Annasaheb patil karj yojana 2024 | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
Annasaheb patil karj yojana 2024 : महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुण व तरुणींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अमलात आणलेले आहे. देशातील लोकसंख्येचा विचार करता भारतीय लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येपैकी 54 टक्के लोकसंख्या ही 25 वर्षाच्या आतील नागरिकांची आहे. त्यामुळे या नागरिकांना कुशल बनवणे ही शासनाची जबाबदारी आहे.
राज्यातील तरुण व तरुणींना शासनाच्या माध्यमातून कुशल बनवणे तसेच औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनता वाढवणे स्वयंरोजगार तयार करून नागरिकांना सक्षम करणे, त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, राज्यातील युवा उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांना व तरुणींना आर्थिक सहाय्य पुरवण्याच्या दृष्टिकोनातून अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
Annasaheb patil karj yojana 2024 योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित कुशल तरुणांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सुरू असलेल्या व्यवसाय वाढवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून 10 ते 10 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज वितरित केले जाते.
राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची सुरुवात करण्यात आली राज्यातील बेरोजगारी बघता मराठा समाजातील तरुणांना हाताला काम मिळावे व तरुणांनी स्वतःचा व्यवसाय उभा करावा यासाठी महाराष्ट्र राज्यातील मराठा तरुणांसाठी ही योजना सुरू केली गेली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना अत्यंत सोप्या प्रक्रियेतून त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते व या कर्जावर कोणत्याही प्रकारचे महामंडळ व्याज आकारत नाही त्यामुळे तरुणांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी चालना मिळते.
Annasaheb patil karj yojana 2024 सुरुवातीच्या काळामध्ये कर्ज घेण्यासाठी अनेक लोकांना खूप सार्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक बँका तरुणांना कर्ज घेण्यासाठी प्रतिसाद देत नव्हत्या, तसेच अनुदान स्वरूपात योजना नसल्याने युवक कर्ज घेण्यास पुढे येत नव्हते, मात्र महामंडळाला उभारी देण्यासाठी शासनाने अनेक याच्यावरती उपाययोजना केल्या आहेत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना Overview
योजनेचे नाव | अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ योजना |
लाभार्थी नागरिक | महाराष्ट्र राज्यातील मराठा तरुण |
लाभाची रक्कम 10 | लाखापासून ते 50 लाखापर्यंत |
उद्देश | व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन |
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून प्रमुख तीन योजना राबवल्या जातात
1. गट कर्ज व्याज परतावा योजना
2. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
3. गट प्रकल्प कर्ज योजना
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील तरुणांना 10 लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच अर्जदार लाभार्थी तरुणांनी कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यास त्या हप्त्याच्या व्याजाचे रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
या योजनेच्या माध्यमातून दिव्यांगासाठी 4 टक्के निधी हा राखीव ठेवण्यात आलेला आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची मुख्य उद्दिष्टे
1. राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच सुरू असलेल्या व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
2. ग्रामीण भागातील तरुणांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे.
3. स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
4. राज्यातील बेरोजगारी कमी करून तरुणांच्या हाताला काम देणे.
5. राज्यातील व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना व तरुणींना सहज कर्ज उपलब्ध करून देणे.
6. राज्यातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी इतरांकडे पैशासाठी अवलंबून राहू नये.
7. एकंदरीत अण्णासाहेब पाटील कर्ज सुरू करण्याचा मुख्य उद्देश हाच की राज्यातील बेरोजगारी कमी करून उद्योगधंद्यांना चालना देणे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे मुख्य वैशिष्ट्य
● Annasaheb patil karj yojana 2024 योजना ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे.
● सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराला ऑनलाईन च्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे त्यामुळे कोणतेही शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.
● सदर योजनेचा अर्ज करण्यासाठी लाभार्थी नागरिक मोबाईलच्या माध्यमातून ही अर्ज करू शकतो.
● सदर योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन असल्यामुळे या योजनेत पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होते व योग्य गरजू व्यक्तींना कर्ज पुरवले जाते.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मिळवण्यासाठी पात्रता
1. अर्जदार नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराच्या वयाची अट ही पुरुषांकरिता 50 तर महिला करता 55 वर्ष असेल.
3. अर्जदार लाभार्थी हा मराठा कॅटेगिरीतील असावा.
योजनेच्या नियम व अटी
● लाभार्थी अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
● अर्जदाराकडे अपंग प्रमाणपत्र असल्यास अक्षम मापदंडाच्या अंतर्गत कर्ज करताना अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
● सदर योजनेचा लाभ हा एका व्यक्तीला एकदाच घेता येतो.
● अर्जदार हा कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना आवश्यक कागदपत्रे
● ऑनलाइन नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे.)
4. जातीचा दाखला
5. वयाचा दाखला
6. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
7. मोबाईल नंबर
8. प्रकल्प अहवाल
● प्रत्यक्ष बँकेतून कर्ज घेताना आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. वीज बिल
4. उद्योग सुरू करण्याबाबतचा अधिकृत परवाना
5. बँक पासबुक झेरॉक्स
6. सिबिल स्कोर रिपोर्ट.
7. व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
8. व्यावसायिक प्रकल्प अहवाल
Annasaheb patil karj yojana 2024
कर्ज घेतल्यानंतर व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1. बँक कर्ज मंजुरीचे पत्र
2. बँक स्टेटमेंट
3. व्यवसाय सुरू करण्याबाबतचा परवाना
4. व्यवसाय प्रकल्प अहवाल
5. सदरील व्यवसायाचा फोटो
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
सदरील योजनेसाठी ऑनलाईन च्या माध्यमातून लाभार्थी नागरिकांना अर्ज करता येतो.
● लाभार्थी अर्जदाराला सर्वप्रथम शासनाचे या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
● होमपेजवर गेल्यानंतर नोंदणी या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
● आता पुढे तुमच्यासमोर नवीन नोंदणीसाठी तुमची माहिती विचारली जाईल, ती भरावयाचे आहे. सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुढे या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
● आता तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड दिला जाईल, त्याचा वापर करून तुम्हाला लॉगिन करायचे आहे.
● लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अर्ज या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर विचारलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरून फॉर्म सबमिट करायचा आहे. Annasaheb patil karj yojana 2024
शासनाचे अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्रमांक | 022-22657662 |
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पीडीएफ | येथे क्लिक करा |
योजनेसाठी whatsapp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
सारांश –
अशाप्रकारे Annasaheb patil karj yojana 2024 राज्यातील सुशिक्षित तरुण हे आपल्या व्यवसायाच्या उन्नतीसाठी व असलेल्या व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ आर्थिक साह्य योजनेच्या माध्यमातून दहा लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात, माहिती आवडली असल्यास इतरांना देखील शेअर करा. Annasaheb patil karj yojana 2024