शिलाई मशीन योजना 2024 | महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप योजना, असा करा अर्ज

शिलाई मशीन योजना 2024 | महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप योजना, असा करा अर्ज

शिलाई मशीन योजना 2024 : देशामध्ये महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी व महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना अमलात आणल्या जातात. व त्याच्या माध्यमातून महिलांचा विकास साधला जातो, याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील महिलांसाठी शिलाई मशीन योजना 2024 सुरू केलेली आहे.

देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना स्वतःच्या घरी बसूनच स्वतःचा उद्योग करता यावा या उद्देशाने मोफत शिलाई मशीन योजना सुरू झालेली आहे. शिलाई मशीनच्या माध्यमातून महिला स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक विकास करून कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवू शकतील, व स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक विकास करू शकतील या अनुषंगाने ही योजना महत्त्वपूर्ण योजना आहे.

महाराष्ट्र राज्याचा विचार करता महाराष्ट्र राज्यातील अनेक महिला या दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. महिलांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशांची आवश्यकता असते परंतु महिलांकडे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय नसल्यामुळे त्या महिला पैशासाठी इतरांकडे अवलंबून राहतात, त्यामुळे केंद्र शासनाने या गोष्टीचा विचार करून ग्रामीण भागातील रोजगाराच्या स्थायी संधी उपलब्ध करण्यासाठी व महिलांना रोजगार मिळण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे. याच्या माध्यमातून महिला घरी बसून स्वतःचा लघुउद्योग करू शकतात, आजूबाजूच्या परिसरातील महिलांचे कपड्यांचे शिवणकाम करून महिला घरी बसून पैसे कमवू शकतील या हेतूने ही योजना अमलात आणली आहे.

मोफत शिलाई मशीन योजनेचा उद्देश हाच आहे की राज्यातील महिला घरी बसून स्वतःचा व्यवसाय करून पैसे कमवतील व कुटुंबाला आर्थिक हातभार लावतील या उद्देशाने शिलाई मशीन योजना 2024सुरू केलेली आहे.

वाचकांना महत्वपूर्ण सूचना :

केंद्र शासनाच्या अंतर्गत व राज्य शासनाच्या अंतर्गत राज्यातील व देशातील महिलांसाठी अनेक योजना सुरू आहेत. परंतु कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना अर्जदार महिलांनी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन देखील माहिती घेणे गरजेचे आहे, कारण वेळोवेळी योजनेमध्ये बदलही केले जातात. शिलाई मशीन योजना 2024

शिलाई मशीन योजना 2024
शिलाई मशीन योजना 2024

मोफत शिलाई मशीन योजना आढावा Overview 2024

योजनेचे नाव मोफत शिलाई मशीन योजना.
लाभार्थी राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला
मिळणारा लाभ मोफत शिलाई मशीन वाटप योजनेचा
योजनेचा उद्देश महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे
द्वारा  सुरु  केंद्र शासन 
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाइन

 

मोफत शिलाई मशीन योजनेचे मुख्य उद्दिष्टे

● महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना एखादा स्वतःचा लघु उद्योग सुरू करता यावा, या उद्देशाने शासनाच्या माध्यमातून गरजू महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना वाटप केली जाते.

● राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवणे.

● महिलांना स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे.

● महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे,.

● बेरोजगार महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,

● देशातील महिलांचे सक्षमीकरण करणे.

● पुरुष व महिला यामध्ये समानता आणणे.

मोफत शिलाई मशीनचे मुख्य वैशिष्ट्ये

1. शिलाई मशीन योजना 2024 ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जाणारी देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबातील व दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
2. महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना 50000 पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.
3. शिलाई मशीन योजना 2024 च्या माध्यमातून मिळणारी रक्कम ही लाभार्थी महिलेच्या खात्यावरती थेट जमा करण्यात येते.
4. केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली ही योजना महिलांसाठी अत्यंत लाभदायी ठरलेली आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना निशुल्क उपचारासाठी व अपघात झाल्यानंतर कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून 2 लाख रुपये दिले जातात, पहा संपूर्ण योजना 

मोफत शिलाई मशीन योजनेचे मुख्य फायदे

● राज्यातील व देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाते व त्या मशीनच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसरातील महिलांचे कपड्यांचे शिवणकाम करून महिला घरी बसून पैसे कमवतील व कुटुंबाला आर्थिक हातभार लावतील.

