Magel tyala shettale Yojana 2024-25 : असा करा अर्ज पहा संपूर्ण माहिती..

Magel tyala shettale Yojana 2024-25 : असा करा अर्ज पहा संपूर्ण माहिती..

Magel tyala shettale Yojana 2024-25 : देशामध्ये कृषी क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असून आधुनिक पद्धतीने शेती क्षेत्राकडे देशातील तरुण वळलेले आलेले आहेत. परंतु देशांमध्ये ग्रामीण भागामध्ये आज देखील शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करत आहेत. यामध्ये शारीरिक कष्टाची कामे करणे, शेतीमधील कामासाठी भरपूर मेहनत आणि जास्त वेळ लागणे, पारंपारिक पद्धतीने तीच-तीच पिके घेणे यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. परंतु शासनाच्या माध्यमातून अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवून शेतकऱ्यांचे अधिक अधिक उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष दिले जाते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना अंमलात आणली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांना शाश्वत पाण्याचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नियोजन विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली ‘मागेल त्याला शेततळे’ ही एक योजना महत्त्वाची आहे. Magel tyala shettale Yojana 2024-25

राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक हे पारंपारिक शेती करत असून, अनेक शेतकरी आपले जीवन दारिद्र्य रेषेखालील जगत असतात. कुटुंबाचे जीवन हे शेती पिकावर अवलंबून असल्यामुळे अणे शेतकरी शेतीसाठी बँका तसेच सावकारी कर्ज घेततात, शेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते त्यामुळे पाऊस जर नाही पडला तर शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान होते. घेतलेले कर्ज शेतकऱ्यांना देता येत नाही, त्यामुळे अनेक शेतकरी हे अडचणीत सापडतात, यातूनच आत्महत्या सारखे प्रश्नही निर्माण होतात. अनेक शेतकऱ्यांच मानसिक खच्चीकरण होते, यातून मार्ग काढण्यासाठी व शेतीला शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने मागील त्याला शेततळे ही योजना सुरू केली आहे.

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, व पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग हा पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे. या भागामध्ये सर्वाधिक जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, पावसात सतत पडणारा खंड व पाण्याची टंचाई पिकांचे होणारे अतोनात नुकसान, या शेतकऱ्यांच्या मुख्य समस्या आहेत, शेतीच्या उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे हे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यवर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन च्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणे, तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून मागील त्याला शेततळे योजना फार महत्त्वाची आहे.

Magel tyala shettale Yojana 2024-25 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची मुबलक प्रमाणात साठवणूक करता येते. साठवलेले पाणी हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पिकांसाठी वापरता येते, त्यामुळे या शेततळ्याचा दुष्काळी भागामध्ये अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून मागील त्याला शेततळे ही योजना कोणासाठी आहे.? अर्ज फोन करू शकत.? कागदपत्रे कोणती लागणार आहेत.? लाभार्थी कोण आहेत.? अर्ज कसा करायचा.? याची संपूर्ण माहिती या लेखांमधून पाहणार आहोत, वाचकांनी हा लेख शेवटपर्यंत वाचावा.

Magel tyala shettale Yojana 2024-25
Magel tyala shettale Yojana 2024-25

Magel tyala shettale Yojana 2024-25 Highlight

योजनेचे नाव मागेल त्याला शेततळे योजना
लाभ 75000/- हजार अनुदान 
उद्देश शेतात शेततळे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य
लाभार्थी राज्यातील शेतकरी
राज्य  महाराष्ट्र 
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

 

Magel tyala shettale Yojana 2024-25 योजनेचे मुख्य उद्दिष्टे

● महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये सतत दुष्काळजन्य परिस्थिती असते, अशा भागातील शेतकऱ्यांना पाण्याचा शाश्वत स्रोत तयार करण्यासाठी त्यांना शेततळे खोदण्यासाठी आर्थिक अनुदान उपलब्ध करून देणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
● राज्यातील शेतकऱ्यांचे पाण्याविना होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी व शेतीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे.
● राज्यातील तरुणांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे व कृषी क्षेत्राचा झपाट्याने विकास करणे.
● राज्यातील अनेक शेतकरी हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत, त्यांचा सामाजिक आर्थिक विकास झालेला नाही. अशा शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शेततळे देऊन शेतीमधून पिकांचे उत्पादन वाढवणे व त्यातून आर्थिक शेतकऱ्यांचा फायदा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Magel tyala shettale Yojana 2024-25 योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

1. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मागील त्याला शेततळे ही योजना सुरू केलेली आहे.
2. मागेल त्याला शेततळे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याचा स्रोत तयार होत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
3. योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते.
4. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असल्यामुळे हे योजनेला एक वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे.
5. सदर योजनेचा अर्ज कोणताही शेतकरी भरू शकत असल्यामुळे ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे. Magel tyala shettale Yojana 2024-25

मागेल त्याला शेततळे योजने मधून दिले जाणारे आर्थिक सहाय्य

● मागेल त्याला शेततळे योजना अंतर्गत अनुदानाची कमाल रक्कम 75 हजार रुपये इतकी राहील जी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी च्या साह्याने जमा करण्यात येते.

