लेक लाडकी योजना 2024 : असा करा अर्ज संपूर्ण माहिती

लेक लाडकी योजना 2024 : असा करा अर्ज संपूर्ण माहिती

लेक लाडकी योजना 2024 : देशामध्ये आज देखील मुलगा आणि मुलगी हा दुजाभाव केला जातो, मुलगी जन्माला आल्यानंतर बऱ्याच घरामध्ये प्रत्येकाला दुःख होते, महिलांना सन्मानपूर्वक वागणूक आजही मिळत नाही, महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पुरुषांच्या पेक्षा वेगळा आहे. समाजामध्ये तिला मानसन्मान दिला जात नाही. भारतासारख्या देशामध्ये आज येथील पितृसत्ताक कुटुंब पद्धती अस्तित्वात आहेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये पुरुषांचे वर्चस्व असलेला आपल्याला पाहायला मिळते. परंतु लेक लाडकी ही योजनेच्या माध्यमातून महिलांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी तसेच मुलगी जन्माला आल्यानंतर घरामध्ये आनंद निर्माण व्हावा, या दृष्टिकोनातून लेक लाडकी योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे.

ग्रामीण भागामध्ये महिलांना “चूल आणि मूल” या दृष्टिकोनातून बघितले जाते, मुलींचे शिक्षणाला फारसे महत्त्व दिले जात नाही मुलगी जन्माला आल्यानंतर ती कुटुंबामध्ये ओझं आहे असं समजलं जातं हे संपूर्ण नकारात्मक विचार बदलण्यासाठी व समाजामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने सकारात्मक विचार करावा या दृष्टिकोनातून लेक लाडकी योजनेला महत्व प्राप्त झाले आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर भविष्यातील शिक्षणाची चिंता पालकांना निर्माण होते. मुलींचे शिक्षणाचे चिंता मिटावी त्यासाठी मुलींना शासनाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्यक निर्माण करून दिले जाते. त्यामुळे मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलीच्या शिक्षणासाठी त्या आर्थिक सहाय्याचा उपयोग केला जाऊ शकतो, त्यामुळे “लेक लाडकी ही योजना” महत्त्वाची आहे. या योजनेसाठी पात्रता कागदपत्रे अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आज आपण पाहणार आहोत.

लेक लाडकी योजना 2024
लेक लाडकी योजना 2024

लेक लाडकी योजना Overview

योजनेचे नाव  लेक लाडकी योजना
विभाग  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
लाभार्थी  आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली
उद्देश मुलींचा सामाजिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या विकास करणे
अर्ज करण्याची प्रक्रिया  ऑनलाइन व ऑफलाइन

 

लेक लाडकी योजनेचे मुख्य उद्दिष्टे

1. महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या मुलींचा सर्वांगीण विकास साधने.
2. मुलींना शिक्षण घेण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे.
3. मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीबद्दल सकारात्मक विचार निर्माण करणे.
4. बालविवाह रोखणे.
5. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
6. मुलींचे मनोधैर्य वाढवणे.
7. मुलींना आर्थिक दृष्ट्या मदत करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे व शिक्षणासाठी त्यांच्यामध्ये आवड निर्माण करणे.
8. एकंदरीतच मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून त्यांचे बळकटीकरण करणे हे या योजनेमध्ये मुख्य उद्दिष्ट आहेत.

लेक लाडकी योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

लेक लाडकी योजना 2024 ही महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून राबवली जाणारी ही एक महत्वकांक्षी योजना आहे.

● ग्रामीण भागातील मुलींच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे.

● आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी व त्यांच्या पालन पोषणासाठी आणि इतर वैयक्तिक खर्चासाठी या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

● 1 एप्रिल 2023 पासून नव्याने लागू झालेली ही योजना घरी कुटुंबातील मुलींसाठी एक वरदान ठरलेली आहे.

● लेक लाडकी योजना 2024 या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने थेट जमा करण्यात येते.

योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे आर्थिक सहाय्य खालील प्रमाणे

कालावधी  रक्कम
मुलीच्या जन्मनंतर 5,000/- रुपये
मुलगी इयत्ता 1ली मध्ये गेल्यावर  6,000/- रुपये
मुलगी 6वी मध्ये गेल्यावर  7,000/- रुपये
मुलगी 11वी मध्ये गेल्यावर  8000/- रुपये
मुलगी 18 वर्षाची झाल्यावर  75,000/- रुपये
एकूण लाभाची रक्कम  1,01,000/- रुपये

 

लेक लाडकी या योजनेची लाभार्थी कोण.?

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील (पिवळे व केशरी रेशन कार्डधारक) या कुटुंबातील मुली लेक लाडकी योजना 2024 साठी पात्र असतील.

लेक लाडकी योजना नियम व अटी

● लेक लाडकी योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठीच आहे.

● या योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्याच्या बाहेर या मुलींना दिला जात नाही.

● राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्या कुटुंबाकडे आहे अशा कुटुंबातील मुलींनाच योजनेचा लाभ दिला जातो.

● अर्जदार मुलगीची आर्थिकदृष्ट्या गरीब असणे गरजेचे आहे.

● लेक लाडकी योजना 2024 मिळवण्यासाठी मुलींनी शिक्षण घेणे गरजेचे आहे.

● मुलीच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त असू नये.

● लेक लाडकी योजना या योजनेचा लाभ हा फक्त मुलींनाच दिला जातो.

● मुलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.

● एक एप्रिल 2023 रोजी पासून जन्माला येणाऱ्या दोन मुलींनाच ही योजना लागू राहील. त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी असल्यास फक्त मुलीलाच या योजनेचा लाभ लागू होईल.

● पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता-पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

● दुसरी प्रसूती झाल्यानंतर कुटुंबातील मातापित्याने कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.

लेक लाडकी योजनेचे मुख्य फायदे

1. लेक लाडकी योजना 2024 योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या सर्वसाधारण मुलींना 98 हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
2. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यतेतून मुलींना स्वतःचे शिक्षण पूर्ण करता येते.
3. मुले स्वतःच्या शिक्षणासाठी स्वालंबी बनतील.
4. राज्यातील मुलींसाठी शिक्षण घेणे सोपे होईल व शिक्षणासाठी प्रोत्साहन ही मिळेल.
5. समाजामध्ये मुलींबद्दल आदर निर्माण होईल व नकारात्मक विचार बदलते व मुलगी जन्माला आल्यानंतर मुलीबद्दल सकारात्मक विचार वाढतील.

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Document

● आधार कार्ड
● कुटुंबाचे रेशन कार्ड
● बँक खात्याचा तपशील
● मुलीचे बँक खाते नसल्यास त्याच्या आई-वडिलांचे बँक खात्याचा तपशील
● भ्रमणध्वनी क्रमांक
● पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
● जन्माचा दाखला
● 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदान कार्ड
● स्वयघोषणापत्र

शासनच्या इतर योजना पहा 

1. Vasantrao Naik Karj Yojana 2024 राज्यातील तरुणांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध 

2. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शेतकर्यांना मिळतो दोन लाखाचा विमा 

 

लेक लाडकी योजना 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया

लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करता येतात.

सरकारी योजनेसाठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा. 

ऑफलाइन प्रक्रिया –

अर्जदार व्यक्तीला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात महिला व बालविकास विभागात जावे लागेल व लेक लाडकी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
● अर्जात विचारलेले सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील.
● संपूर्ण भरलेला अर्ज हा व्यवस्थित तपासून सदरच्या कार्यालयात तो अर्ज जमा करावा.

लेक लाडकी योजनेची माहिती पीडीएफ  Click Here
लेक लाडकी योजना फॉर्म Click Here
लेक लाडकी योजनेचा शासन निर्णय Click Here
सरकारी योजनेसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

सारांश –

लेक लाडकी योजना 2024 अशाप्रकारे तुम्ही वरील दिलेल्या माहितीप्रमाणे तुमच्या कुटुंबातील मुलींसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकता. माहिती आवडली असेल चित्राने देखील शेअर करा जेणेकरून मुलगी जन्माला आल्यानंतर या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

Leave a Comment