
IIT Admission 2025
IIT Admission 2025 : परंपरागत शिक्षणामुळे वाढती बेरोजगारी – विद्यार्थी तांत्रिक शिक्षणाकडे कल
dainikmaza.com
पुणे : देशामध्ये सर्वाधिक रोजगाराची संधी म्हणून (IIT Admission 2025) आयआयटीकडे सर्वाधिक पाहिले जाते. देशामध्ये दिले जाणाऱ्या पारंपरिक शिक्षणामुळे सध्या बेरोजगारी वाढत असून नोकरीच्या संधी खूपच कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे सध्या अनेक विद्यार्थ्यांचा आयएटीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. मागील काही वर्षात इलेक्ट्रिशियनच्या अभ्यासक्रमांना राज्यातील विद्यार्थ्यांनी अधिकची पसंती दिलेली पाहायला मिळते. या पाठोपाठ फिटर, बिल्डर, मेकॅनिक, डिझेल यासारख्या अभ्यासक्रमाकडे कल दिसून येत आहे. मागील काही वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, मागील वर्षात गुणवंत विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, डिझेल फिटर वेल्डर, वायरमन आधी अभ्यासक्रमांना अधिकची पसंती दाखवली होती. यासोबतच संगणक ऑपरेटर म्हणून प्रोग्रामिंग असिस्टंट यासारख्या अभ्यासक्रमांना अधिकची पसंती दिलेली पाहायला मिळते.

पुण्यातील टॉप 5 पर्यटन स्थळे | या स्थळांना नक्की भेट द्या
यावर्षी प्रवेशासाठी 419 शासकीय आयटीमध्ये त्यांना 93 हजार 588 मध्ये अशासकीय 61 हजार अशा एकूण एक लाख 54 हजार जागावर प्रवेश होणार आहेत. एक वर्ष कालावधीचे 44 अभ्यासक्रम व दोन वर्ष कालावधीची 36 अभ्यासक्रम सध्या उपलब्ध आहेत. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने सदरील https://admission.dvet.gov.in/ वेबसाईट वरती अर्ज भरता येणार आहेत.
IIT Admission 2025 : प्रवेशा संदर्भातली सविस्तर माहिती व नियमावली व मार्गदर्शक पुस्तिका देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर प्रथम फेरीसाठी आपल्या पसंतीचे व्यवसाय व संस्था निवडीसाठी आवश्यक ते पर्याय सादर करता येणार आहेत. यासाठी ऑप्शन फॉर्म भरण्यास 26 मे पासून सुरुवात होणार आहे. मागील दोन दिवसांमध्ये 4219 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, यापैकी 2932 जणांनी आपला अर्ज अंतिम केलेला आहे. तरी यापैकी 2631 विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरलेले आहे.
प्रवेश अर्ज भरल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता जाहीर होईल यानंतर विद्यार्थ्यांना हरकती नोंदवण्यासाठी मुदत दिली जाणारा असून त्यानंतरच अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल व पहिली गुणवंत यादी जाहीर होणार आहे. यंदा दहावीचा निकाल लवकर जाहीर झाल्यामुळे नोंदणीची प्रक्रिया सुरू केली असून पुढील वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. IIT Admission 2025
अकरावी प्रवेशासाठी दीड हजार महाविद्यालयांची नोंदणी
सन 2025-26 चे ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सध्या या https://mahafyjcadmissions.in/landing अधिकृत संकेतस्थळावर सुरू झालेले आहे. ही प्रक्रिया महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी लागू आहे. पुणे विभागातील 1533 महाविद्यालयापैकी 1526 महाविद्यालयांनी नोंदणी पूर्ण केली. आहे त्यापैकी 117 महाविद्यालयांची पडताळणी करून अंतिम करण्यात आल्याचे उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झालेला असून विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेच्या सुविधा 19 मे 2025 पासून उपलब्ध करून दिले जाणार आहे. नोंदणी प्रक्रिया दरम्यान तांत्रिक अडचणी किंवा मार्गदर्शन महाविद्यालयांची या 8530955564 हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधावा असे जाहीर करण्यात आले आहे.