
महिला उद्योगिनी योजना 2025
महिला उद्योगिनी योजना 2025 | महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना, असा करा अर्ज
महिला उद्योगिनी योजना 2025 : महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र शासनाकडून व राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना अमलात आणल्या जातात. आर्थिक, दुर्बल घटकातील महिलांचा विकास व्हावा व महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध सवलतीही महिलांना दिल्या जातात. त्यामुळे आज आपण या लेखांमधून महिला ‘उद्योगिनी योजना’ या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत.? कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे.? अर्ज कुठे व कसा करायचा याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे वाचकांनी लेखा शेवटपर्यंत वाचावा.
महिला उद्योगिनी योजना 2025 या योजनेची सुरुवात सर्वप्रथम कर्नाटक राज्याने सुरू केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या योजनेची अंमलबजावणी ही देशभरात सुरू केली. आता देशभरात केंद्र सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला उद्योगिनी योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाते. महिला उद्योगिनी योजना म्हणजे देशातील ग्रामीण आणि माघ असलेल्या भागातील महिला उद्योजकांना विशेष निरीक्षक महिलांना आर्थिक सहाय्य देऊन एखाद्या व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते या योजनेच्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणही दिले जाते.
प्रत्येक राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या महिलांनी आपल्या कुटुंबाला हातभार लावावा या उद्देशाने महिला उद्योगिनी योजना सुरू करण्यात आली आहे लघुउद्योग योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. त्यामुळे महिलांनीही प्रत्यक्षात व्यवसायामध्ये उतरून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा या उद्देशाने शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना संपूर्ण देशभरात सुरू केलेली आहे. त्यामुळे या योजनेचे महत्त्व हे संपूर्ण देशात आहे. महिला उद्योगिनी योजना 2025

महिला उद्योगिनी योजना 2025 Overwiev
योजनेचे नाव | महिला उद्योगिनी योजना |
याद्वारे सुरू | भारत सरकार महिला विकास |
योजनेची सुरुवात | 2020 |
लाभार्थी | ग्रामीण भागातील महिला उद्योजक |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
उद्देश | देशातील महिलांचे सक्षमीकरण करणे आणि प्रत्येक महिलांना आत्मनिर्भर बनवणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे |
महिला उद्योगिनी योजना 2025 मुख्य उद्देश
● देशामध्ये आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या भागातील महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे. हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
● राज्यातील एससी आणि एसटी किंवा विशिष्ट प्रवर्गातील महिलांना आर्थिक साहाय्यावर कमी व्याजदर आकारणे.
● कोणतेही महिलांना भेदभाव न करता किंवा पूर्वग्रह न ठेवता मोफत व्यास अग्रम प्रदान करणे.
महिला उद्योगिनी योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
1. देशातील ग्रामीण भागातील ज्या महिलांना एखादा छोटा व्यवसाय उभा करायचा आहे त्या महिलांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येतो.
2. या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन लाखापर्यंत आगाऊ रक्कम देण्यात येते.
3. सदरी योजनेच्या माध्यमातून 88 उद्योग करण्यासाठी महिलांना आगाव रक्कम दिले जाते.
महिला उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून एकूण 88 व्यवसायासाठी लाभ घेता येतो. ते व्यवसाय खालील प्रमाणे दिलेले आहेत. [महिला उद्योगिनी योजना 2025]
1. अगरबत्ती उत्पादन
2. केळीचे कोमल पान
3. बांगड्या
4. सलून
5. चप्पल निर्मिती
6. साफसफाईची पावडर
7. कापूस धागा उत्पादन
8. कापड व्यापाराचा कापलेला तुकडा
9. इंधन लाकूड
10. व्यायाम केंद्रे
11. भाजीपाला आणि फळांची विक्री
12. शाई उत्पादन
13. चटई विणणे
14. माचीस बॉक्स उत्पादन करणे
15. दूध केंद्र
16. छायाचित्र स्टुडिओ
17. पेपर साप्ताहिक आणि मासिक विकणे,
18. लायब्ररी
19. मातीची भांडी
20. पापड बनवणे
21. मिठाईचे दुकान
22. जुने पेपर मार्ट फिटिंग
23. साडी आणि भरतकाम
24. रेशीम धागा निर्मिती
25. रेशीम विणकाम
26. दुकाने आणि आस्थापना
27. कपडे छापण्यांनी रंगवणे
28. लोकरीच्या कपड्याचे उत्पादन.
यासह एकूण 88 व्यवसायासाठी योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
महिला उद्योगिनी योजनेचे अनेक फायदे
● देशातील कोणतीही ग्रामीण भागातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते त्यासाठी योजनेच्या माध्यमातून तीन लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकते.
● व्यवसाय करण्यासाठी किंवा योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही शिक्षणाची अट नाही त्यामुळे ही योजना सहज उपलब्ध होते.
● या योजनेच्या माध्यमातून एकूण 88 लघु उद्योगाच्या व्यवसायासाठी कर्ज घेता येते.
● सदरील योजना ही फक्त महिलांसाठी आहे.
● महिला उद्योगिनी योजनेचे कार्यपद्धती पारदर्शक पद्धतीने पार पडते.
महिला उद्योगिनी योजनेसाठी नियम व अटी
● अर्जदार महिलाही भारतीय नागरिक असावी.
● महिला उद्योगिनी योजना ही फक्त महिलांसाठी आहे व व्यावसायिक करणाऱ्या महिलांसाठीच ही योजना उपलब्ध आहे.
● योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलेने भूतकाळामध्ये कोणत्याही बँकेचे कर्ज घेऊन थकीत ठेवलेले नसावेत.
● अर्जदार महिलेचा क्रेडिट स्कोर हा उत्तम असावा.
महिला उद्योगिनी योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्रे / Document
● अर्जदार महिलेचे आधार कार्ड
● जन्माचा दाखला
● रेशन कार्ड
● उत्पन्नाचा दाखला
● रहिवाशी दाखला
● जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
● अधिकृत बँकेचे पासबुक
● भरलेला अर्ज
● पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
● मोबाईल नंबर
सरकारी योजनेसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.
महिला उद्योगिनी योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करायचा.?
● तुम्ही या योजनेसाठी जर पात्र असाल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या जवळील बँकेत जाऊन योजने संदर्भात चौकशी करावी.
● सदरील बँक जर तुम्हाला या योजनेसाठी कर्ज देत असेल तर त्या बँकेकडे तुम्ही संपूर्ण लागणारी कागदपत्रे जमा करावीत.
● अशाप्रकारे तुम्ही कोणतेही बँकेमधून महिला उद्योगिनी योजनेसाठी कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करू शकता. महिला उद्योगिनी योजना 2025
सारांश :
अशाप्रकारे महिला उद्योगिनी योजना 2025 साठी तुम्ही वरील प्रमाणे सर्व माहिती व्यवस्थितपणे वाचून संपूर्ण प्रक्रिया पार पडू शकतात. तुम्हाला अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारे अडचणीत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा नक्की आम्ही त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू, माहिती आवश्यक वाटल्यास इतर महिलांना देखील आवर्जून शेअर करा.