Krushi Drone Yojana 2024 | कृषी ड्रोन योजना पहा संपूर्ण माहिती

Krushi Drone Yojana 2024 | कृषी ड्रोन योजना पहा संपूर्ण माहिती

Krushi Drone Yojana 2024 : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. कृषीप्रधान देशांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही शेती वरती अवलंबून आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून असो किंवा राज्य शासनाच्या अंतर्गत विविध शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे कृषी ड्रोन अनुदान योजना, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये फवारणी करण्यासाठी उपयुक्त असे ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून शेतकऱ्यांना शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा व शेतीची फवारणी ही कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये करता येईल या दृष्टिकोनातून कृषी ड्रोन अनुदान योजना शासनाने सुरू केलेली आहे.

पारंपरिक पद्धतीने शेती केल्याने शेतकऱ्यांना कष्टाची कामे तसेच शेतामधील कामे करण्यासाठी अधिकचा वेळ लागतो, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करत असताना शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये व कमी वेळात शेती करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. अलीकडच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीमध्ये अधिकचे उत्पन्न काढले जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे फायदेशीर ठरत आहे.

देशातील शेतकरी हा पीक संरक्षणासाठी शेतात फवारणी करण्यासाठी पाठीवरच्या पंपाचा वापर करतात तसेच फवारणी करत असताना शेतकऱ्यांनजवळ कीटकनाशकापासून संरक्षणासाठी काहीच सुविधा उपलब्ध नसतात, त्यामुळे अनेक शेतकरी हे त्वचेच्या आजाराने त्रस्त आहेत. व अनेक शेतकऱ्यांना विषबाधा होऊन त्यामध्ये शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आपण पाहिलेलं असेल. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमध्ये फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्याचा विचार केला गेला, त्यासाठी Krushi Drone Yojana 2024 अनुदान देण्यात येणार आहे.

या ड्रोन अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना कोणती कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत, तसेच या योजनेसाठी लाभार्थी शेतकरी कोण असणार, अर्ज कुठे करायचा, ड्रोन खरेदीसाठी अनुदान किती मिळणार आहे. या सर्व गोष्टीची आपण माहिती पाहणार आहोत तर लेख शेवटपर्यंत वाचावा.

Krushi Drone Yojana 2024
Krushi Drone Yojana 2024

Krushi Drone Yojana 2024 Highlight

योजनेचे नाव  Krushi Drone Yojana 2024
राज्य  महाराष्ट्र
सुरुवात 2023
विभाग  कृषी विभाग
लाभार्थी  महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
मिळणारा लाभ  ५ लाखांचे अनुदान
अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन

 

Krushi Drone Yojana 2024 मुख्य उद्दिष्टे

1. कृषी ड्रोन अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेतामध्ये फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना कमी वेळेत व कमी खर्चात शेतामध्ये फवारणी करता येणार आहे. व त्या माध्यमातून पिकांचे संरक्षण करण्याचा मुख्य उद्देश आहे.
2. पारंपारिक पद्धतीने शेती करत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ड्रोन अनुदान योजना अमलात आणली आहे.
3. फवारणी करत असताना शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
4. शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतामध्ये अधिक उत्पन्न कसे वाढवता येईल, या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.
5. शेतामध्ये फवारणी करत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच ड्रोन खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करण्यास लागू नये तसेंचबआर्थिक मदतीसाठी इतरावरती अवलंबून राहू नये हा दृष्टिकोन समोर ठेवून कृषी ड्रोन हे योजना सुरू केले आहे.

कृषी ड्रोन अनुदान योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

● केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी ड्रोन अनुदान योजना ही संपूर्ण देशात सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे देशातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

● मुख्यतः ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी ड्रोन च्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा दृष्टिकोन आहे.

● Krushi Drone Yojana 2024 या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना अर्ज करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

● कृषी ड्रोन अनुदानाची मिळणारी रक्कम ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या DBT च्या सहाय्याने थेट अकाउंट वर जमा करण्यात येणार आहे.

शासनच्या इतर योजना पहा 

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) महाराष्ट्र मधील लघु आणि मध्यम उद्योगांना स्वयंरोजगार आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक स्वरूपाची या योजनेमधून मदत केली जाते.

 मागेल त्याला कृषी पंप योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मोफत कृषी पंप दिला जातो.

