
सनमडीतील आश्रम शाळेतील शिक्षकावर अखेर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल...
सनमडीतील आश्रम शाळेतील शिक्षकावर अखेर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल…
दैनिक प्रतिनिधी :
सांगली – जत तालुक्यातील एका गावातील आश्रमशाळेत शिकणाऱ्या अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप शुक्रवार दि : १८-०४-२०२५ रोजी करण्यात आला होतो. संबंधित घटना जत तालुक्यातील सनमडी आश्रमशाळेत शिकणाऱ्या ५ ते ६ विद्यार्थिनी सोबत घडली असल्याचे सांगण्यात येत होते. शुक्रवारी दुपारी मुलींना घरी सोडण्याच्या बहानाने गेल्यानंतर नराधम शिक्षकाने मुलींवरती लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर मुख्यध्यापक विनोद जगदाने या नराधमास गावकऱ्यांनी जाब विचारत जबर मारहाण देखील केली होती.
पुण्यातील महत्त्वाची 5 न पाहिलेली पर्यटन स्थळ – सविस्तर माहिती
परंतु कोणत्याही पीडित पालकांच्या तक्रारी आल्या नसल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालिका धनश्री भांबुरे यांनी तातडीने आश्रम शाळेस भेट दिली. संबंधित शिक्षकाचे बंद खोलीत जबाब घेतले, त्यानंतर आश्रम शाळेतील प्रशासनाने देखील यासंदर्भात बैठक घेऊन सखोल चौकशी करत आहोत असे सांगितले होते. तसेच प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील संबंधित शिक्षकावर कठोरातील कठोर कारवाई करावी असे आदेश प्रशासनाला दिले होते. तसेच पीडित मुलींच्या पालकांना समोर येऊन गुन्हे दाखल करावेत असेही पडळकरांकडून आव्हान करण्यात आले होते.
यानंतर शनिवार दि : २६-०४-२०२५ रोजी संध्याकाळी पीडित पालकांनी उमदी पोलीस स्टेशन येथे सदरील मुख्याध्यापकाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला असून उमदी पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी – सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे पुढील तपास करत आहेत.
यापूर्वीही अनेक घटना घडल्या पण प्रकरण दाबले
सदरील आश्रम शाळेत जत पूर्व भागातील अनेक मुली शिक्षण घेत असून याच्या अगोदरही अनेक मुलींनी आपल्या पालकांकडे तक्रारी केल्या होत्या, परंतु अनेक वेळा प्रकरण दाबले असल्याचे चर्चा आहे. सदरील घटना ही अत्यंत गंभीर असून सध्या गावात चर्चेचा विषय ठरली आहे.