महिला बचत गट कर्ज योजना | महिलांना 5 ते 20 लाखापर्यंत कर्ज असा करा अर्ज पहा संपूर्ण माहिती…
महिला बचत गट कर्ज योजना : महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकीच महिला बचत गट कर्ज योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून ही योजना राबवली जाते. राज्यातील महिलांच्या उन्नतीसाठी तसेच महिलांना स्वतःचा एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व सुरू असलेल्या एखाद्या व्यवसाय त्याचा विस्तार करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची योजना आहे.
राज्यामध्ये बहुतांश भागांमध्ये रोजगाराचे प्रमाण कमी असल्यामुळे बहुतांश कुटुंब हे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत. उत्पादनाचे कोणत्याही प्रकारचे साधन उपलब्ध नसल्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही कमजोर बनत जाते. राज्यामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने कोणती काम सहज करतात, परंतु अनेक महिलांना रोजगारासाठी स्थलांतर करून दुसऱ्या शहरात जाणे शक्य नसते, त्यामुळे त्यांना स्वतःच्या गावांमध्ये व घरापासून जवळ असलेल्या अंतरावर ते एखादा छोटासा उद्योग करता यावा या उद्देशाने शासनाने महिला बचत गट कर्ज योजना अमलात आणली आहे.
ग्रामीण भागातील अनेक महिला या उद्योग करण्यासाठी प्रयत्नशील असतात, परंतु उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची देखील आवश्यकता असते, अशा परिस्थितीमध्ये महिला असल्यामुळे अनेक बँका देखील कर्ज नाकारतात, कर्ज फेडतील का नाही याची शाश्वती बँकांना देखील नसते, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून महिला बचत गट कर्ज योजनेच्या माध्यमातून महिलांना आता कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय व भांडवल तयार करता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला देखील व्यवसायापासून वंचित न राहता उद्योगासाठी पुढे येतील.
महिला बचत गट कर्ज योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की, राज्यातील सुशिक्षित महिलांना त्यांचा एखादा उद्योग सुरू करता यावा, व कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होऊन त्यांना स्वतःच्या व्यवसायामधून नफा कमवता यावा यासाठी शासनाच्या माध्यमातून महिला बचत गट कर्ज योजना सुरू केली आहे, या योजनेसाठी आवश्यक पात्रता कोणती.? योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकते.? योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार.? अर्ज कसा करायचा.? याची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत तर वाचकांनी लेख हा शेवटपर्यंत वाचावा.
वाचकांना सूचना :
महिला बचत गट कर्ज योजना ही राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे चालवण्यात येते, योजनेमध्ये शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी बदल देखील केले जातात, त्यामुळे वाचकांनी योजनेची सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे.
महिला बचत गट कर्ज योजना Highlight
योजनेचे नाव | महिला बचत गट कर्ज योजना |
लाभार्थी | राज्यातील बचत गटातील महिला |
लाभ | व्यावसाय सुरू करण्यासाठी 5 लाखापासून ते 20 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे |
व्याजदर | 4 टक्के |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
महिला बचत गट कर्ज योजना मुख्य उद्दिष्टे
● महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या इच्छुक महिला आहेत, त्या इच्छुक महिलांना महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे व बेरोजगारी कमी करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
● राज्यातील बेरोजगार महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबांना आर्थिक हातभार लावता यावा यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे.
● महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारांची संख्या कमी करणे.
● महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम वाढवणे व स्वावलंबी बनवणे.
● महिलांना देखील पुरुषांच्या बरोबरीने वागणूक मिळावी, त्यासाठी महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात, त्यामुळे महिला बचत गट कर्ज योजनेच्या माध्यमातून महिलांना कर्ज वाटप केले जाते.
● एकंदरीतच राज्यातील औद्योगिक क्षेत्राला चालना देने, महिलांना रोजगार मिळवून देणे, त्याच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवणे हेच शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
महिला बचत गट कर्ज योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
1. महिला बचत गट कर्ज योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे चालवली जाते, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना 5 लाखापासून ते 20 लाखापर्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
2. राज्यातील बेरोजगार महिलांना व्यवसायासाठी आकर्षित करणारी ही योजना आहे.
3. महिला बचत गट कर्ज योजनेच्या माध्यमातून 95% कर्ज हे राष्ट्रीय महामंडळाकडून व 5% कर्ज हे राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते.
4. महिला बचत गटातील महिलांना या योजनेचा मुख्यता सर्वाधिक जास्त लाभ होतो.
5. या योजनेसाठी नियम व अटी फार कमी प्रमाणात आहेत त्यामुळे महिलांना सहज कर्ज उपलब्ध होऊ शकते.
शासनाच्या इतर योजना पहा
- शबरी घरकुल योजना अंतर्गत 18 हजार 544 कुटुंबांना घरे बांधून देण्याचे लक्ष असा करा अर्ज
- इंदिरा गांधी पेन्शन योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. पहा संपूर्ण योजना
महिला बचत गट कर्ज योजनेचे लाभार्थी
● महाराष्ट्र राज्यातील बचत गटातील ज्या महिला आहेत, त्या महिलांना महिला बचत गट कर्ज योजनेचा लाभ दिला जातो.
