
Free Tablet Yojana 2025
Free Tablet Yojana 2025 : विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट असा करा अर्ज..
Free Tablet Yojana 2025 : केंद्र सरकार असो किंवा राज्य शासन असो केंद्र शासन नेहमी शैक्षणिक विकासासाठी विविध योजना शासनाच्या माध्यमातून आणल्या जातात. मोफत टॅबलेट योजना ही महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात आणि शहरी भागातील इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून मोफत टॅबलेट देण्यात येते त्यासोबतच सहा जीबी इंटरनेट प्रति दिवस ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती या लेखांमधून आज पाहणार आहोत. Free Tablet Yojana 2025
महाराष्ट्र राज्यातील अनेक ग्रामीण भागातील मुले हे दहावीच्या शिक्षणानंतर पुढे शिक्षण घेतले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढे शिक्षण घ्यावे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना राबवली आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या घरची कौटुंबिक परिस्थिती ही अत्यंत हालकीची असते, त्यामुळे दहावी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी किंवा ऑनलाईन कोर्सेस करण्यासाठी मोबाईल टॅबलेट विकत घेऊ शकत नाहीत. अशा कुटुंबासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट दिले जाते.
अनेक कुटुंबातील विद्यार्थ्यांना 10वी चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी इतर नातेवाईककडून व सहकाऱ्यांकडून पैसे उदार घेऊन शिक्षण घ्यावे लागते. त्यामुळे दहावीच्या पुढील शिक्षणासाठी इंजीनियरिंग मेडिकल एमएच-सीईटी नीट असे महागडे शिक्षण घेण्यासाठी कोचिंग क्लास ची आवश्यकता असते, अशा शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावरती पैशांची गरज भासत असते, सर्वसामान्य कुटुंबांना हे शिक्षण परवडणारे नसते. त्यामुळे शिक्षणाची इच्छा असून देखील बहुतांशी विद्यार्थी ही पैसे अभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाही. Free Tablet Yojana 2025
अशा सर्व सामान्य कुटुंबाचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दहावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट दिले जाते व सोबतच 6 जीबी इंटरनेटची सुविधा देखील उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना कुठलेही गोष्टींची कमतरता भासू नये हा उद्देश आहे.
सध्याचे हे डिजिटल युग असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटल उपकरणाचा वापर मोठ्या प्रमाणावरती वाढत चालला आहे शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन क्लासेस होत असल्यामुळे टॅबलेटचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होतो आहे पीडीएफ च्या स्वरूपात अनेक पुस्तक उपलब्ध असल्यामुळे ते पुस्तक वाचण्यासाठी टॅबलेटचा वापर केला जाऊ शकतो अशा अनेक कारणामुळे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट योजना सुरू करण्यात आली आहे.

मोफत टॅबलेट योजना Overview
योजनेचे नाव | मोफत टॅबलेट योजना 2025 |
विभाग | शैक्षणिक विभाग |
लाभार्थी | इयत्ता अकरावीला सायन्स मध्ये प्रवेश घेतलेले राज्यातील विद्यार्थी |
मिळणारा लाभ | मोफत टॅबलेट व प्रति दिवस सहा जीबी इंटरनेटची सुविधा |
उद्देश | विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास करता यावा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
मोफत टॅबलेट योजनेची मुख्य उद्दिष्टे
● महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य ग्रामीण भागातील विद्यार्थी दहावी नंतरचे पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसते, उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याकडे आर्थिक पाठबळ नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावे लागते अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी मदत करणे हे शासनाचे उद्देश आहेत.
● मोफत टॅबलेट योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल बनवणे हे देखील शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
● विद्यार्थ्यांना MHCET/ NEET च्या पूर्वतयारीसाठी टॅबलेटची आवश्यकता भासते अशा विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देणे हे देखील शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
● राज्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ऑनलाइन कोचिंग प्रशिक्षण पूर्ण करता यावे. Free Tablet Yojana 2025
● विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी त्यांना पाठबळ देणे व शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आकर्षित करणे हे देखील शासनाचे उद्दिष्टे आहेत.
Ladki Bahin Yojana Online Apply 2025 | लाडकी बहीण बहिण योजनेचे अर्ज सुरू….
योजनेसाठी लाभार्थी विद्यार्थी
राज्यातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील OBC/VJNT/SBC वर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना व 10वी उत्तीर्ण व इयत्ता अकरावी मध्ये सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. Free Tablet Yojana 2025
योजनेच्या माध्यमातून दिला जाणारा लाभ :
महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट त्याचबरोबर प्रति दिवस सहा जीबी इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
इयत्ता दहावी | शहरी भागातील विद्यार्थी | 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी असावा |
इयत्ता दहावी | ग्रामीण भागातील विद्यार्थी | 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण आणि उत्तीर्ण झालेला विद्यार्थी असावा |
मोफत टॅबलेट योजनेच्या नियम व अटी खालील प्रमाणे
● माझे ते फ्री टॅबलेट योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येतो.
● अर्जदार विद्यार्थी हा दहावी उत्तीर्ण होऊन 11 वी मध्ये सायन्सला प्रवेश घेतलेला असावा.
● शहरी भागातील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी मध्ये 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेतलेले असावेत.
● ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी मध्ये 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेतलेले असावेत.
● जर विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडले तर विद्यार्थ्याकडून टॅबलेट परत घेतला जाईल.
● टॅबलेटची गॅरंटी एक वर्षाची दिली जाते, परंतु एका वर्षानंतर टॅबलेट खराब झाल्यास विद्यार्थ्यांची जबाबदारी असेल, त्याच्या देखभालीचा खर्च शासनाकडून दिला जाणार नाही.
मोफत टॅबलेट योजनेसाठी आवश्यक महत्त्वपूर्ण कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. रहिवाशी दाखला
4. दहावीचे मार्कशीट
5. अकरावी मध्ये ऍडमिशन घेतल्याची पावती
6. शाळा सोडल्याचा दाखला
7. जातीचा दाखला
8. ईमेल आयडी
9. मोबाईल नंबर
10. बँक खात्याचा तपशील Free Tablet Yojana 2025
मोफत टॅबलेट योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
● अर्जदार विद्यार्थ्याला सर्वप्रथम शासनाच्या या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
● सदरील वेबसाईट वरती जाऊन विद्यार्थ्यांनी अर्ज भरायचा आहे.
● अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरून आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे त्यासोबत सबमिट करायचे आहेत.
● त्यानंतर शेवटी सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.
● अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
सरकारी योजनेसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
सारांश :
अशाप्रकारे तुम्ही मोफत टॅबलेट योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया करू शकता. अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याचे नक्की उत्तर देऊ, मोफत टॅबलेट योजना या योजनेविषयी इतर विद्यार्थ्यांना देखील तुम्ही माहिती देऊ शकता. माहिती आवडली असल्यास इतर विद्यार्थ्यांना देखील शेअर करायला विसरू नका. Free Tablet Yojana 2025