लाभार्थ्यांची निवड खालील घटकांनुसार करण्यात येते

1. सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्यरेषेखालील जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना किंवा ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे अशा वारसांना निवड प्रक्रियेमध्ये सूट देण्यात येऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येते.
2. इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणारे शेतकऱ्यांना जेष्ठतेनुसार त्यांच्या अर्जांनुसार प्राधान्यक्रम देण्यात येतो.

शासनाच्या इतर योजना पहा 

  1. आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत, किंवा जे दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत, अशा नागरिकांना शबरी घरकुल योजना लागू पहा सविस्तर माहीती.
  2. E-Peek Pahani Information 2024 ई-पिक पहाणी कशी करावी पहा संपूर्ण माहीती.

Magel tyala shettale Yojana 2024-25 योजनेच्या नियम व अटी

1. फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच मागील त्याला शेततळे योजनेचा लाभ दिला जातो.
2. महाराष्ट्र बाहेरील जर शेतकऱ्यांची शेती असेल तर या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
3. शेतकऱ्यांच्या नावावरती कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी.
4. निश्चित केलेल्या आकारमानाचे शेततळे घेणे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक राहील.
5. शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी किमान तीन महिन्याचा कालावधी दिला जाईल त्या वेळेमध्ये शेततळे पूर्ण करण्यात यावे.
6. काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाची मागणी करता येईल.
7. कामासाठी आगाव रक्कम कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना मिळणार नाही.
8. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 75 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाईल. शेततळे बांधण्यासाठी जास्त खर्च आल्यास उर्वरित सर्व खर्च शेतकऱ्यांना स्वखर्चाने भरावा लागेल.
9. यापूर्वीच्या शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी अर्ज केले आहेत, किंवा त्यांनी शेततळ्याचा लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना पुन्हा शेततळे दिले जाणार नाही.
10. पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही, अथवा वाहून जाणार नाही किंवा शेततळ्याच्या दुरुस्तीचा खर्च हा शासन करणार नाही.
11. शेततळ्यातून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था शेतकऱ्याने स्वखर्चाने करायचे आहे.

सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा 

मागेल त्याला शेततळे योजनेसाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे

1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. रहिवासी प्रमाणपत्र
4. जातीचे प्रमाणपत्र
5. दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र
6. आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला (आवश्यक असल्यास)
7. मोबाईल नंबर
8. ईमेल आयडी
9. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
10. सातबारा उतारा (7/12)
11. 8 अ उतारा
12. प्रतिज्ञापत्र
13. इत्यादी

Magel tyala shettale Yojana 2024-25 अर्ज करण्याची प्रक्रिया

● अर्जदार व्यक्तीला शासनाच्या या अधिकृत वेबसाईटवर सर्वप्रथम जावे लागेल.
● होमपेज वर गेल्यानंतर मागेल त्याला शेततळे या पर्यावरण क्लिक करावे.
● आता तुमच्यासमोर माहिती त्याला शेततळे योजनेचा अर्ज उघडे त्यात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे सोबत सोडून संपूर्ण अर्ज तपासून सबमिट या बटणावर क्लिक करावे.
● अशाप्रकारे तुमचा ऑनलाईनच्या माध्यमातून अर्ज भरला जाईल.
● तुम्हाला मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी अडचणी येत असतील तर तुमच्या जवळच्या महा-ई सेवा केंद्रातून किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता.

मागेल त्याला शेततळे योजना अर्ज करण्यासाठी क्लिक करा
सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा

 

सारांश :

अशाप्रकारे तुम्ही Magel tyala shettale Yojana 2024-25 वरील माहिती सर्व व्यवस्थित वाचून मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी अर्ज करू शकता, अर्ज करताना तुम्हाला अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचे उत्तर देऊ व निराकरण करू, माहिती आवडली असल्यास इतर शेतकऱ्यांनी देखील सांगा व इतर शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment