मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र | असा करा अर्ज, पहा संपूर्ण माहिती..
मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र : केंद्र सरकारच्या अंतर्गत व राज्य सरकारच्या अंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात, राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी राज्य शासन व केंद्र शासन नेहमी प्रयत्नशील असते, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजनांची सुरुवात करण्यात येते. मोफत टॅबलेट योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागातील तसेच हे शहरी भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना महत्वाची आहे. 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येते, तसेच 6GB (जीबी) इंटरनेटची सुविधा देखील उपलब्ध करून दिले जाते.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी हे दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असल्यामुळे, अशा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असते, त्यामुळे अशी कुटुंब हे आपल्या स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी असमर्थ ठरतात त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण देऊ शकत नाहीत. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, प्राथमिक व हायस्कूलचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात चांगले शिक्षण घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात. पुढे अनेक खाजगी क्लासेस करण्याची देखील विद्यार्थ्यांना आवश्यक असते. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे असे विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांसाठी घरी बसून ऑनलाइन च्या माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी शासनाच्या माध्यमातून मोफत टॅबलेट योजना सुरू करण्यात आलेली आहे. मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र
सध्याचे जग हे डिजिटल युग आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटल उपकरणाचा वापर हा फार मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. शिक्षण क्षेत्रात सुद्धा डिजिटल उपकरणांचा वापर वाढला असल्यामुळे आणि क्लासेस ऑनलाईनच्या स्वरूपात उपलब्ध आहेत, त्यामुळे आर्थिक दृष्ट गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना घरी बसून मोफत क्लासेस करता यावेत या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. मोफत टॅबलेट योजनेसाठी कोण कोणती पात्रता आवश्यक आहे.? लाभार्थी कोण आहेत.? कागदपत्रे कोणती लागतात.? अर्ज कसा करायचा.? याची संपूर्ण माहिती या योजनेच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे वाचकांना विनंती आहे की, हा लेख शेवटपर्यंत वाचावा. मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र
वाचकांना सूचना :
मोफत टॅबलेट योजना ही 10वी उत्तीर्ण झालेल्या व त्यांच्या पुढील शिक्षणासाठी इंजिनिअरिंग तसेच मेडिकल शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाइन कोचिंग क्लास साठी मोफत टॅबलेट वितरण करण्यात येते, योजनेमध्ये शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी बदल करण्यात येतात ते वाचकांनी तपासून पाहावेत, या लेखाच्या माध्यमातून आपण त्याची सर्व माहिती घेणारच आहोत.
मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र Highlight
योजनेचे नाव | महा ज्योती मोफत टॅबलेट योजना |
विभाग | शिक्षण विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
मोफत टॅबलेट योजनेचे मुख्य उद्दिष्टे
● राज्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील इंजिनिअरिंग तसेच मेडिकल शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन कोचिंग क्लासेस उपलब्ध करून दिले जातात, त्यामुळे त्यांना ऑनलाईन कोचिंग क्लासेस चा लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मोफत टॅबलेट दिले जातात.
● राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची भविष्य बनवणे हा देखील शासनाचा मुख्य उद्देश आहे.
● राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पाठबळ देणे.
● विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन कोचिंग प्रशिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
● आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना विकत टॅबलेट घेता येत नाही. टॅबलेट घेण्यासाठी त्यांना इतरांकडून पैसे घ्यावे लागतात, त्यामुळे त्यांना इतरांकडून कर्ज घेण्याच्या आवश्यकता भासू नये यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात.
● राज्यातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील विद्यार्थ्यांना MHCET/IEL/NEET या परीक्षेची पूर्वतयारी करता येईल या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
मोफत टॅबलेट योजना चे मुख्य वैशिष्ट्ये
1. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट देणारी ही योजना राज्यातील शिक्षण विभागातून चालवली जाते.
2. मोफत टॅबलेट योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे विद्यार्थी घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.
3. योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होते.
4. सदरची योजना ही फक्त विद्यार्थ्यांसाठी असून 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची योजना लागू आहे.
मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र लाभार्थी विद्यार्थी
● महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील OBC/VJNT/SBC या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबातील व 10वी उत्तीर्ण करून इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले गुण
इयत्ता 10वी | शहरी भागातील विद्यार्थी | 70% किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा |
इयत्ता 10वीग्रामीण भागातील विद्यार्थी | ग्रामीण भागातील विद्यार्थी | 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. |
.
मोफत टॅबलेट योजनेचे मुख्य फायदे
● महाज्योती फ्री टॅबलेट योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मोफत टॅबलेट वाटले जातात.
● विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कोणत्याही प्रकारे अडचणी येऊ नये, यासाठी 6GB इंटरनेटची सुविधा देखील उपलब्ध करून दिले जाते.
● महाज्योती मोफत टॅबलेट योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरी बसून शिक्षण घेता यावे यासाठी मोफत टॅबलेट दिले जाते.
● या योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना JEE/NEET/CET शिक्षणाचे ऑनलाईन कोचिंग क्लासची मोफत सुविधा दिली जाणार आहे. मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र
● विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून पाठबळ दिले जाते, ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आकर्षित होतील.
● ज्या विद्यार्थ्यांकडे विकत टॅबलेट घेण्याचे ऐपत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी इतरांकडे पैसे मागण्याची आवश्यकता भासणार नाही.
● महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होईल.
● राज्यातील विद्यार्थी हा डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडला जाईल. मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र
शासनाच्या इतर योजना पहा
मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र योजनेसाठी आवश्यक पात्रता
● अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक राहील.
● अर्जदार विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी पूर्ण केलेल्या असावी व अकरावी मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
मोफत टॅबलेट योजनेच्या नियम व अटी
● सदरची योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.
● महाराष्ट्राच्या बाहेरील आलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
● अर्जदार विद्यार्थी हा दहावी उत्तीर्ण असावा व अकरावी मध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी असावा.
● विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
● ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दहावी मध्ये 60 टक्के पेक्षा अधिकचे गुण घेतलेले असावेत.
● शहरी भागातील विद्यार्थ्यां हा 70 टक्के पेक्षा जास्त गुणांनी पास झालेला असावा.
● सदर विद्यार्थ्याने यापूर्वी टॅबलेट योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा
योजनेसाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे खालील प्रमाणे
1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. रहिवासी दाखला
4. 10वीचे मार्कशीट
5. अकरावी मध्ये प्रवेश घेतलेले प्रवेश पत्र
6. शाळा सोडल्याचा दाखला
7. जातीचा दाखला
8. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
9. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
10. मोबाईल नंबर
11. बँक खात्याचा तपशील
मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र अर्ज करण्याची प्रक्रिया
● अर्जदार विद्यार्थ्याला सर्वप्रथम शासनाच्या या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
● वेबसाईट वरती गेल्यानंतर Upcoming Events खाली MH-CET/JET/NEET नोंदणी खाली Reed हे बटन दिसेल त्यावरती क्लिक करावे लागेल.
● आता तुमच्यासमोर नवीन एक पेज ओपन होईल Click here for registration या ऑप्शन वरती क्लिक करा.
● आता पुढे तुमच्यासमोर एक अर्ज पुढे त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल. व आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
● सर्व माहिती भरून झाल्यावर अपलोड या बटणावर क्लिक करावे.
● आता परत तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल, त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायचे आहे आणि विचारलेली माहिती भरून झाल्यावर सबमिट या बटणावर क्लिक करावे.
● अशाप्रकारे संपूर्ण तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल.
मोफत टॅबलेट योजना अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा | जॉईन करा |
सारांश :
अशाप्रकारे तुम्ही मोफत टॅबलेट योजना महाराष्ट्र वरील माहिती सांगितल्याप्रमाणे महा ज्योती मोफत टॅबलेट योजनेसाठी अर्ज करू शकता, अर्ज करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, आम्ही त्याचे उत्तर देऊ, माहिती आवडली असल्यास इतर विद्यार्थ्यांना देखील शेअर करायला विसरू नका.