इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024-25 | पात्रता, लाभार्थी, कागदपत्रे अर्ज कसा करायचा..
इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024-25 : केंद्र शासनाच्या अंतर्गत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना अमलात आणल्या जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांचा विकास व्हावा त्यांची आर्थिक उन्नती व्हावी व सामाजिक जीवन जगताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी राज्य शासन नेहमी अग्रेसर असताना आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना दरमहा आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एक योजना म्हणजे विधवा पेन्शन योजना. राज्यातील विधवा महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने ही एक महत्त्वपूर्ण योजना आमलात आणली आहे.
महाराष्ट्र राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते, त्या योजनेमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. घरातील कर्ता पुरुष अचानकपणे गेल्यामुळे त्या कुटुंबातील असलेल्या महिलेवरती जबाबदारी येते, त्या महिलेला समाजामध्ये जीवन जगत असताना अनेक अडचणी येत असतात त्या कुटुंबावरती मोठे आर्थिक संकट ओढवले जाते पतीच्या मृत्यूमुळे विधवा महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आवश्यक पैशांची गरज असते त्या पैशासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासते त्यामुळे राज्यातील विधवा महिलांचे या सर्व समस्यांचा आणि अडचणींचा विचार करून केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024-25
राज्यातील ज्या विधवा महिला आहेत त्या महिलांना शासनाच्या माध्यमातून मदत करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू झाली आहे. या योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र असतील, योजनेला आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहेत, अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखांमधून आपण पाहणार आहोत, तर वाचकांनी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024-25
इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024-25 Highlight
योजनेचे नाव | इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024-25 |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील विधवा महिला |
लाभ | दरमहा 600 रुपयांची आर्थिक मदत |
उद्देश | विधवा महिलांना आर्थिक सहाय्य देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाइन |
इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024-25 मुख्य उद्देश
● महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या महिलांना आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
● कुटुंबातील पतीचे निधनानंतर संपूर्ण जबाबदारी ही महिलांच्या अंगावरती पडते त्यामुळे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.
● विधवा महिलांचा आर्थिक विकास करण्यासाठी.
● विधवा महिलांना आपले कुटुंब चालवण्यासाठी पैशासाठी इतरांवर ते अवलंबून राहण्याची गरज भासू नये या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.
● राज्यातील विधवा महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवणे.
● विधवा महिलांना आर्थिक सक्षम बनवून आत्मनिर्भर बनवणे हा देखील शासनाचा मुख्य उद्देश आहे.
● एकंदरीतच महाराष्ट्र राज्यातील ज्या विधवा महिला आहेत, त्या महिलांच्या सर्व सामाजिक, आर्थिक अडचणी लक्षात घेऊन त्यांना कुटुंब चालवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते हा उद्देश लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024-25 योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
1. इंदिरा गांधी पेन्शन योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
2. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील विधवा महिलांचा विकास केला जातो.
3. योजना अंतर्गत दिली जाणारे आर्थिक सहाय्य ची राशी लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात जमा होते.
4. राज्यामध्ये विधवा महिलांसाठी चालवले जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
शासनाच्या इतर योजना पहा
योजनेच्या लाभार्थी महिला
● राज्यामध्ये ज्या महिला दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत, ज्यांचे वय 40 ते 65 वर्षे वयोगटातील आहेत, तसेच त्या महिला विधवा आहेत अशा महिलांना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन दिले जाते.
दिले जाणारे आर्थिक सहाय्य
केंद्र शासनाकडून | राज्य शासनाकडून | एकूण |
दरमहा 200/- रुपये | दरमहा 400/- रुपये | दरमहा 600/- रुपये |
विधवा योजनेचा महिलांना होणारा फायदा :
● महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना या योजनेच्या अंतर्गत दरमहा 600 रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते.
● पतीच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी ही महिलांवर येत असल्यामुळे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, पैसे अभावी अनेक महिलांची हेळसांड होते त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांना दरमहा 600/- रुपये दिले जातात.
● महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या महिलांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यास मदत होते.
● कुटुंब चालवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून थोडीफार मदत झाल्याने त्यांच्या कुटुंबाला हातभार लागतो.
● शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी रक्कम ही महिलांच्या थेट बँक खात्यात जात असल्यामुळे त्यांना इतरांकडे पैसे मागण्याची आवश्यकता भासत नाही. इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024-25
अर्ज भरल्यानंतर लागणारा कालावधी
● ऑनलाइन प्रणाली द्वारे अर्ज दाखल झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत तलाठी (चौकशी अधिकारी) लाभार्थ्यांच्या आलेल्या अर्जावर सखोल चौकशी करून कागदपत्राची छाननी करून सविस्तर अहवाल सादर करतात. व मीटिंगमध्ये मंजुरीला पाठवले जाते. मीटिंगमध्ये प्रकरणे मंजूर/ नामंजूर झाल्यावर मंजूर/नामंजूर अर्जाची माहिती लाभार्थ्यांना ऑनलाइन प्रणालीदारी कळवली जाते. त्यानंतर लाभार्थ्यांची ओळख पटवून घेऊन रजिस्टरमध्ये नोंद घेऊन सर्व पात्र लाभार्थ्यांचे बिल दरमहा कोषागार सादर केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला साधारणपणे तीन महिन्याचा कालावधी जातो.
इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024-25 नियम व अटी
● अर्जदार महिला ही विधवा असणे आवश्यक आहे. तसेच ती महाराष्ट्र राज्यातील रहिवाशासने आवश्यक आहे.
● फक्त राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या विधवा महिलांनाच योजनेचा लाभ दिला जातो.
● केवळ 40 ते 65 वर्षाखालील महिलांना या योजनेअंतर्गत सहभागी करून घेतले जाते.
● 65 वर्षावरील महिलांना इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा लाभ दिला जात नाही.
● अर्जदार महिन्याला स्वतःच्या आधार कार्ड व आवश्यक असलेले सर्व कागदपत्र देणे बंधनकारक असेल.
● अर्जदार मेल्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर संपूर्ण कागदपत्राचे पडताळणी करूनच या योजनेचा फायदा महिलांना दिला जातो.
सरकारी योजनेसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप join करा
इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आवश्यक कागदपत्रे (Document Important)
1. आधार कार्ड
2. कुटुंबाचे रेशन कार्ड
3. पतीचा मृत्यू दाखला (ग्रामसेवक किंवा नगरपालिका यांच्याकडेच मृत्यू दाखला)
4. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे असल्याचे साक्षांक प्रमाणपत्र
5. पासपोर्ट आकाराचे फोटो
6. मोबाईल नंबर
7. जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
8. बँक पासबुक
9. जन्म दाखला
10. रहिवासी दाखला
11. शपथपत्र
12. विहित नमुन्यातील अर्ज
इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
● अर्जदार महिलेला सर्वप्रथम स्वतःच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसीलदार संजय गांधी योजना/ तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकतात.
● अर्ज स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी कडून पात्रतेची तपासणी केली जाते.
●अर्जदार पात्र असल्यास लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर केले जाते. इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024-25
महत्वाची सूचना :
ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे संयुक्तपणे राबवली जाते. त्यामुळे अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहीर केलेली नाही. योजनेमध्ये वेळोवेळी बदल होण्याची शक्यता असते, नवीन माहितीसाठी संबंधित कार्यालयात संपर्क साधणे ही गरजेचे आहे.
शासनाचे अधिकृत संकेतस्थळ येथे | येथे क्लिक करा |
सरकारी योजनेसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप | ग्रुप जॉईन करा |
सारांश –
अशाप्रकारे तुम्ही वरील माहिती संपूर्ण वाचून इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकता, अर्ज करतांना तुम्हाला कोणत्याही अडचणी येत असतील तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला नक्कीच उत्तर देऊ तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणी विधवा महिला असतील तर त्यांना या योजनेची नक्की माहिती द्या, जेणेकरून त्या महिलांना या योजनेचा लाभ भेटू शकेल, तसेच इतरांना ही माहिती शेअर देखील करा.