कर्जाची मर्यादा :
महिला बचत गट कर्ज योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी 5 लाख ते 20 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
व्याजदर :
महिला बचत गट कर्ज योजनेमध्ये 5 ते 20 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते, या कर्जावरती 4% व्याजदर आकारला जातो.
कर्ज परतफेडीचा कालावधी :
महिला बचत गट कर्ज योजना अंतर्गत घेतलेले कर्ज हे 3 वर्षांमध्ये व्याजासकट परत करणे अनिवार्य आहे.
महिला बचत गट कर्ज योजनेच्या नियम व अटी खालील प्रमाणे
● फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
● महाराष्ट्राच्या राज्याबाहेरील असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
● व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांना हे कर्ज दिले जाते, पुरुषांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जात नाही.
● योजनेत सहभागी होणाऱ्या महिलेचे वय काय 18 वर्षे ते 50 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
● कर्जत दिल्या गेलेल्या तारखेपासून चार वर्षाच्या आत व्याजासकट परत करणे अनिवार्य आहे.
● ज्या महिलांचा बचत गट स्थापन करून दोन वर्ष पूर्ण झाले आहे अशाच महिलानां बचत गट योजनेचा लाभ दिला जातो.
● अर्जदार महिला ही महिला बचत गटाची सदस्य असणे गरजेचे आहे.
● अर्जदार महिलाकडे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक राहील.
● महिला बचत गटाचे अर्जदार महिलाही कुठलेही बँकेची किंवा वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेचे थकबाकीदार असू नये.
● अर्जदार ग्रामीण भागातील महिलेसाठी त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 98 हजारापेक्षा कमी असावे.
● अर्जदार शहरी महिलांसाठी 1.2 लाख रुपये यापेक्षा जास्त असता कामा नये.
● महिला बचत गटातून कोणत्याही महिलांनी खोटी माहिती देऊन कर्ज मिळवले असेल तर त्या महिलेवर ती दंडात्मक कारवाई करून योजनेच्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येते.
महिला बचत गटाचे मुख्य फायदे
● या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना कर्ज उपलब्ध उपलब्ध करून दिल्यामुळे राज्यातील महिला स्वतःचा उद्योग सुरू करतील, व त्या महिला सशक्त आत्मनिर्भर होतील.
● राज्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास वाढेल व महिलांचे देखील जीवनमान सुधारेल.
● राज्यातील महिलांचा सामाजिक आर्थिक विकास होण्यासाठी मदत होईल
● महिला बचत गट योजनेच्या माध्यमातून महिलांना कर्ज मिळाल्यास राज्यातील महिला स्वतःच्या घरापासून व स्वतःच्या गावांमध्येच एखाद्या व्यवसाय सुरू करतील, त्यामुळे महिलांना इतर शहरांमध्ये नोकरीसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
● राज्यातील महिला एखादा नवीन व्यवसाय सुरू करतील व त्यातून रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील.
● राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी इतरांकडे पैसे मागण्याच्या आवश्यकता भासणार नाही.
● या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागातील महिलांचा स्तर उंचावेल.
● एकंदरीतच महिला बचत गट कर्ज योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी संधी मिळतील, व त्यातून रोजगार निर्मिती होईल, तसेच सामाजिक, आर्थिक महिलांचा विकास होईल महिलांचे जीवनमान देखील सुधारेल यामुळे या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या अनेक फायदे होणार आहेत.
सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा
महिला बचत गट कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Important Document)
1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. पॅन कार्ड
4. रहिवासी प्रमाणपत्र
5. जन्माचा दाखला
6. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
7. बँकेचा तपशील
8. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
9. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
10. शपथपत्र
11. मोबाईल नंबर
12. ई-मेल आयडी
13. इत्यादी
महिला बचत गट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
महिला बचत गट कर्ज योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे पहा
● अर्जदार महिलेला सर्वात प्रथम आपल्या स्वतःच्या जिल्हा कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन महिला बचत गट कर्ज योजनेचा अर्ज घ्यायचा आहे. (तुम्ही ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करून घेऊ शकता त्यासाठी क्लिक येथे करा)
● अर्जात विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे व विचारलेले योग्य ती कागदपत्रे त्यासोबत जोडायची आहेत.
● संपूर्ण भरलेला अर्ज हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन तिथेच जमा करायचा आहे.
● जमा केलेल्या अर्जावरती पडताळणी होऊन तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाईल.
● अशाप्रकारे तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल.
महिला बचत गट कर्ज योजना अर्ज | डाऊनलोड करा |
सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप | जॉईन करा |
सारांश :
अशाप्रकारे तुम्ही वरील माहिती व्यवस्थितपणे वाचून महिला बचत गट कर्ज योजनासाठी अर्ज करू शकता,अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, आम्ही त्याचे नक्की उत्तर देऊ. माहिती आवडली असल्यास इतर महिलांना देखील ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्याचा लाभ त्यांना होईल.