
आवडेल तिथे प्रवास योजना 2025
आवडेल तिथे प्रवास योजना 2025 : आता कमी पैशात भरपूर फिरू शकता पहा संपूर्ण माहिती…
आवडेल तिथे प्रवास योजना 2025 : राज्यातील नागरिकांसाठी परिवहन महामंडळाकडून विविध प्रवासाच्या योजना आणल्या जातात. नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा व तो ही अगदी कमी पैशांमध्ये करता यावा यासाठी परिवहन महामंडळ विभागाकडून अगदी कमी पैशांमध्ये नागरिकांना सात दिवसाचा व चार दिवसाचा पास उपलब्ध करून दिला जातो. महाराष्ट्र राज्यातील पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळे राज्यातील नागरिकांना अगदी सोयीस्क फिरता यावी त्यासाठी ही योजना परिवहन महामंडळाने आणली आहे.
आवडेल तेथे प्रवास योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना कमी खर्चात राज्यभर फिरता यावे यासाठी 4 दिवसाचा व 7 दिवसाचा पास दिला जातो. या पासची वैधता ही पहिल्या दिवशी रात्रीचे 12 वाजल्यापासून ते शेवटच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत वैध राहील. सदरील योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील नागरिकांनी धार्मिक स्थळे फिरावित व नागरिकांना एस.टी मधून प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आवडेल तिथे प्रवास योजना 2025
यासोबतच राज्यातील परिवहन महामंडळाने मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील विविध प्रवासाच्या योजना अमलात आणलेल्या आहेत, जसे की अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना, तसेच महिलांना अर्धे तिकीट आणि 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटीचा प्रवास दिला जातो. व 65 वर्षावरील नागरिकांना अर्धे तिकीट घेतले जाते, अशा विविध परिवहन महामंडळाच्या योजना आहेत.
वाचकांना महत्त्वाच्या सूचना
शासनाच्या माध्यमातून ज्या योजना सुरू होतात त्या योजनेमध्ये वेळोवेळी बदल देखील केले जातात. त्यामुळे वाचकांनी कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन शहानिशा करणे गरजेचे असते. आवडेल तिथे प्रवास योजना 2025

आवडेल तिथे प्रवास योजना 2025 Overview
योजनेचे नाव | आवडेल तिथे प्रवास योजना 2025 |
राज्य | महाराष्ट्र |
कोणाला मिळणार लाभ | महाराष्ट्र राज्यातील नागरिक |
योजनेचा उद्देश | राज्यातील नागरिकांना कमी खर्चात जास्त प्रवास करता यावा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
आवडेल तिथे प्रवास योजनेचे मुख्य उद्दिष्टे
● महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना कमी खर्चामध्ये प्रवास करता यावा तसेच नागरिकांनी महाराष्ट्र राज्यातील धार्मिक स्थळे, व पर्यटन स्थळांना भेटी द्याव्यात हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
● महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त एसटीने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
● तसेच नागरिकांनी एसटीने जास्तीत जास्त प्रवास करावा व एसटीकडे नागरिकांनी आकर्षित व्हावे हा देखील शासनाचा मुख्य उद्देश आहे.आवडेल तिथे प्रवास योजना 2025
आवडेल तिथे प्रवास योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
1. या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे पाच हे दहा दिवस अगोदर नागरिकांना दिले जातात.
2. या योजनेच्या माध्यमातून प्रवास करण्यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत व पास त्वरित उपलब्ध करून दिले जातात.
योजनेचे मुख्य फायदे
● राज्यातील नागरिकांना कमीत कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त प्रवास करता येतो त्यामुळे नागरिकांच्या पैशांची बचत मोठ्या प्रमाणावर होते.
● आवडेल तिथे प्रवास योजनेच्या माध्यमातून तुम्ही एसटीच्या सर्व बसेसने साधी (साधी जलद) रात्र सेवा, शहरी व यशवंती, मीडी शिवशाही, आसनी या सर्व बसने प्रवास करू शकता.
Ration e-kyc 2025 information : रेशन कार्ड ची केवायसी घरबसल्या फक्त 5 मिनिटात…
योजनेच्या नियम व अटी
● आवडेल तेथे प्रवास या योजनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तीच्या नावे पास करण्यात आलेला आहे केवळ तीच व्यक्ती या पाच चा वापर करून प्रवास करू शकते.
● प्रवास करत असताना दिलेल्या पाचची मुदत संपल्यानंतर प्रवाशाला वेगळे तिकीट आकारले जाईल.
● पास घेतल्यानंतर तो तुमच्याकडून गहाळ झाला तर दुसरा पास देण्यात येत नाही किंवा त्याचा मोबदलाही मिळत नाही.
● एखादा प्रवासी पाचच्या माध्यमातून प्रवास करत असताना गैरव्यवहार करत असेल तर तो पास रद्द केला जातो. व जप्त देखील केला जातो. आवडेल तिथे प्रवास योजना 2025
● बस काढल्यानंतर सृष्टीचा संप किंवा काम बंद आंदोलन यामुळे राज्य परिवहन वाहतूक बंद झाली व प्रवासी सदर पासवर्ड प्रवास करू शकला नाही तर प्रवाशांना प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा मुदतवाढ देण्यात येईल.
● या योजनेमध्ये फक्त सात दिवस व चार दिवसाच्या पास दिले जातात.
आवडेल तिथे प्रवास योजनेसाठी पास काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे
● अर्जदाराला पास मिळवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील नजीकच्या राज्य परिवहन बस स्टॅन्ड मध्ये जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
● अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आधार कार्ड व अर्जावरती फोटो लावून सदर फॉर्म जमा करायचा आहे. आवडेल तिथे प्रवास योजना 2025
परिवहन महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
सारांश :
अशाप्रकारे तुम्ही आवडेल तिथे प्रवास योजना 2025 च्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पर्यटन स्थळी व धार्मिक स्थळे भेटू देऊ शकता. सदर योजना ही अतिशय परवडणारी असून नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यास हरकत नाही. माहिती आवडली असेल तर इतर नागरिकांना देखील शेअर करावी.