चंदन शेती शेतकऱ्यांना लखपती करणारी शेती, लागवड मशागत संपूर्ण माहिती…

चंदन शेती शेतकऱ्यांना लखपती करणारी शेती, लागवड मशागत संपूर्ण माहिती…

चंदन शेती : आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहिले जातात, शेतीमधून अधिकाधिक उत्पन्न काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते, परंतु अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती उदयास आलेली शेती म्हणजे चंदन शेती होय, चंदन शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न काढले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळाचा विचार केला तर चंदन शेती ही खूप फायदेशीर ठरत आहे.

चंदन पासून अनेक प्रकारचे औषढे निर्मिती, फर्निचर साठी किंवा सुगंधी द्रव्ये उत्पादने तयार करण्यासाठी चंदनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, त्यामुळे जगभरातून चंदनासाठी मागणी फार मोठ्या प्रमाणावर असते, चंदनाचे उत्पादने सर्वाधिक देशामध्ये कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर चंदनाचे उत्पादन घेतले जात आहे. चंदनाचे कारखाने देखील कर्नाटक या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहेत.

पारंपरिक शेतीतून शेतकऱ्यांना अनेक वर्ष घाम गाळूनही अधिकचा नफा मिळत नाही, परिणामी शेतातून अधिक पैसे कमावणे शक्य नाही. असा समाज शेतकऱ्यांना झाला आहे. परंतु ही जर शेती नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व जगभरातल्या मार्केटचा अभ्यास करून शेती केली तर शेती ही नक्कीच फायदेशीर ठरते.

शेतकऱ्यांना अधिक अधिक नफा देणारे पीक म्हणून चंदन शेतीकडे पाहिले जाते, परंतु चंदन लावण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये शासनाकडून परवानगी मिळत नसल्याने चंदनाची शेती शेतकरी करत नव्हते, परंतु 2017 नंतर महाराष्ट्र शासनाने चंदन शेती करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ते चंदनाच्या बागा शेतकऱ्यांनी लावल्या आहेत. शासनाच्या माध्यमातून चंदन शेतीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना चंदन शेती ही खूप फायदेशीर ठरत आहे.

आज या लेखांमधून आपण चंदन शेती कशी करायची त्यासाठी आवश्यक रोपे, मशागत, लागवड, खते, पिकांची काळजी कशी घ्यायची, चंदनाच्या जाती, हवामान, मातीचा प्रकार, चंदन लागवडीचा प्रकार, जमिनीचा प्रकार, खतांचे व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, याची संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांनी हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचावा.

चंदन शेती

चंदन शेती
चंदन शेती

चंदन शेती

चंदनाच्या झाडाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. औषधी सुगंधी आणि धार्मिक महत्त्व असल्यामुळे चंदनाच्या झाडाला मागणी ही मोठ्या प्रमाणावर आहे. भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर चंदनासाठी फार मोठ्या प्रमाणावर मागणी असलेली पाहायला मिळते त्यामुळे भारतासारख्या देशांमध्ये कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्याच्या पाठोपाठ महाराष्ट्रात देखील उत्पादने मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत.

  1. लाडकी बहीण योजना महिलांना आता थेट 1500 रुपये वरून 2100 रुपये दिले मिळणार इथे करा अर्ज
  2. ठिबक सिंचन योजना शेतकऱ्यांना आत्ता  80 टक्के अनुदान देण्यात येते आहे असा करा अर्ज 

रक्त चंदन म्हणचे कोणते चंदन.?

चंदन हा शब्द वापरल्यानंतर आपल्याला अलीकडच्या काळात पुष्पा हा चित्रपट डोळ्यासमोर येतो, परंतु रक्त चंदन हे जंगली भागामध्ये मोठ्या प्रमाणात मिळत असून, सध्या रक्त चंदनाची शेती देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते, सौंदर्य प्रसाधनांमध्ये रक्तचंदनाचा वापर हा सर्वात मोठ्या प्रमाणावरती केला जातो, तसेच रक्तचंदन हे धार्मिक कार्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावरती वापरले जाते. रक्तचंदन म्हणजे हे एक प्रकारचे वृक्ष ज्याला आतील भागाचा रंग हा लाल असतो, रक्तचंदनाचे लाकूड हे लाल रंगाचे असते त्याचे शास्त्रीय नाव ‘टेराकॉपर्स सँन्टनस’ असे आहे. त्याला शास्त्रीय परिभाषेत सँटलम असे देखील म्हणतात.

