Kisan credit card yojana 2025 | कार्डचे फायदे, पहा संपूर्ण माहिती असा करा अर्ज…
Kisan credit card yojana 2025 : देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे PM किसान योजना, व राज्य शासनाने सुरू केलेली नमो शेतकरी योजना या योजना महत्वपूर्ण ठरल्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जातात. देशभरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे कर्ज कोणत्याही अडचणी शिवाय घेता यावे, यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.
भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे सर्वाधिक देशांमध्ये शेतीला प्राधान्य दिले जाते. परंतु अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करत असताना अडचणींचा सामना सहन करावा लागतो. दुष्काळल, रोगराई, बाजारभाव, नैसर्गिक आपत्ती यासारख्या असंख्य गोष्टींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. यामुळे शेतकरी अनेक वेळा सावकारी कर्ज मोठ्या व्याजदराने काढतात, शेतीतील पीक ऐनवेळी पिकले नाही तर ते कर्ज शेतकऱ्यांना भरणे परवडत नाही. किंवा ते शेतकरी भारुच शकत नाहीत, परिणामी आत्महत्या सारखे परिणाम घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे कर्ज सहज उपलब्ध व्हावे यासाठी शासनाच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे.
Kisan credit card yojana 2025 योजनेच्या माध्यमातून बँकेतून कर्ज घेतल्यावर शेतकऱ्याला जास्तीत जास्त ७% टक्के व्याजदर आकारला जातो, पण शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास त्या शेतकऱ्यांना व्याजदरात ३% सवलत दिली जाते, म्हणजेच शेतकऱ्याला ४% व्याजदराने बँकांच्या माध्यमातून कर्ज दिले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे किसान क्रेडिट योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १ लाखाचे बिनव्याजी कर्ज ही उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर किसान क्रेडिट कार्ड योजनेचा फायदा होतो. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कुठल्याही हमीशिवाय ३ लाखापर्यंत कर्ज देणे व त्या कर्जावर ३ ते ४% व्याजदर आकारले जाते. शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी कोणत्याही सावकारी व्याजदराने कर्ज काढण्याची गरज भासू नये यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात केली आहे. त्यामुळे आता सावकारी कर्जामुळे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेची मदत होणार आहे.
शेतीची सुरुवातिची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना आता कोणत्याही सावकारी व्याजदराने कर्ज काढण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही आम्ही शिवाय बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. व त्या दिलेल्या कर्जावरती कमीत कमी व्याजदर आकारला जातो त्यामुळे शेतकऱ्यांचा आता दुहेरी फायदा होणार आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कार्डच्या माध्यमातून बँकांमधून सहज कर्जही मिळवता येते त्यासाठी कोणतेही कागदपत्राचे जास्त पूर्तता करावी लागणार नाही.

Kisan credit card yojana 2025 Overwiev
योजनेचे नाव | Kisan credit card yojana 2025 |
द्वारा सुरू | केंद्र शासन |
उद्देश | शेतकऱ्यांना सहजरीत्या कर्ज उपलब्ध करून देणे |
कर्जाची रक्कम | तीन लाखापर्यंत |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन व ऑफलाईन |
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे मुख्य उद्देश
● शेतीच्या मशागतीसाठी व पिकांच्या लागवडीसाठी तात्काळ शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
● पिकाच्या काढण्यासाठी व पीक आल्यानंतर त्यातील मशागत करण्यासाठी हे कर्ज उपलब्ध करून देणे.
● शेतीसाठी खेळते भांडवल उपलब्ध व्हावे, पिकाच्या कापनीनंतर होणारा खर्च शेतकऱ्यांना भरता यावा, शेतकऱ्यांना दैनंदिन गरजा भागवता याव्यात व शेतीसाठी लागणारे वेगवेगळे अवजारे खरेदी करण्यासाठी या पैशांचा उपयोग होऊ शकतो.
त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये म्हणून क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात केली आहे.
लाडकी बहिण योजनेचे 2100 कधी जमा होणार Click hare
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
1.Kisan credit card yojana 2025 योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कार्ड उपलब्ध करून दिल्यानंतर त्या कार्डमध्ये शेतकऱ्याचे नाव, पत्ता, जमिनीची माहिती, कर्ज घेण्याची मर्यादा, शेतकऱ्याचा फोटो, ओळखपत्र, व नेहमीचे व्यवहाराची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज काढणे सहज सोपे होते.
2. जवळच्या सरकारी बँकेत जाऊन कार्डची केवायसी करता येते व कर्ज घेण्यासाठी अर्ज देखील करता येतो.
3. बँकेकडून पात्र असलेले शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले होते आणि सोबतच एक पासबुकही दिले जाते.
कसे मिळवाल किसान क्रेडिट कार्ड.?
● आपल्या जवळील अधिकृत बँकेत जाऊन तुम्ही केसीसी या योजनेसाठी अर्ज करू शकता.
● बँकांच्या माध्यमातून पात्र असलेले शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते आणि पासबुकही दिले जाते.
● या किसान क्रेडिट कार्ड मध्ये शेतकऱ्याचे नाव, पत्ता, जमिनीची माहिती, कर्ज घेण्याची मर्यादा, शेतकऱ्याचा फोटो आणि ओळखपत्र या सर्व बाबींची नोंद केली जाते.
किसान क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकांचे नावे
1. बँक ऑफ इंडिया
2. बँक ऑफ बडोदा
3. स्टेट बँक ऑफ इंडिया
4. पंजाब नॅशनल बँक
5. व इतर अनेक महत्त्वपूर्ण बँक या योजनेसाठी पात्र आहेत.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे शेतकऱ्यांना होणारे फायदे
● Kisan credit card yojana 2025 योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमीत कमी वेळात आपत्कालीन कर्ज दिले जाते.
● शेतकऱ्यांना कोणत्याही सावकारी व्याजदरांकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
● घेतलेल्या कर्जाच्या माध्यमातून शेतकरी बी-बियाणे आणि खते कीटकनाशके, किंवा शेतीसंबंधी इतर अवजारे देखील खरेदी करू शकतात.
● कोणतेही हमीशिवाय व साक्षीदाराशिवाय तीन लाखापर्यंत कर्ज या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाते.
● शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डचे कर्ज वेळेत भरले असल्यास तीन वर्षात पाच लाखापर्यंत ही कर्ज घेता येते
● किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त तीन टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना Click hare
किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. रहिवाशी दाखला
3. पॅन कार्ड
4. रेशन कार्ड
5. सातबारा उतारा व ८अ
6. अधिकृत बँकेचे पासबुक
7. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कुठे व कसा.?
किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा कसा करायचा याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहू.
● अर्जदाराला सर्वप्रथम शासनाचे या अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे.
● अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तिथे तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड या ऑप्शन वरती क्लिक करून विचारलेले सर्व माहिती भरायचे आहे.
● सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे.
ऑफलाइन पद्धत :
अर्जदाराला सर्वप्रथम किसान क्रेडिट कार्ड या अधिकृत वेबसाईट वरती जायचे व तिथून अर्ज डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
● अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आपल्या जवळील तो अर्ज बँकेत जाऊन जमा करायचा आहे
● अशाप्रकारे दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतात, व अर्ज भरल्यानंतर पोस्टाद्वारे तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. Kisan credit card yojana 2025
सरकारी योजनेसाठी आमचा whatsapp ग्रुप | जॉईन करा |
शासनाचे अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सारांश :
Kisan credit card yojana 2025 योजना ही एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा व त्यासाठी अर्ज ही करावा. किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील प्रमाणे सर्व प्रक्रिया अवलंबावी व तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही त्याचे तुम्हाला उत्तर देऊ.