
Ladki Bahin Yojana Online Apply 2025
Ladki Bahin Yojana Online Apply 2025 | लाडकी बहीण बहिण योजनेचे अर्ज सुरू….
Ladki Bahin Yojana Online Apply 2025 : महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारने विधानसभा निवडणूक 2024 च्या पूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेची सुरुवात 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात केली. 2024 च्या निवडणुका पूर्वी व दोन निवडणुका झाल्यानंतरही संपूर्ण देशभरात चर्चेत असलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना सुरू होऊन आठ महिने झाले व लाडक्या बहिणीच्या खात्यात प्रत्येकी महिन्याला 1500 रुपये जमाही केले जातात. पुढील नवा हप्ता हा मार्चमध्ये जमा देखील होईल. खरंतर योजनेची सुरुवात ही 1 जुलै 2024 पासून सुरू झाली असली तरी राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 15 ऑक्टोबर 2024 ही होती.
Ladki Bahin Yojana Online Apply 2025 योजनेचा लाभ हा राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना राज्य शासनाच्या माध्यमातून दिला आहे असे शासनाकडून सांगण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज भरता येत होते, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून नवीन अर्ज प्रक्रिया बंद ठेवली होती. परंतु सरकारच्या माध्यमातून आता या योजनेमध्ये बदल करून योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला पात्र असणार आहेत व पात्र महिन्याला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये वरून 2100 रुपये देखील देण्याची शासनाची मानसिकता आहे. त्यामुळे राज्यातील ज्या महिलांचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले हे अशा महिलांनी मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात.? अर्ज कुठे करायचा.? पात्रता काय आहे.? याची संपूर्ण माहिती या लेखांमधून घेणार आहोत त्यामुळे वाचकांनी लेख हा शेवटपर्यंत वाचावा. [Ladki Bahin Yojana Online Apply 2025]
वाचकांना विनंती :
Ladki Bahin Yojana Online Apply 2025 या योजनेमध्ये शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी बदल देखील केले जातात, ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख असो किंवा लाडक्या बहिणींसाठी निकष असतील, किंवा अपात्र ठरवण्याची प्रक्रिया यामध्ये वेळोवेळी बदल करून लाडकी बहिणी योजना ही वारंवार अपडेट केली जात आहे. त्यामुळे वाचकांनी अर्ज करण्यापूर्वी किंवा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ पाहणे गरजेचे आहे.

Ladki Bahin Yojana Online Apply 2025 Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील गरीब व सर्वसाधारण महिला |
उद्दिष्ट | राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे |
योजनेची सुरुवात | 1 जुलै 2024 |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
शासनाचे अधिकृत संकेतस्थळ | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मुख्य उद्दिष्टे
● मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देऊन त्यांचा आर्थिक विकास करणे.
● राज्यातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा व महिलांचे आर्थिक सक्षमकरण हे देखील शासनाचे मुख्य उद्दिष्टे आहेत.
● राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये व खेड्यापाड्यांमध्ये अनेक महिला ह्या दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये आर्थिक मदत करणे हे शासनाचे धोरण आहे.
● दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबामध्ये आर्थिक मदत म्हणून शासनाच्या माध्यमातून पंधराशे रुपये महिलांच्या खात्यावरती जमा केले जातात.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
● सदरील योजना ही 2024 ला सुरू केली असून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जातात.
● Ladki Bahin Yojana Online Apply 2025 योजनेच्या माध्यमातून शासनाने आतापर्यंत पंधराशे रुपयाचे आठ हप्ते महिलांच्या थेट खात्यावरती जमा केलेले आहेत.
● सदरील योजना ही अतिशय महत्त्वपूर्ण असून योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ही सोपी ठेवण्यात आले आहे.
● सदरील योजनेसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने किंवा मोबाईल ॲप द्वारे सहज महिला घरी बसून करू शकतात त्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयात जाऊन फेऱ्या मारण्याचे महिलांना आवश्यकता भासत नाही.
● अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारचे पैसे आकारले जात नाहीत त्यामुळे योजनेमध्ये सुलभता आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता
● अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
● महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांसाठी ही योजना नाही.
● अर्जदार महिलेचे वय हे 21 ते 65 दरम्यान असावे.
● ज्या कुटुंबातील महिला अर्ज करत आहे त्या कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असू नये.
● अर्जदार महिलाही सरकारी नोकरीला असता कामा नये.
● अर्जदार महिलेच्या नावावरती कोणतेही चार चाकी वाहन असू नये.
● अर्ज करण्यासाठी महिलेला आवश्यक ती कागदपत्रे देणे बंधनकारक असे.
● अर्जदार लाभार्थी महिलेचे अधिकृत बँकेत खाते असणे गरजेचे आहे.
● बँक खात्याला आधार लिंक असणे अनिवार्य आहे.
● एकंदरीतच महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेले व दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या सर्वसाधारण महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
लाडकी बहीण योजनेसाठी या महिला अपात्र
● ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे.
● ज्या महिला सरकारी नोकरीत कायमस्वरूपी आहेत.
● ज्या महिला शासनाच्या इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असतील त्या महिला.
● ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे त्या महिला अपात्र ठरतील. (ट्रॅक्टर वगळून) Ladki Bahin Yojana Online Apply 2025
लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे ( Important Documents)
1. अर्जदार महिलेचे आधार कार्ड
2. अधिकृत बँकेचे पासबुक (आधार लिंक असणे अनिवार्य)
3. अधिवास प्रमाणपत्र (आदिवासी हे प्रमाणपत्र नसेल तर जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक)
4. उत्पन्नाचा दाखला (उत्पन्नाचा दाखला नसेल तर केसरी किंवा पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड)
5. हमीपत्र
6. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
7. इत्यादी
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा.?
Ladki Bahin Yojana Online Apply 2025 या योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही प्रकारे महिला अर्ज सादर करू शकतात त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे पाहूया.

1. ऑनलाइन प्रक्रिया :
● ज्या अर्जदार महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्या महिलांनी सर्वप्रथम शासनाच्या या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
● सदरील संकेतस्थळावर गेल्यानंतर अर्जदार महिलेला आपले प्रोफाइल बनवून घ्यायचे आहे.
● त्यानंतर पुढे तुम्हाला लॉगिन करून अर्ज भरायचा आहे.
● अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरून आवश्यक असणारी कागदपत्रे, फोटो, अपलोड करायचे आहेत.
● त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे.
● अशाप्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
ऑफलाइन प्रक्रिया :
● सर्व प्रथम अर्जदार महिलांना Ladki Bahin Yojana Online Apply 2025 योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत.
● सदरील कागदपत्र घेऊन अंगणवाडी केंद्रामधील कर्मचारी महिलाशी संपर्क करून तो अर्ज त्यांच्याजवळ भरायचा आहे.
● भरलेला अर्ज अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडे सादर करायचा आहे.
● सदरील अर्ज हा अंगणवाडी सेविका कडून ऑनलाईन पद्धतीने सादर केला जातो व मंजुर ही केला जातो.
लाडकी बहीण योजना अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
येथे क्लिक करासरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
सारांश :
अशाप्रकारे तुम्ही Ladki Bahin Yojana Online Apply 2025 योजनेसाठी पात्र असाल तर योजनेसाठी अर्ज सादर करू शकता, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण योजना असून प्रत्येक महिला पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यामुळे राज्यातील 21 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांनी अर्ज करायचे आहेत. तुम्हाला अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा नक्की आम्ही त्याचे उत्तर देऊ.
लाडकी बहीण योजना FAQ
Q1. लाडकी बहीण योजना कोणासाठी आहे.?
Ans : राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या सर्व साधारण महिलांसाठी ही योजना आहे.
Q2. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा नववा हप्ता कधी मिळणार.?
Ans : फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्याचे एकत्रित 2 हप्ते मिळून 3 हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये 8 मार्च रोजी वितरित केले जाणार आहेत.