बोपदेव घाट ठरतोय धोक्याचा.! तीन दिवसात दोन अत्याचाराच्या घटना
पुणे (pune) : पुण्यातील बोपदेव घाट हा सुरक्षित नसल्याच्या गेल्या दोन दिवसात अनेक घटना समोर आल्या आहेत. बोपदेव घाट हा अत्यंत धोकादायक असून अत्याचार, विनयभंग, चोरी अशा घटना सातत्याने घडत आहेत. तरुण-तरुणींना धमकवून लूटमारीच्या घटनाही सतत घडत आहेत.
गुरुवार दि : (३) मित्रासोबत फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीसोबत रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सामूहिक अत्याचार घडल्याने पुन्हा एकदा पुणे हादरलं आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या बोपदेव घाटामध्ये सामूहिक अत्याचाराची भयंकर घटना घडली, पीडित तरुणीला सध्या रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी ही मित्रासोबत बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती, यावेळी तीन अज्ञात नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.
सदर घटनेच्या तीन दिवसापूर्वी मित्रा सोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीचे कारमधून अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक देखील केली होती. कारचालक राजेखाँ पठाण याला अटक करण्यात आली आहे. तक्रारदार तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. त्यावेळी एका इसमाने मी मानव अधिकारी संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी करत या ठिकाणी जोडप्यांना फिरण्यासाठी बंदी आहे, असे सांगून तरुणी आणि तिच्या मित्राचा मोबाईल मध्ये फोटो काढला, पुढे तरुणीला धमकावून त्याने तिला कारमध्ये बसवले त्यानंतर कोंढव्याच्या खडीमशीन चौकात नेऊन तिचा विनयभंग केला होता.
बोपदेव घाटातील पोलिस चौकी धूळखात उभी.!
कोंढवा पोलिसांकडून बोपदेवघाटामध्ये पोलीस मदत केंद्र उभे करण्यात आलेले आहे, परंतु या ठिकाणी पूर्ण वेळ कधी पोलीस थांबतच नाहीत. याचाच गैरफायदा घेण्यात येतो. पोलिसाकडून केवळ ग्रस्त घातली जाते असे सांगण्यात आले, मात्र याच पोलीस मदत केंद्राच्या आजूबाजूला सदर गुन्हेगारीच्या घटना सतत घडत असल्याचे दिसून येते. कोंढवा पोलीस ठाण्यात एकूण १४० च्या आसपास पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आहे. ही लोकसंख्या २००८ मधील लोकसंख्येच्या आधारावर कार्यान्वित करण्यात आलेली आहे. परंतु सध्याच्या लोकसंख्येनुसार पोलिसांची संख्या ही किमान २५० ते २६० असायला हवी मात्र पोलिसांची संख्या ही प्रत्यक्षात तेवढी नाही, यातूनच पोलिसांच्या मर्यादा स्पष्ट होतात.