आंतरजातीय विवाह योजना 2024 : तीन लाखाचे आर्थिक सहाय्य
आंतरजातीय विवाह योजना 2024 : समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यासाठी व समाजामध्ये असलेला जाती-भेद धर्म – भेदभाव नष्ट करण्याच्या उद्देशाने आंतरजातीय विवाह योजना शासनाच्या माध्यमातून अमलात आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील मुलगा किंवा मुलगी जर अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलगा किंवा मुली सोबत लग्न केल्यास अशा परिस्थितीत त्या जोडप्यांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत शासनाच्या माध्यमातून देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी 50% रक्कम केंद्र सरकार आणि 50% रक्कम राज्य शासनाच्या अंतर्गत दिली जाते.
21 व्या शतकामध्ये डिजिटल युगामध्ये जगत असताना देखील देशांमध्ये अनेक जाती-धर्माच्या घटना घडलेल्या आपण पाहत आहोत. समाजामध्ये आंतरजातीय विवाह केल्यास प्रचंड विरोध तसेच जाती-जातीमध्ये भेदभाव धर्मामध्ये भेदभाव आज देखील फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. समाजातील हा भेदभाव कुठेतरी संपुष्टात यावा या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे.
आंतरजातीय विवाह योजना 2024 मध्ये ज्या जोडप्याने आंतरजातीय विवाह केला आहे, त्यामधील मुलगा किंवा मुलगी अनुसूचित जाती प्रवर्गातील व दलित समाजातील असल्यास अशा जोडप्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून 2.50 लाख रुपये प्रोत्साहन स्वरूपात दिले जातात.
आंतरजातीय विवाह योजना 2024 केल्यानंतर विवाह करणाऱ्या जोडप्याला समाजाबद्दल तीव्र विरोध होतो, त्यामुळे त्यांच्या संसारासाठी आर्थिक हातभार लावण्यासाठी शासनाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. आपल्या देशात अजूनही काही ग्रामीण भागामध्ये जात धर्म यावरून खूप मोठ्या प्रमाणावरती भेदभाव केला जातो धर्माच्या नावाखाली अनेक ठिकाणी दंगे देखील घडवले जातात. तसेच समाजामध्ये आंतरजातीय विवाह केल्यानंतर अनेक चुकीच्या खूप सार्या पद्धती समजल्या जातात. हा भेदभाव कुठेतरी संपुष्टात यावा हा सरकारने विचार करून या योजनेची सुरुवात केली आहे.
आंतरजातीय विवाह योजना Highlight
योजनेचे नाव | आंतरजातीय विवाह योजना |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमातीतील विवाहित जोडपे |
लाभ | 3 लाख रुपये/- |
योजनेचा उद्देश | समाजातील जाती धर्म भेदभाव नष्ट करणे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | online /ऑफलाइन |
आंतरजातीय विवाह योजनेचे मुख्य उद्दिष्टे
● समाजातील जाती-जातीमध्ये असणारा भेदभाव धर्मामध्ये असणारा भेदभाव हा नष्ट व्हावा व सर्वांना समान हक्क देण्याच्या उद्देशाने आंतरजातीय विवाह योजना सुरू करण्यात आलेली आहे.
● समज गैरसमज समाजातील नष्ट करणे.
● आंतरजातीय विवाह योजना 2024 विवाह केल्यानंतर विवाहित जोडप्या समाजात मान्यता दिली जात नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या संसारीक जीवनामध्ये हातभार लावणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
● प्रत्येक जातींना व धर्म समान स्थान देणे हा देखील शासनाचा उद्देश आहे.
● समाजातील प्रत्येक तरुणांनी किंवा तरुणींनी जाती-धर्माचा विचार न करता विवाह करावेत या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
आंतरजातीय विवाह योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
1. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह योजना एक महत्त्वपूर्ण योजना राबवली आहे.
2. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील आंतरजातीय विवाह केल्यास राज्य शासनाकडून 50 हजार रुपये व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून 2.50लाख रुपये अशी दोन्ही मिळून 3 लाख रुपये पर्यंतचे विवाहित जोडप्यास अनुदान दिले जाते.
3. समाजातील तरुणांनी आंतरजातीय विवाह करून जातील कमी करून प्रत्येक धर्माला समान स्थान द्यावे.
