E-Shram Carad Pension Yojana 2024 | ई-श्रम कार्ड चे फायदे, असं काढा ऑनलाईन कार्ड

E-Shram Carad Pension Yojana 2024 | ई-श्रम कार्ड चे फायदे, असं काढा ऑनलाईन कार्ड

E-Shram Carad Pension Yojana 2024 : राज्य शासनाचे किंवा केंद्र शासन असेल राज्यातील देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते त्यामधलीच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे इ-श्रम कार्ड योजना आहे. संपूर्ण देशातील असंघटित कामगारांना एकत्रित करून त्यांचा डेटाबेस तयार करण्यासाठी इ श्रम कार्ड योजना सुरू केली आहे देशातील कामगारांवरती आकस्मित येणारे संकट त्यामध्ये अपघात मृत्यू किंवा आरोग्यविषयक अडचणी लक्षात घेऊन या कामगारांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी व त्यांना सुरक्षा प्रधान करण्यासाठी इ श्रम कार्ड योजना सुरू केली आहे.

E-Shram Carad Pension Yojana केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील सर्व ई-श्रम कार्ड धारकांना सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना एका निश्चित वयानंतर पेन्शन दिली जाणार आहे. पेन्शन योजनेअंतर्गत ही श्रम कार्ड धारकांना वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. म्हणजेच प्रतिवर्षी 36 हजार रुपयाची पेन्शन रक्कम या कामगारांना शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून देशातील असंघटित कामगारांना ज्यामध्ये बांधकाम कामगार असतील, शेतीशी संबंधित काम करणारे मजूर असतील, रस्त्यावरती विक्री करणारे मजूर असतील, हातमाग उद्योग, मध्यान भोजन बनवणारे, ऑटो, ओला, उबेर, सुतार व मच्छिमार अशा कामगारांना ही योजना लागू आहे. ही पेन्शन योजना ऐच्छिक व अंशदायी आहे. यासाठी कामगारांना वयानुसार मासिक योगदान रुपये 55/- ते 200 रुपये पर्यंत जमा करावे लागतात. या योजनेसाठी 50% रक्कम ही कामगारांना देय आहे व बाकीची उर्वरित रक्कम ही केंद्र शासनाच्या माध्यमातून या कामगारांना दिली जाते, त्यामुळे देशातील ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. E-Shram Carad Pension Yojana

वाचकांना महत्वाची सूचना

राज्यामध्ये व देशांमध्ये शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना सुरू आहेत, परंतु शासनाच्या माध्यमातून योजनेमध्ये वेळोवेळी बदल देखील केले जातात त्यामुळे योजनेचा लाभ घेत असताना प्रत्येक वाचकांनी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अपडेट घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.

E-Shram Carad Pension Yojana
E-Shram Carad Pension Yojana

E-Shram Carad Pension Yojana ठळक मुद्दे Overview

योजनेचे नाव ई-श्रम कार्ड योजना
उद्देश कामगारांना पेन्शन देणे
लाभार्थी साठ वर्षे पूर्ण झालेले असंघटित कामगार
लाभ प्रति महिना  3000  रुपये 
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन

 

ई-श्रम कार्ड योजनेचे मुख्य उद्दिष्टे

● ई-श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून देशातील असंघटित कामगारांना त्यांच्या उतरत्या वयामध्ये त्यांना आर्थिक लाभ मिळवून देणे.

● वयाच्या 60 वर्षानंतर कोणत्याही असंघटित कामगार वरती उपासमारीची वेळ येऊ नये, त्यासाठी योजनेच्या माध्यमातून आर्थिक साह्य पुरवणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्टे आहे.

● असंघटित कामगारांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. E-Shram Carad Pension Yojana

ई-श्रम कार्ड योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

1. संपूर्ण देशातील ई-श्रम कार्ड धारकांचा आर्थिक व सामाजिक विकास व्हावा व त्यांच्या भविष्य उज्वल व्हावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शासनाने ई-श्रम कार्ड योजना सुरू केलेली आहे.
2. ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेच्या माध्यमातून असंघटित कामगारांना वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन दिली जाते, याच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह चालू शकतो.
3. असंघटित कामगारांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना वार्षिक 36 हजार रुपये पेन्शनच्या माध्यमातून मिळतील.
4. वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पैशासाठी इतरांवर ते अवलंबून राहण्याची वेळ असंघटित कामगारावरती येणार नाही.
5. एकंदरीत पाहता योजनेच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक विकास होण्यासाठी व असंघटित कामगारांना त्यांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे.

ई-श्रम कार्ड योजना लाभ (Benefits)

● देशातील असंघटित कामगारांना वयाच्या 60 वर्षानंतर मासिक 3 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
● केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम ही लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
● असंघटित कामगारांना वार्षिक एकूण 36 हजार रुपये मिळतील. E-Shram Carad Pension Yojana
● PM श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत चे श्रम कार्डधारक या योजनेसाठी अर्ज करतील त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.

सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा

ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी आवश्यक पात्रता

1. अर्जदार व्यक्ती ही भारताची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
2. ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी असंघटित क्षेत्रात कामगार असणे गरजेचे आहे.
3. अर्जदार असंघटित कामगारांचे वय हे 18 ते 40 दरम्यान असावे.
4. अर्जदार कामगारांच्या मासिक उत्पन्न हे 15000 पेक्षा कमी असावे म्हणजेच वार्षिक दीड लाखापेक्षा कमी असावे.

ई-श्रम कार्ड योजनेसाठी कोण नोंदणी करू शकतो.
1. दुकानात काम करणारे कर्मचारी
2. ऑटो चालक
3. सेल्समॅन
4. मेंढपाळ
5. दुग्ध व्यवसाय करणारे
6. शेतकरी
7. पंचर दुरुस्ती करणारे
8. पशुपालक
9. फेरीवाले
10. डिलिव्हरी बॉय
11. वीटभट्टीवर काम करणारे मजूर
12. असे अनेक व्यावसायिक या योजनेसाठी नोंदणी करू शकतात.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, कॅन्सर, डेंगू, स्वाईन फ्लू, ऑपरेशन मलेरिया यासारख्या गंभीर आजारावर देखील मोफत उपचार केले जातात. पहा संपूर्ण योजना 

ई-श्रम कार्ड योजनेसाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे

1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. अधिकृत बँकेचे खाते
3. मोबाईल नंबर
4. ईमेल आयडी
5. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
6. नमुना अर्ज

ई-श्रम कार्ड योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

● ई-श्रम कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम अर्जदार व्यक्तीला शासनाच्या अधिकृत या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
● सर्वप्रथम अर्जदाराला नोंदणी करून घ्यावे लागेल.
● त्यानंतर पुढे अर्जदार व्यक्तीला संपूर्ण प्रक्रिया करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज व्यवस्थित भरलेला पुन्हा एकदा तपासून सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.

ई-श्रम कार्ड काढण्यासाठी अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

सारांश

अशाप्रकारे तुम्ही वरील माहिती संपूर्ण व्यवस्थितपणे वाचून E-Shram Carad Pension Yojanaयोजनेसाठी अर्ज सादर करू शकता तुम्हाला अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा नक्की आम्ही त्याचे उत्तर देऊ.

Leave a Comment