
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना 2025
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना 2025 | Ahilyabai Holakar Scheme In Marathi
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना 2025 : राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना अमलात आणल्या जातात व त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दिला जातो. त्यामुळे शासनाची प्रत्येक योजना ही विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, त्या योजनेचा लाभ हा त्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. यासाठी या लेखाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थिनींसाठी राज्य शासनाने सुरू केलेली अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना, या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. योजनेचा लाभ कोण घेऊ शकते योजनेसाठी आवश्यक पात्रता कोणती.? अर्ज कुठे करायचा.? मोफत पास कसा मिळवायचा.? या सर्व मुद्द्यांची चर्चा या लेखांमधून आपण करणार आहोत. त्यामुळे वाचकांनी लेख हा शेवटपर्यंत वाचावा.
प्राथमिक शाळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना आपले माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी अनेक मुलींना आपल्या गावाबाहेर शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. त्यासाठी प्रवासाचा खर्च हा पालकांना भरावा लागतो आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पालक आपल्या मुलींना शिक्षणासाठी स्वखर्चाने पाठवू शकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये मुलींना अनेक वेळा आपले शिक्षण बंद करावे लागते. परिणामी मुलींचे शिक्षण थांबले जाते, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू नये व ग्रामीण भागातील कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मुलींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना 2025योजना सुरू केली आहे.
प्रत्येक मुलांना शिकण्याचा अधिकार हा आहे. त्यामुळे प्रत्येक मुलगी ही शिकलीच पाहिजे, व ती स्वतःच्या पायावरती उभे राहून आपलं भविष्य उज्वल करू शकते त्यामुळे प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांनी मूल्यांना शिकवण्यासाठी व महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी महिलांसाठी व विद्यार्थिनींसाठी विविध योजना अमलात आणत आहेत.
ग्रामीण भागातील इयत्ता ५वी ते इयत्ता १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व येण्यासाठी मोफत बसणे प्रवास करता यावा यासाठी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. आजही राज्यातील ग्रामीण भागातील खेड्यापाड्यावरील व डोंगरी भागामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने, अनेक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापासून कुठेतरी लांब ठिकाणी शिक्षणासाठी जावे लागते. त्यासाठी मुलींना शाळेत जाण्या येण्यासाठी मोफत बसचा प्रवास दिला जातो. यासाठी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना ही राज्य शासनाने राबवलेली महत्त्वाची योजना आहे. अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना 2025

अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना 2025 Overview
योजनेचे नाव | अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना 2025 |
योजनेची सुरुवात | 1996-97 विभाग महाराष्ट्र सरकार |
योजनेचा उद्देश | ग्रामीण भागातील इयत्ता ५वी ते इयत्ता १०वी पर्यंत शिकायला जाणाऱ्या मुलींना मोफत प्रवास करण्याची सुविधा देणे |
लाभार्थी | इयत्ता ५वी ते १०वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी |
लाभ | विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करण्याची सुविधा देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन ऑफलाइन |
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना 2025 योजनेचा मुख्य उद्देश
● राज्यातील ग्रामीण भागामध्ये आजही प्रत्येक गावामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना काही कोसो दूर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी जावे लागते. अनेक पालकांची परिस्थिती नसल्यामुळे प्रत्येक महिन्याचा मुलींचा जाण्याचा खर्च पालक भरू शकत नसल्यामुळे परिणामी मुलींना शिक्षण सोडावे लागते. त्यासाठी पुढे शिक्षण मुलींनी सुरू ठेवावे त्यासाठी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना सुरू केली आहे.
● कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी अहिल्याबाई होळकर योजनाही महत्त्वाचे आहे.
● आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही मुलीला वंचित राहू नये यासाठी मोफत पास योजना सुरू करून मुलींनी शिक्षण घेणे आजच्या काळात गरजेचे आहे, यासाठी मोफत पास योजना सुरू केले आहे.
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेची मुख्य वैशिष्ट्ये.
1. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळेत जाणे येण्यासाठी बस पास हा मोफत देण्यासाठी ही एक राज्यातील महत्त्वपूर्ण योजना आहे.
2. सदरील योजनेच्या माध्यमातून राज्यातील इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी प्रवासी खर्च मोफत व्हावा यासाठी ही योजना शासनाने सुरू केली आहे.
3. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील व ज्या गावांमध्ये माध्यमिक शाळा नाहीत अशा गावातील मुलींसाठी ही एक महत्त्वाची योजना ठरलेली आहे.
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेसाठी नियम व अटी
● अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना ही फक्त राज्यातील मुलींसाठी सुरू केलेली ही एक योजना आहे.
● सदरील योजनेचा लाभ हा मुलांना दिला जात नाही.
● इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना ही योजना आहे. पुढील शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही योजना नाही.
● सदरील मुली ह्या नियमित शाळेत जाणाऱ्या असाव्यात.
● विद्यार्थिनी ही ग्रामीण भागामध्ये व डोंगराळ भागांमध्ये राहणारी असावी.
● सदरील विद्यार्थिनींची उपस्थिती ७५ टक्के शाळेमध्ये अनिवार्य आहे.
● अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेसाठी सदरील मुलगी ही दारिद्र्यरेषेखाली असावी. अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना 2025
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेचे फायदे
● ग्रामीण भागातील अनेक मुली आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे आपले शिक्षण अर्धवट सोडतात, परंतु या योजनेच्या माध्यमातून मुलींना मासिक पास मोफत उपलब्ध केल्यामुळे मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत.
● सदरील योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल तसेच सामाजिक, आर्थिक विकास देखील होईल.
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेसाठी महत्त्वपूर्ण कागदपत्रे
1. मुलीचे आधार कार्ड
2. बोनाफाईड
3. प्रवेश पावती
4. दोन पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
5. विहित नमुन्यातील अर्ज
6. 75 टक्के हजेरी प्रमाणपत्र
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना 2025
वरील दिलेल्या कागदपत्रांमध्ये काही वेळा योजनांमध्ये बदल झाल्यास तो वेळोवेळी बदल देखील केला जातो, हे वाचकांनी लक्षात ठेवावे.
मोफत पास मिळवण्यासाठी अर्जाची प्रक्रिया कशी कराल.?
● अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेसाठी मुलींना स्वतःच्या शाळेत जाऊन मुख्याध्यापका मार्फत अर्ज केले जातात.
● सदरील शाळेमध्ये मुख्याध्यापक पात्र विद्यार्थिनींची तपशीलवार येथे राज्य परिवहन महामंडळाच्या आगार प्रमुखांना पाठवतात,
आगार प्रमुख त्या विद्यार्थिनींना तिमाही मोफत पास वितरित करतात. प्रत्येक तिमाहीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण शाळेकडून महामंडळाला दिले जाते. त्या आधारावर पुढील तीमाईचा पास मुलींना दिला जातो.
अधिकृत माहिती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
सरकारी योजनेसाठी आमचा whatsapp ग्रुप | जॉईन करा |
सारांश :
विद्यार्थी मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना 2025 योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून चालवली जाणारी एक महत्वपूर्ण योजना आहे. इयत्ता ५वी ते १०पर्यंत सर्व विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जातो, त्याच्या नियम व अटी आपण सर्व पाहिलेले आहेत, तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या शाळेच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्णपणे केली जाते. त्यासाठी तुम्ही तुमच्या शाळेतील मुख्याध्यापकांना भेटून याविषयी सविस्तर चर्चा करावी. माहिती आवडली असल्यास इतर विद्यार्थी यांना देखील सांगावी व शेअर करावी