मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025 | अपात्र महिलांची संख्या पन्नास लाखावर…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025 | अपात्र महिलांची संख्या पन्नास लाखावर…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025 : महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक 2024 डोळ्यासमोर ठेवून राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठ्या जोमाने सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकूण 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला, त्यावेळी सरकारच्या माध्यमातून कुठल्याही महिलांच्या अर्जांची छाननी केली नाही. त्यामुळे अपात्र असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळाला. परंतु आता सरकारच्या माध्यमातून जानेवारी महिन्यापासून सर्व महिलांना निकष लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025

या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्याचा धडाका सरकारने सुरू केला आहे. यामध्ये जवळपास जानेवारी महिन्यामध्ये 5 लाख महिला अपात्र ठरल्यावर फेब्रुवारी महिन्यामध्ये 4 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. अशा एकूण 9 लाख लाडक्या बहिणी या योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्यामुळे अपात्र झालेल्या आहेत. सरकारच्या माध्यमातून अजूनही अर्जाची छाननी सुरू आहे. या छाननीच्या माध्यमातून तब्बल 50 लाखापेक्षा अधिक महिला या योजनेतून अपात्र ठरण्याची शंका वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025
योजनेचे नाव  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वरूपात रक्कम देणे
लाभार्थी राज्यातील सर्वसाधारण महिला
द्वारा सुरू राज्य शासन
अर्ज करण्याची पद्धत  ऑनलाइन ऑफलाइन

 

राज्य सरकारच्या माध्यमातून अपात्र असणाऱ्या महिला लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अनेक महिला अपात्र ठरवण्यात येत आहेत. आतापर्यंतच्या पडताळणीमध्ये 50 लाख पेक्षा अधिक राज्यातील महिला अपात्र होणार असल्याची शक्यता आहे यामुळे राज्य शासनाचे तब्बल 135 कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे. तर वार्षिक सरासरी 1620 कोटी रुपये वाचण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना मतांसाठी आकर्षित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये सर्वात मोठी योजना राबवली गेली, याची योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात आले व कोणतेही अर्जाची छाननी करत न करता सरकारच्या माध्यमातून सरसकट महाराष्ट्र राज्यातील तब्बल 2 कोटी 40 लाख महिलांना प्रत्येकी 1500 रुपये देण्यात आले.

याचा सर्वाधिक फायदा हा राज्यातील महायुती सरकारला झाला, लाडकी बहीण ही योजना राज्यामध्ये राबवून सर्वाधिक लाडक्या बहिणीची मते पडल्यामुळे राज्यामध्ये महायुती सरकार सत्तेत आले, सत्तेत आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याच्या आश्वासने देण्यात आले, त्यामुळे राज्यातील महिलांनी भरभरून महायुती सरकारला मतं दिली गेली. परंतु आता शासनाच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणी अपात्र करण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025

इतर योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिला अपात्र

राज्यातील ज्या महिला इतर राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत, त्या महिलांना शक्यतो अपात्र ठरवले जात आहे. यामध्ये जसे की नमो शेतकरी योजना pm किसान योजना या योजनेचा महिलांना लाभ मिळत असेल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025 या योजनेचा या महिलांना अधिकचा लाभ मिळणार नाही असे शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

सरकारच्या माध्यमातून असेही सांगण्यात आले आहे की, ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेत आहेत, त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा स्वतःहून लाभ घेऊ नये, तसेच ज्या महिलांच्या नावावरती किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे, ते इन्कम टॅक्स भरत असतील तर अशा महिलांना लाडकी बहीण योजना नाही असे सरकारने सांगितले आहे.

आंबा पिकाची लागवड ठरत आहे सर्वाधिक फायदेशीर Mango Crop Management

सरकारी तिजोरीवर ताण कमी येणार..?

राज्य शासनाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यामध्ये तब्बल पाच लाख महिला पत्र ठरवल्या होत्या तर फेब्रुवारी महिन्यातही जवळपास चार लाख महिला अपात्र ठरवले आहेत त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे राज्यातील एकूण 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता ही शासनाने वर्तवली आहे त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरील वर्षाला 1620 कोटी रुपये वाचणार आहेत असे देखील सांगितले आहे.

सध्या राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमध्ये 30 ते 39 वय असलेल्या 29 टक्के महिला आहेत, तर 40 ते 49 वयोगटातील 23 टक्के महिला आहेत, व 50 ते 65 वयोगटातील 22 टक्के महिला आहेत, तसेच 60 ते 65 वयोगटातील 5 टक्के महिलांचा समावेश लाडकी बहीण योजनेमध्ये आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025

या महिला होणार अपात्र

2024 मध्ये मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना सुरू केल्यानंतर अनेक महिलांनी अर्ज केले व कोणत्याही प्रकारे अर्जाची छाननी न करता शासनाच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये देण्यात आले परंतु जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल नऊ लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आणि योजनेमधून बाद करण्यात आले.

ज्या महिला राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या इतर योजनेचा देखील लाभ मिळवत असतील तर अशा महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे शासनाने सांगितले आहे.

तसेच ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे व ज्या महिला इन्कम टॅक्स भरत आहेत अशा महिलांनाही लाडक्या बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात येत आहे. शासनाच्या माध्यमातून असे आव्हान करण्यात आले आहे की ज्या महिलांचे आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा महिलांनी मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा फायदा घेऊ नये असेही आव्हान करण्यात आले आहे.

सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याने सरकारच्या माध्यमातून अनेक निकष लावून लाडकी बहीण योजनेमधून अनेक महिलांना पात्र ठरविण्यात येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2025

Leave a Comment