चंदनाची रोपे कुठून खरेदी करायला हवीत.?

शेतकऱ्यांना चंद्राच्या रोपे खरेदी करण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नर्सरीमध्ये चंदनाची रोपे उपलब्ध आहेत. तुम्ही जवळच्या नर्सरीमध्ये जाऊन चांगल्या पद्धतीची चंदनाची रोपे पाहून खरेदी करायची आहेत.

चंदन शेतीसाठी जमिनीचा.?

चंदनाचे झाडे लावण्यासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक आहे, तसेच हलक्या मुरमुठ जमिनीमध्ये चंदनाची वाढ चांगली होते तसेच अल्प प्रमाणामध्ये चंदनाची निर्मिती होण्यास मदत होते.

चंदनाची लागवड पद्धत

चंदनाची लागवड करण्यासाठी वेगवेगळे शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात, परंतु चंदनाची योग्य वाढ होण्यासाठी साधारणपणे 10×10 फूट अंतरावरती चंदनाची लागवड करणे आवश्यक राहील. यामध्ये एकरी 400 ते 500 झाडे बसवतात येतील. तसेच चंदनाच्या झाडाबरोबरच चंदनाच्या जवळपास कडुलिंब मोगरा यासारखी झाडे लावणे आवश्यक राहील. चंदनाचे झाड हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नसल्यामुळे चंदनाच्या झाडाला इतर झाडांवरती अवलंबून राहणे आवश्यक असते त्यासाठी चंदनाच्या बाजूला इतर दुसऱ्या जातीची झाडे लावणे आवश्यक असते.

चंदन शेतीसाठी आवश्यक हवामान

चंदन शेतीसाठी उष्ण हवामानामध्ये चंदनाची शेती चांगल्या प्रकारे करता येते 15 अंश सेल्सिअस डिग्री ते 35 अंश सेल्सिअस डिग्री तापमानाचे चंदनाची लागवड चांगल्या प्रमाणावर होते.

चंदन पाणी व्यवस्थापन

चंदनाच्या झाडांना जास्त प्राणामानात पाण्याची आवश्यकता भासत नाही. परंतु चंदनाच्या लागवडीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये ठिबक सिंचन पद्धतीने झाडांना पाणी देणे आवश्यक राहील. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आठवड्यातून एकदा पाण्याचे आवश्यकता भासते परंतु पावसाळ्यामध्ये चंदनाच्या झाडांना फारशी पाण्याची आवश्यकता भासत नाही.

चंदन शेती
चंदन शेती

चंदनाच्या शेतीमध्ये आंतरपिके

सुरुवातीच्या काळामध्ये चंदन लागवडीनंतर तीन-चार वर्षापर्यंत हरभरा, सोयाबीन, उडीद, भुईमूग, यासारखे पिकांची लागवड करता येते व उत्पादन घेता येते.

चंद्र पिकाची काढणे आणि उत्पादन

● चंदनाची खोडनिर्मिती होण्यासाठी सात ते दहा वर्षाचा कालावधी लागतो, दहा वर्षाच्या कालावधीनंतर साधारणपणे एक किलो चंदनाला गाभा मिळतो.

● लागवडीच्या वीस वर्षानंतर साधारणपणे चार किलोपर्यंत गाभा मिळू शकतो.

● चंदनाच्या गावेची संपूर्ण लाकूड तयार होण्यासाठी 20 ते 30 वर्षाचा कालावधी लागू शकतो. ( हे फक्त लाल रक्तचंदनासाठी आहे)

चंदनाची विक्री कुठे व कशी करायची.?

चंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. साधारण चंदनाचा गाभा पंधरा हजार रुपये किलो या भावाने विक्री होत आहे. एका झाडाला साधारणपणे दहा ते बारा किलो गाभा मिळतो यानुसार एका झाडाची किंमत एक लाख ते दीड लाख रुपये होऊ शकते.

आमचा शेतकरी whatsapp ग्रुप जॉईन करा 

सारांश :

अलीकडच्या काळामध्ये पाहायला गेलं तर चंदन शेती ही खूप फायदेशीर ठरत आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चंदन शेती करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच चंदन शेती करावी व याच्या माध्यमातून अधिकचा नफा मिळवावा त्यासाठी योग्य प्रकारची जमीन योग्य प्रकारचे रोपटे पाण्याचे व्यवस्थापन करावे लागेल.

Leave a Comment