
Ration e-kyc 2025 information
Ration e-kyc 2025 information : रेशन कार्ड ची केवायसी घरबसल्या फक्त 5 मिनिटात…
Ration e-kyc 2025 information : शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना e-kyc करणे शासनाने आता बंधनकारक केले आहे. रेशन दुकानात जाऊन ई-पॉज मशीन द्वारे e-kyc नागरिकांना करता येणार आहे त्यासाठी प्रत्येकाने रेशन दुकानात जाऊन e-kyc करणे शासनाने सांगितले आहे. Ration e-kyc 2025 information परंतु अद्याप अनेक नागरिकांची केवायसी करणे बाकी असल्यामुळे शासनाने आता 31 मार्चपर्यंत मुदत वाढवून दिलेली आहे.
देशातील प्रत्येक कुटुंबासाठी शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड काढले जाते व त्याचा आधारे रेशन धारकांना स्वस्त धान्य पुरवठा केला जातो. यामध्ये तीन प्रकारचे रेशन कार्ड असतात जसे की, पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, व पांढरे रेशन कार्ड असे एकूण रेशन कार्ड चे तीन प्रकार पडतात, यामध्ये पिवळ्या शिधापत्रिकेसाठी वेगळे निकष आहेत, तसेच केसरी शिधापत्रिकेसाठी वेगळे निकष असतात व पांढऱ्या शिधापत्रिकेसाठी वेगळे निकष, म्हणजेच तिन्ही रेशन कार्ड साठी वेगवेगळे शासनाचे निकष आहेत. Ration e-kyc 2025 information
परंतु आता शासनाने प्रत्येक रेशन कार्ड साठी e-kyc करणे बंधनकारक असल्यामुळे प्रत्येक कुटुंबाला आपल्या रेशन कार्ड ची e-kyc करून घ्यावी लागणार आहे. परंतु e-kyc करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला स्वस्त धान्य दुकानदार जवळ जाऊन ई पॉज मशीन द्वारे ई केवायसी करावी लागत आहे. परंतु आता शासनाच्या माध्यमातून घरबसल्या रेशन कार्ड ची केवायसी करण्यासाठी ॲप तयार करण्यात आलेले आहेत या याच्या माध्यमातून नागरिकांना घरी बसून आपल्या रेशन कार्डची e-kyc करता येणार आहे.

इ- पॉज मशीन द्वारे e-kyc करताना नागरिकांना आणि अडचणी येत होत्या, लहान मुलांचे आणि वृद्ध लोकांचे बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारने नवीन ॲप लॉन्च करून रेशन कार्ड धारकांना ई केवळसी करण्याचा मार्ग सोपा केला आहे.
त्यामुळे आता रेशन कार्डची ई-केवायसी तुम्ही तुमच्या हातातील मोबाईलद्वारे घरबसल्या e-kyc करू शकणार आहात. सरकारने सुरू केलेल्या या app चे नाव Mera E-Kyc आहे. त्या द्वारे आता लाभार्थी स्वतः धान्य दुकानात न जाता अगदी घरबसल्या करू शकणार आहेत. ॲपच्या माध्यमातून e-kyc करण्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीचा अवलंब केला गेला आहे. काही मिनिटातच आपल्या रेशन कार्ड ची e-kyc पूर्ण होते.
काय आहेत नक्की वैशिष्ट्ये
● देशातील नागरिकांना आता घरबसल्या सोप्या पद्धतीने e-kyc करता येणार आहे.
● फेस ऑथेंटीकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी देखील होईल.
● आपल्या गावातील रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ही केवायसी आता सहजरीत्या करू शकेल. Ration e-kyc 2025 information
खालील स्टेप चा अवलंब करून घरबसल्या e-kyc करून घ्या..
● सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये जाऊन प्लेस्टोर वरून दोन ॲप इंस्टॉल करावे लागतील.
1. Mera E-Kyc
2. Adhar Face RD-Service App
सर्वप्रथम हे दोन्ही ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्या पुढील कारवाई खालील प्रमाणे
App ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम ● राज्य निवडा
● केवायसी करणाऱ्या नागरिकाचा आधार क्रमांक टाका
● मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो त्यामध्ये प्रविष्ट करा
● त्यानंतर कॅपच्या कोड टाका
Namo shetakri yojana 2025 | नमो शेतकरी योजनेमध्ये मोठा बदल आता वर्षाला 3 हजार रुपये…..
पुढील स्टेप
● आता चेहऱ्याद्वारे पडताळणी करा
● स्वतःसाठी फ्रंट कॅमेरा सुरू करून स्वतःचा चेहरा स्कॅन करून घ्या.
● स्क्रीनवर दिलेल्या सूचनानुसार डोळ्याची उघडझाप करा
● दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असल्यास तुम्ही तुमच्या मोबाईलचा बॅक कॅमेरा चा वापर करू शकता.
आता पुढे यशस्वी पडताळणी झाल्यानंतर लाभार्थ्याची माहिती रास्त भाव दुकानदाराच्या मशीनवर दिसेल. याची खात्री करण्यासाठी ॲप मध्ये स्टेटस तपासा जर ई केवायसी स्टेटस वर Y दिसत असेल तर तुमची प्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झालेले आहे.
हे ही लक्षात ठेवा
● वरील दिलेली सर्व प्रक्रिया ही फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
● महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील स्थलांतरित करून आलेल्या लाभार्थ्यांसाठीही प्रक्रिया नाही.
● तुमचे रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी शासनाने 31 मार्च 2025 शेवटची तारीख दिलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून लवकरात लवकर आपल्या रेशन कार्ड ची केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. Ration e-kyc 2025 information
खालील लिंक चा वापर करून तुम्ही दोन्ही ॲप डाऊनलोड करू शकता.
Mera E-kyc App | डाऊनलोड करा |
Adhar Face Rd App | डाऊनलोड करा |
सरकारी योजना व नवीन माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप | जॉईन करा |
सारांश :
शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड च्या प्रकारानुसार स्वस्त धान्य पुरवठा केला जातो. त्यासाठी शासनाला वेळोवेळी पडताळणी करणे गरजेचे असते. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांची ईकेवायसी करण्यात येते. त्यामुळे शासनाने आता 31 मार्च 2025 ची तारीख ही केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख दिलेली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी ई केवायसी करून घेणे आवश्यक आहे. वरील माहिती आवडली असल्यास इतर नागरिकांना देखील पाठवावी. Ration e-kyc 2025 information