4. या योजनेच्या माध्यमातून समाजामध्ये असणारा आंतरजातीय विवाह विषयाचा द्वेष दूर होण्यास मदत होईल.
5. आंतरजातीय विवाह योजना 2024 विवाह केल्यानंतर या योजनेअंतर्गत दिले जाणारे प्रोत्साहन रक्कम डीबीटीच्या साह्याने थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
शासनाच्या इतर योजना पहा
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना 2024 फक्त ३३० रुपयात 2 लाखाचा विमा
राज्यातील तरुणांना बिनव्याजी कर्ज Vasantrao Naik Karj Yojana 2024
आंतरजातीय विवाह योजना कोणत्या जातीसाठी लागू आहे.?
आंतरजातीय विवाह योजना ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम
● आंतरजातीय विवाह योजनेच्या अंतर्गत विवाह करणाऱ्या जोडप्यांना 50 हजार रुपयांची आर्थिक रक्कम शासनाच्या माध्यमातून देण्यात येते.
● यामध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यापैकी एक जण मुलगा किंवा मुलगी अनुसूचित जाती प्रवर्गातील, व दलित समाजातील असल्यास अशा जोड्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून 2.5 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
विभाग | मिळणारी रक्कम |
महाराष्ट्र शासनाकडून | 50 हजार रुपये |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून | 2.5 लाख रुपये |
एकूण मिळणारी रक्कम | 3 लाख रुपये |
आंतरजातीय विवाह योजनेचे नियम व अटी
● आंतरजातीय विवाह योजना 2024 ही फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या नागरिकांसाठीच आहे.
● महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
● आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ हा ज्या मुलांनी किंवा मुलींनी अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलगा किंवा मुली सोबत विवाह केला आहे यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
● विवाहित मुलाची 21 वर्षे पूर्ण असावीत व मुलीची अठरा वर्ष पूर्ण असावी.
● आंतरजातीय विवाह केल्यानंतर हा विवाह लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना कोर्ट मॅरेज करणे अनिवार्य आहे.
सरकारी योजनेसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
आंतरजातीय विवाह योजना 2024 योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1. विवाहाचा दाखला
2. आधार कार्ड
3. उत्पन्नाचा दाखला ( सक्षम अधिकाऱ्याने दिलेला म्हणजेच तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला)
4. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो ( दोघांचे सोबत असलेले)
5. जातीचा दाखला
6. जन्माचा दाखला
7. बँक खात्याचा तपशील
8. मोबाईल क्रमांक
9. ई-मेल आयडी
आंतरजातीय विवाह योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
आंतरजातीय विवाह योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अंतरजातीय विवाहित जोडपी अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
● योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी जोडप्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
● संकेतस्थळावर गेल्यानंतर आंतरजातीय विवाह योजना दिसेल त्याला क्लिक करावे क्लिक केल्यानंतर नवीन एक होमपेज ओपन होईल.
● नवीन पेजवर एक रजिस्ट्रेशन अर्ज दिसेल त्यामध्ये विचारली सर्व माहिती जसे की मुलाचे नाव, मुलीचे नाव, जन्म तारीख, जात, लग्नाची तारीख, आधार क्रमांक इत्यादी माहिती व्यवस्थित त्या भरून विचारलेली कागदपत्रे सर्व सबमिट करायकगी आहेत.
● अशाप्रकारे तुमचा ऑनलाईन फॉर्म भरला जाईल आंतरजातीय विवाह योजना 2024
अर्ज करण्याच्या ऑफलाईन प्रक्रिया
● अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयात जायचे आहे.
● जिल्हा कार्यालय मध्ये जाऊन आंतरजातीय विवाह योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
● अर्जात विचारी सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे त्यासोबत जोडायचे आहेत व भरलेला अर्ज त्याच कार्यालयात जमा करायचा आहे.
● अशा प्रकारे तुमचा आंतरजातीय विवाह योजनेचा ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरला जातो.
शासनाचे अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
आंतरजातीय विवाह योजना पीडीएफ | येथे क्लिक करा |
सरकारी योजनेसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप | जॉईन करा |
सारांश –
अशाप्रकारे आंतरजातीय विवाह योजना 2024 योजनेसाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांनी अर्ज करायचा आहे. वरील माहिती सविस्तर वाचून समजून घेऊन अर्ज करायचे आहेत, माहिती आवडली असल्यास गरजू व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा, काही अडचणी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू.