महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25 आता पाच लाखापर्यंत वैद्यकीय सुविधा मोफत

महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25 आता पाच लाखापर्यंत वैद्यकीय सुविधा मोफत

महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25 : केंद्र शासनाच्या अंतर्गत आणि राज्य शासनाच्या अंतर्गत देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. महात्मा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली एक आरोग्य विषयक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील नागरिकांना पाच लाखापर्यंत उपचार हे मोफत मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील जे कुटुंब तालुक्यातील रेषेखालील जीवन जगत आहेत त्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा कुटुंबातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू झालेली आहे याबद्दल अनेक नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळत देखील आहेत.

भारत देशामध्ये आरोग्य विषयक अनेक समस्यांचा तुटवडा हा सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतो, यामधून अनेकांचे उपचारा अभावी जीवदेखील गेलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा भेटत नसल्यामुळे व अधिकचा पैसा मोजावा लागत असल्यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिक हे उपचार घेऊ शकत नाहीत, हाच विचार केंद्र सरकारने राज्य सरकारने करून 1 एप्रिल 2020 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केलेली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रित काम करत आहेत. परंतु महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडून निधी मिळतो, पण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये 60 टक्के व 40 टक्के याप्रमाणे खर्च करण्यात येतो. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. यामध्ये गंभीर आजारांचाही प्रामुख्याने सामावेश करण्यात आलेला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25

अनेकांना पैसे अभावी चांगले उपचार घेता येत नाहीत. परिणामी त्यांचा मृत्यू देखील होतो.
राज्यातील शहरी भागातील व ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तींना चांगल्या प्रकारे वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाच्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आलेली आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत.? कोणत्या आजारावरती मोफत प्रक्रिया केली जाते.? याची सर्व माहिती या लेखांमधून पाहणार आहोत त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचावा. महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25

वाचकांना महत्त्वाच्या सूचना

राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींसाठी अनेक योजना राबवल्या जातात. परंतु ठराविक योजनेमध्ये वेळोवेळी बदल देखील केले जातात, त्यामुळे तुम्ही या योजनेचा लाभ घेत असताना अधिकृत माहिती घेणे खूप गरजेचे आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25
महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25

महात्मा फुले जन आरोग्य योजना आढावा Overview

योजनेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
योजनेची सुरुवात 2 जुलै 2012
लाभार्थी नागरिक राज्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिक
उद्देश आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांना मोफत आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणे
मिळणारा लाभ 5 लाखापर्यंत मोफत उपचार
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन

 

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य उद्दिष्टे

1. महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आरोग्य विषयक उपचार घेता यावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केलेली आहे.
2. राज्यातील कोणत्याही नागरिकांचा उपचारा अभावी व पैशाअभावी मृत्यू होऊ नये.
3. सर्वसामान्य नागरिकांना चांगले उपचार मिळावे हा देखील शासनाचा मुख्य उद्देश आहे.
4. राज्यातील अनेक नागरिक हे पैसे अभावी उपचार घेऊ शकत नाहीत परिणामी त्यांचा मृत्यू होतो. अशा नागरिकांना मोफत उपचार देणे.
5. उपचार घेण्यासाठी खर्च हा मोठ्या प्रमाणावर येत असतो त्यामुळे इतरांकडून सर्वसामान्य नागरिकांना पैसे घेण्याची वेळ येऊ नये यासाठी ही योजना महत्त्वाची आहे.
6. राज्यातील सर्व नागरिकांना चांगली वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी हा देखील शासनाचा मुख्य उद्देश आहे.
7. एकंदरीतच महाराष्ट्र राज्यातील कोणताही नागरिक पैशाअभावी व उपचाराअभावी मृत्यू पाहू नये, यासाठी योजना सर्वसामान्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

● महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25 ही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातून चालवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
● सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व सामान्य आर्थिक दृष्ट्या घरी बसलेल्या नागरिकांना मोफत उपचार दिले जातात.
● राज्यातील कोणताही नागरिक उपचाराअभावी वंचित राहणार नाही यासाठी ही योजना महत्त्वाचे आहे.
● योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार लाभार्थ्यास संपूर्ण आरोग्य सुविधा पुरवते.
● महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, कॅन्सर, डेंगू, स्वाईन फ्लू, ऑपरेशन मलेरिया यासारख्या गंभीर आजारावर देखील मोफत उपचार केले जातात.
● महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना चा लाभ हा सर्व शिधापत्रिका असलेल्या नागरिकांना दिला जातो.

 मुलगी जन्माला आल्यानंतर त्या कुटुंबांनी एकाच मुलीवरती कुटुंब नियोजन केले असेल तर त्या मुलीला 50 हजार रुपयांचे आर्थिक मदत शासनाच्या माध्यमातून केली जाते. माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25

महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी लाभार्थी नागरिक

1. राज्यातील ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे वर्षाला एक लाखापर्यंत आहे अशा पिवळ्या रेशन कार्ड धारकांना व केशरी रेशन कार्ड धारकांना महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25 योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार दिले जातात.
2. महाराष्ट्र राज्यातील आश्रम शाळेतील शिकणारे विद्यार्थी देखील या योजनेसाठी पात्र आहे.
3. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांसाठी आहे.
4. महाराष्ट्र राज्यातील वृद्धाश्रमात राहणारे ज्येष्ठ नागरिक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
5. राज्यातील बांधकाम कामगार तसेच त्यांच्या मुलांनाही योजनेचा लाभ दिला जातो. महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25

या आजारावरती दिले जातात उपचार

1. हृदयरोग
2. ह्रदयरोग शस्त्रक्रिया उपचार
3. आकस्मित उपचार
4. त्वचारोग अंतस्त्राव संस्थेचे विकार
5. सर्वसाधारण शस्त्रक्रिया
6. व्याधीवर उपचार
7. संसर्ग जन्य आजार
8. जठरमार्गाचे उपचार
9. कर्करोगावरील औषध उपचार
10. नवजात व बालक रोग
11. वैद्यकीय व्यवस्थापन मूत्रपिंड विकार
12. मज्जातंतूचे विकार
13. स्त्रीरोग व प्रशिक्षण बालरोग शस्त्रक्रिया
14. प्लास्टिक सर्जरी
15. कृत्रिम अवयव उपचार
16. फुप्फुसाच्या आजारावरील उपचार
17. मानसिक आजार जबडा व चेहऱ्यावरील शस्त्रक्रिया

महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या नियम व अटी

● महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी आवश्यक आहे.
● आर्थिक दृष्ट्या गरिबांनी सर्व शिधापत्रिका धारकांना या योजनेचा लाभ दिला जातो.
● महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ तुमच्याकडे रेशन कार्ड असणे खूप गरजेचे आहे.
● योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे दोन लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25

महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी महत्त्वाची कागदपत्रे

1. रहिवाशी दाखला
2. आधार कार्ड
3. रेशन कार्ड
4. पॅन कार्ड
5. मतदार कार्ड
6. बँकेचे पासबुक
7. मोबाईल क्रमांक
8. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
9. शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचे प्रमाणपत्र

महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

● महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी अर्जदार नागरिकाला सर्वप्रथम या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा लागेल.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
सरकारी योजनेची माहिती मिळवण्यासाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

 

सारांश :

अशाप्रकारे तुम्ही महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी वरील माहिती वाचून अर्ज करू शकता अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारे अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही नक्की त्याचे उत्तर देऊ. सदरची माहिती ही समाजातील इतर नागरिकांपर्यंत ही पोहोचवा. महात्मा फुले जन आरोग्य योजना 2024-25

Leave a Comment