कृषी ड्रोन अनुदानाची मिळणारी रक्कम खालील प्रमाणे

विद्यापीठे व सरकारी संस्था 100% अनुदान (10 लाखापर्यंत)

शेतकरी उत्पादक संस्था 75% अनुदान (7 लाख 50 हजारांपर्यंत अनुदान)

शेतकरी उत्पादक संस्थाने ड्रोन भाड्याने घेतलेल्या (प्रति हेक्टर 6 हजार रुपये अनुदान)

संस्थानी कृषी ड्रोनचे प्रात्यक्षिक राबवल्यास 3 हजार अनुदान

अवजारे सेवा सुविधांना ड्रोन खरेदी करताना 50% अनुदान (5 लाखापर्यंत अनुदान)

कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरू केल्यास 5 लाखापर्यंत अनुदान Krushi Drone Yojana 2024

विद्यापीठे व सरकारी संस्था  100% अनुदान (10 लाखापर्यंत)
शेतकरी उत्पादक संस्था अनुदान (7 लाख 50 हजारांपर्यंत अनुदान)  
शेतकरी उत्पादक संस्थाने ड्रोन भाड्याने घेतलेल्या (प्रति हेक्टर 6 हजार रुपये अनुदान)
संस्थानी कृषी ड्रोनचे प्रात्यक्षिक राबवल्यास 3 हजार अनुदान
अवजारे सेवा सुविधांना ड्रोन खरेदी करताना 50% अनुदान (5 लाखापर्यंत अनुदान)
कृषी पदवीधारकाने अवजारे सेवा केंद्र सुरू केल्यास  5 लाखापर्यंत अनुदान

कृषी ड्रोन अनुदान योजनेचा लाभ

● या योजनेच्या माध्यमातून कृषी पदवीधारकांना 5 लाखापर्यंत अनुदान दिले जाते.
● इयत्ता 10वी उत्तीर्ण व रिमोट तंत्राचे कौशल असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला चार लाखापर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
● कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या माध्यमातून शेती विषयक विविध कामे केली जाऊ शकतील, तसेच ड्रोन भाडेतत्त्वावर देऊन रोजगार निर्मिती तरुणांना करता येणार आहे.
● ड्रोन च्या माध्यमातून पिकावर औषधे व खतांची चांगल्या प्रकारे फवारणी करता येणार आहे. ज्यामुळे उत्पादनात वाढ होईल व पिकांचे नुकसान हे कमी होईल असा शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे.
● ड्रोन चा वापर हा पिकांचे निरीक्षण आणि जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी केला जाऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यासही मदत होणार आहे.

Krushi Drone Yojana 2024 योजनेच्या नियम अटी अर्जदारास खालीलप्रमाणे मान्य असणे आवश्यक

1. ड्रोन खरेदी करत असताना ड्रोन ची खरेदी किंमत पूर्ण भरून खुल्या बाजारातून ड्रोन व इतर उपकरणे खरेदी करण्यास संस्था तयार आहे.
2. ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र स्थापन करीता बॉण्ड पेपरवर हमीपत्र साधन करणे बंधनकारक असेल.
3. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या माफक भाडेतत्त्वावर ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र सेवा सुविधा पुरवण्यास आमची तयारी आहे.
4. अनुदानाची मिळणारी रक्कम माझ्या आधार कार्ड संलग्न बँक खात्यावरील जमा केली जाईल याची मला कल्पना आहे. त्यामुळे माझे खाते आधार क्रमांकला जोडलेले आहे.
5. मी ड्रोन व इतर उपकरणे खुल्या बाजारातून माझ्या पसंतीने खरेदी करणार असल्याने ड्रोन व इतर उपकरणे गुणवत्तेचे सर्वस्वी जबाबदारी माझी राहील, याची पूर्ण मला कल्पना आहे.
6. तसेच यापूर्वी मी उपरोक्त प्रस्तावासाठी किंवा त्याच्या काही भागासाठी कोणती शासकीय निमशेषणी यंत्रणे कडून अनुदान रक्कम घेतलेली नाही. Krushi Drone Yojana 2024
7. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या SOP प्रमाणे कारवाही करणे आवश्यक राहील.

सरकारी योजनेची माहीती मिळवण्यासाठी whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा 

कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे

1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. रहिवासी दाखला
4. मोबाईल नंबर
5. ईमेल आयडी
6. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
7. बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रति
8. खरेदी करावयाच्या ड्रोनचे कोटेशन व विक्रेत्याची संपूर्ण माहिती आवश्यक
9. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
10. अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेतील प्रशिक्षण घेतले व परवानाधारक चे नाव व तपशील
11. कृषी पदवी आवश्यक
12. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
13. अर्जदार संस्था असल्यास संस्थेचा पुरावा
14. स्वयंघोषणापत्र
15. पूर्वसंमती पत्र

कृषी ड्रोन अनुदानासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

कृषी ड्रोन अनुदानासाठी सध्या तरी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले जात आहेत. भविष्यात ऑनलाइन प्रक्रिया होऊ शकते.

ऑफलाइन प्रक्रिया :

अर्जदार व्यक्तीला सर्वात प्रथम आपल्या जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल.
● सदरच्या कार्यालयात गेल्यानंतर कृषी ड्रोन अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
● अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
● अशाप्रकारे तुम्ही कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता. व तुमच्या अर्जाची पूर्ण प्रोसेस होऊ शकते.

सारांश –

वरील माहिती संपूर्ण व्यवस्थितपणे वाचून तुम्ही Krushi Drone Yojana 2024 योजनेसाठी अर्ज करू शकतात. माहिती आवडली असल्यास इतरांना देखील शेअर करायला विसरू नका. तसेच काही अडचणी आल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही नक्कीच त्याचे उत्तर देऊ.

Leave a Comment