योजनेअंतर्गत या घटकांना प्राधान्य

1. अनुसूचित जाती
2. अनुसूचित जमाती
3. अपंग महिला
4. विधवा महिला

मोफत शिलाई मशीन योजनेच्या नियम व अटी

1. अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी.
2. केवळ आणि केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
3. अर्जदार महिला ही दारिद्र्यरेषेतील कुटुंबातील असावी व आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
4. अर्जदार महिलेचे वय हे 20 ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक राहील.
5. 20 वर्षाच्या आतील व 40 वर्षे च्या जास्त वय असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही त्यामुळे या महिलेने अर्ज करू नये.
6. शिलाई मशीन योजनेचा लाभ हा फक्त महिलांनाच दिला जातो पुरुषांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
7. अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नसावे.
8. अर्जदार महिलेकडे शिलाई करत असल्याचे शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक राहील.
9. आर्थिक दृष्ट्या घरी बसलेल्या कुटुंबातील विधवा व अपंग महिलांना या योजनेमध्ये अधिकचे प्राधान्य देण्यात येईल.
10. याच्या अगोदर केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या माध्यमातून योजनेचा लाभ मिळवला असल्यास त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जात नाही. शिलाई मशीन योजना 2024
11. सरकारी नोकरीत कार्यरत असलेल्या महिलांना या योजनेत सामावून घेतले जात नाही.
12. अर्जदार महिलाही विधवा असेल तर महिलेला अर्जासोबत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र देखील सादर करणे गरजेचे आहे.
13. तसेच अर्जदार महिला अपंग असेल तर त्या महिलेला अपंग असलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
14. एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ दिला जातो.
15. अर्जदार महिलेने कोणत्याही प्रकारे खोटे माहिती देऊन अर्ज केला असल्यास त्या महिलेचा अर्ज बाद केला जाईल.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक महत्त्वपूर्ण कागदपत्रे

1. महिलेचे आधार कार्ड
2. कुटुंबाचे रेशन कार्ड
3. रहिवासी प्रमाणपत्र
4. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
5. मोबाईल नंबर
6. ईमेल आयडी
7. बँक खात्याचा तपशील
8. महिला विधवा असल्यास पतीचे प्रमाणपत्र
9. महिला अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र (आवश्यक राहील)
10. कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

● अर्जदार महिलाही जर ग्रामीण भागातील रहिवासी असेल तर त्या महिलेने आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात जाऊन महिला सशक्तिकरण विभागात जाऊन शिलाई मशीन योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
● अर्जदार महिलाही जर शहरी भागामध्ये राहत असेल तर त्या महिलेने महानगरपालिकेमध्ये जाऊन अर्ज घ्यायचा आहे.
● अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे.
● अर्जात आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडावी लागतील व सदरचा अर्ज त्याच कार्यालयात जमा करावा लागेल.
● अशा प्रकारे मोफत शिलाई मशीन योजना साठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी कोणत्याही प्रकारे ऑनलाईन पोर्टल सुरू झालेलं नाही सुरू झाल्यास अपडेट मिळतील.

शिलाई मशीन योजना 2024
शिलाई मशीन योजना 2024
मोफत शिलाई मशीन योजना अर्ज डाऊनलोड करा
सरकारी योजनेसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

सारांश :

अशाप्रकारे तुम्ही वरील सर्व माहिती व्यवस्थितपणे वाचून शिलाई मशीन योजना 2024 योजनेसाठी अर्ज सादर करू शकता, अर्ज करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा नक्की आम्ही त्याचे उत्तर देऊ, माहिती आवडली असल्यास तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील महिलांना देखील ही माहिती शेअर करा.

Leave a Comment