गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना | असा करा अर्ज

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना | असा करा अर्ज

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना : महाराष्ट्र राज्यातील बहुतांशी शेतकरी हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असल्यामुळे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक शेतीसाठी योजना राबवल्या जातात. शेतकरी शेतामध्ये काम करत असताना अंगावरती वीज पडणे, नैसर्गिक आपत्ती येऊन त्यामध्ये मृत्यू होणे, सर्पदंश, विंचूदंश, किंवा विजेचा शॉक लागणे तसेच रस्त्यावर अपघात होणे किंवा अन्य कारणामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्याच्या कुटुंबावरती आर्थिक ओढतान निर्माण होते, कुटुंबातील कर्ता पुरुष मृत्यू पावल्यामुळे कुटुंबाचा उपजीविकेचा प्रश्न उद्भवतो त्यामुळे शासनाच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शासनाने राबवलेली आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतःचा विमा उतरवलेला नसतो किंवा अनेक शेतकऱ्यांना याची माहिती देखील नसते, किंवा स्वतःचा विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्याकडे आर्थिक रक्कम नसते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुखापत झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास अनेक संकटांना सामोरे जावे लागते, शेतकऱ्यांना जीवन जगत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते तसेच सर्वात मोठ्या आर्थिक संकटांना देखील सामोरे जावे लागते, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी व मुलगा किंवा अविवाहित मुलगी यापैकी कोणताही दोन व्यक्ती 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना या योजनेचा लाभ दिला जातो.

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना Overview

योजनेचे नाव  गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
द्वारा सुरू   महाराष्ट्र शासन
लाभार्थी  राज्यातील शेतकरी
योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना विमा प्रदान करणे
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन

 

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची मुख्य उद्दिष्टे

1. राज्यातील शेतकऱ्यांचा शेती करत असताना आकस्मित मृत्यू वाढवल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ येऊ नये या गोष्टीचा सारासार विचार करून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची सुरुवात करण्यात आली. व या माध्यमातून कुटुंबातील व्यक्तींना मनोधैर्य राखणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहे.
2. राज्यातील शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेची सुरुवात करण्यात आले आहे.
3. महाराष्ट्र राज्यातील दुर्गम भागातील व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना अपघाताच्या वेळी आर्थिक मदत करणे हा देखील मुख्य उद्देश आहे.
4. एकंदरीतच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या पाठबळ दिले जाते.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

● महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना निशुल्क उपचारासाठी व अपघात झाल्यानंतर कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी या योजनेची सुरुवात झालेली आहे.

● गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी आकारण्यात येणारी विम्याची रक्कम ही अत्यंत कमी स्वरूपाचे आहे.

● सदर योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे आर्थिक सहाय्य हे डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा केले जाते.

● महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवलेली आहे.

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची लाभाची रक्कम

● शेतकऱ्याचा शेतामध्ये काम करत असताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 अवयव निकामी झाल्यास शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई ही दोन लाख रुपये आहे.

● शेतकऱ्याचा शेतामध्ये काम करत असताना झालेल्या अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये ची नुकसान भरपाई दिली जाते.

अपघाताची बाब मिळणारी रक्कम 
अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये
अपघातामध्ये मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास 2 लाख रुपये
अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास  1 लाख रुपये

 

गोपीनाथ मुंडे (Gopinath Mundhe) अपघात विमा योजना आवश्यक पात्रता

● अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

● महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले होते.

शासनच्या इतर योजना 

1. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना राज्यातील युवकांना व्यवसायासाठी १० लाख रुपयापर्यंत कर्ज 
2. शौचालय बांधण्यासाठी शासन देत आहे 12 हजार रुपयांचे अनुदान

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या नियम व अटी

1. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो.
2. राज्यातील फक्त शेतकरी असलेल्या कुटुंबातीलच सदस्यांना योजनेचा लाभ दिला जातो.
3. लाभार्थी अर्जदार शेतकऱ्यांनी जर इतर कोणत्याही अपघातग्रस्त योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्याला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही.
4. लाभार्थी अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक अध्यक्ष लिंक करणे आवश्यक आहे.
5. सुदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी व शेतकऱ्यांच्या कुटुंबाने याच्या अगोदर योजनेचा लाभ घेतला असल्यास किंवा अन्य कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असल्यास या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.

अपघात ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वारसदाराची निवड

1. अपघात ग्रस्त शेतकऱ्याची पत्नी/ अपघातग्रस्त शेतकरी स्त्रीचा पती
2. अपघात ग्रस्त शेतकऱ्याचे अविवाहित मुलगी
3. अपघात ग्रस्त शेतकऱ्याची आई
4. अपघात ग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा
5. अपघात ग्रस्त शेतकऱ्याचे वडील
6. अपघात ग्रस्त शेतकरी ची सून
7. अपघात ग्रस्त शेतकऱ्याचे अन्य कायदेशीर वारसदार

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये समाविष्ट असलेली अपघाताची कारणे

खाली दिलेल्या कारणामुळे जर शेतकऱ्याचा मृत्यू ओढवला असल्यास किंवा अपंगत्व आले असल्यास शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.

● वीज पडून मृत्यू
● नैसर्गिक आपत्ती
● पूर
● सर्पदंश
● वाहन अपघात झाल्यास
● विजेचा शॉक लागून मृत्यू ओढवल्यास
● रेल्वे अपघात
● पाण्यात बुडून मृत्यू
● जंतुनाशके हाताळताना विषबाधा होऊन मृत्यु झाल्यास
● उंचावरून पडून झालेला अपघात
● नक्षलवाद्याकडून हल्ला
● हिंस्र प्राणी चावल्यामुळे मृत्यू

खालील कारणामुळे गोपीनाथ मुंडे विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही

● विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व
● आत्महत्या
● स्वतःला जाणीव पूर्वक जखमी करून घेणे
● शर्यती मधील अपघात
● नैसर्गिक मृत्यू

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना

अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे (Documents)

1. दावा अर्ज
2. 7/12 उतारा
3. अर्जदार व्यक्तीचे पासबुक
4. रेशन कार्ड
5. एफ आय आर
6. मृत्यू झाल्यास पोलीस पाटलांचा प्राथमिक अहवाल
7. मृत्यू दाखला
8. घोषणापत्र
9. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
10. वयाचा दाखला
11. पोस्टमार्टम रिपोर्ट
12. इत्यादी

शेतकरी ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी क्लिक करा

शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर किती दिवसात दावा करण्याचा कालावधी

● अपघात झालेल्या शेतकऱ्यांचा दावा अर्ज विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्या नंतर देखील 90 दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करण्यात येऊ शकतो.

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

सदर योजनेसाठी ऑफलाईन अर्ज सादर करावा लागतो.

एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर सदर योजने अंतर्गत शेतकऱ्याला त्याच्या वारसाला जवळच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अपघातानंतर 45 दिवसाच्या आत दावा अर्ज सादर करावा लागेल. तसेच अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावे लागतील सदर अधिकाऱ्याकडून संपूर्ण अर्जाची प्रक्रिया करून शेतकऱ्यांच्या वारसदारांना लाभ दिला जाईल.

शासनाचे अधिकृत संकेतस्थळ Click Here
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना पीडीएफ click Here
हेल्पलाइन नंबर 1800-233-3533
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शासनाचा GR Click Here

 

सारांश –

अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना उपलब्ध आहे. व वरील प्रमाणे संपूर्ण प्रक्रिया करून तुम्ही या योजनेचा अपघातग्रस्त कुटुंबीयांना लाभ मिळवून देऊ शकता, माहिती आवडली असल्यास इतरांना देखील शेअर करा.

Leave a Comment