कोण अर्ज करू शकते.? योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे.? योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे.? अर्ज कुठे व कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखांमधून पाहणार आहोत. त्यामुळे वाचकांनी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25

वाचकांसाठी सूचना

माझी कन्या भाग्यश्री योजना ही राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. परंतु योजनेमध्ये शासनाच्या माध्यमातून काही वेळेस बदल देखील केले जातात त्यामुळे योजनेचा लाभ घेत असताना किंवा योजना अर्ज करत असताना संपूर्ण योजना पाहणे आवश्यक राहील.

माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25
माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25

माझी कन्या भाग्यश्री योजना आढावा Highlight

योजनेचे नाव  माझी कन्या भाग्यश्री योजना
सुरू होण्याची तारीख 1 ऑगस्ट 2017
मिळणारा लाभ 50 हजार रुपये
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एका कुटुंबातील एक किंवा दोन मुली
उद्देश मुलींचा विकास करणे
विभाग  महिला व बालविकास विभाग 
द्वारा सुरू महाराष्ट्र शासन

 

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे मुख्य उद्दिष्टे

● महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी व आरोग्य तसेच त्यांचा सामाजिक विकास करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केलेली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25

● महाराष्ट्र राज्यातील व भारत देशातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढवणे हे देखील शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

● मुलींना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे.

● कुटुंबामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर त्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे तसेच मुलगा व मुलगी यांना समान वागणूक मिळावी हे देखील शासनाचे मुख्य उद्दिष्टे आहेत.

  1. शासनाने सुरु केली आहे  मोफत पिठाची गिरणी योजना असा करा अर्ज 

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

● माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25 ही योजना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाद्वारे चालवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे.

● या योजनेच्या माध्यमातून पहिली मुलगी जन्माला आल्यानंतर त्या कुटुंबांनी एकाच मुलीवरती कुटुंब नियोजन केले असेल तर त्या मुलीला 50 हजार रुपयांचे आर्थिक मदत शासनाच्या माध्यमातून केली जाते.

● कुटुंबामध्ये पहिली मुलगी जन्माला आल्यानंतर कुटुंब नियोजन केले नसेल, परंतु दुसरी मुलगी जन्माला आल्यानंतर जर त्या कुटुंबाने कुटुंब नियोजन केले असेल तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पंचवीस हजार रुपयाची शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.

● शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम ही मुलीच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

माझी कन्या भाग्यश्री योजना नियम व अटी खालील प्रमाणे

● माझी कन्या भाग्यश्री योजना योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील असलेल्या कुटुंबातील मुलींनाच दिला जातो.
● ज्या कुटुंबात दोन्ही मुलीच जन्माला आले आहेत अशाच कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो.
● तुझ्या कुटुंबामध्ये एक मुलगा व एक मुलगी आहेत अशा कुटुंबातील मुलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
● मुलगी ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
● या योजनेचा लाभ घेताना मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
● बालगृहातील असलेल्या मुलींना देखील या योजनेचा लाभ दिला जातो.
● मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळणार आहेत त्यापैकी दहा हजार रुपये रक्कम तिच्या कौशल्य विकासावर खर्च करावी लागेल त्यामुळे मुलीला रोजगार कायमस्वरूपी मिळू शकतो.
● माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना 1 ऑगस्ट 2017 रोजी नंतर जन्माला आलेल्या मुलींना लागू राहील ज्या कुटुंबामध्ये 1 ऑगस्ट 2017 पूर्वी मुली जन्माला आलेले आहेत अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25

सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा 

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे

1. मुलीचा जन्माचा दाखला
2. लाभार्थी कुटुंबाने एका मुलीनंतर कुटुंब नियोजन केलेली प्रमाणपत्र
3. या योजनेसाठी अर्ज करताना कुटुंबाने दोन मुली नंतर कुटुंब नियोजन केले असेल तर त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र
4. कुटुंबाचे रेशन कार्ड
5. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
6. मोबाईल नंबर
7. मुलीचे आणि आईचे संयुक्त बचत खाते
8. मुलीचे रहिवासी प्रमाणपत्र

माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25
माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25

माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

● अर्जदार पालकांना सर्वप्रथम शासनाच्या या अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे.
● सदरच्या वेबसाईट वरती गेल्यानंतर माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
● अर्जात विचारलेली सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरावी लागेल व आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडावी लागतील.
● सदरील अर्ज हा तुमच्या जवळील असलेल्या महिला व बालविकास कार्यालयात सादर करावा लागेल.
● अशाप्रकारे तुम्ही माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेसाठी अर्ज भरू शकतात. माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25

माझी कन्या भाग्यश्री योजना अधिकृत वेबसाईटला भेट द्या येथे क्लिक करा
सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

 

 

सारांश :

अशाप्रकारे तुम्ही माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25 या योजनेसाठी तुम्ही वरील संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे वाचून अर्ज करू शकता. तुम्हाला अर्ज भरत असताना कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचे नक्की उत्तर देऊ माहिती आवडली असल्यास इतर पालकांना देखील या योजनेची माहिती द्या.

Leave a Comment