कडबा कुट्टी मशीन 100% अनुदान मिळणार असा करा अर्ज, पहा संपूर्ण माहिती…
कडबा कुट्टी मशीन 100% अनुदान : देशामध्ये सर्वाधिक केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती, ग्रामीण भागामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. त्यामुळे भारत देशाला कृषिप्रधान देश म्हणून एक वेगळी ओळख आहे. परंतु देशांमध्ये आजही पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. पारंपरिक शेती बरोबरच जोडधंदा म्हणून अनेक व्यवसाय केले जातात, गाई, म्हशी, शेळी मेंढी पालन याच्या माध्यमातून शेती व्यतिरिक्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी हे व्यवसाय करत असतो. शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून पशुपालन हा एक मोठा पर्याय आहे. पशुपालनाच्या माध्यमातून अनेक शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न काढत आहेत.
परंतु शेतकऱ्यांना पशुपालन करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, गाय म्हैस यांना खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हिरवा चारा लागत असतो, त्यामुळे हिरवा चारा कापण्यासाठी शेतकऱ्यांना शारीरिक कष्ट हे मोठ्या प्रमाणावर घ्यावे लागतात. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कडबा कुट्टी मशीन योजना सुरू करण्यात आलेले आहे. कडबा कुट्टी मशीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिशय बारीक चारा करून जनावरांना घालता येतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना आता चारा कापण्याचे आवश्यकता भासणार नाही.
केंद्र शासनाच्या अंतर्गत आणि राज्य शासनाच्या अंतर्गत राज्यातील व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन योजना सुरू करण्यात आली आहे यासाठी शासन 100% अनुदान देत आहे. कडबा कुट्टी मशीन योजना याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय कागदपत्रे कोणती लागणार अर्ज कुठे करायचा अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या लेखांमधून पाहणार आहोत त्यामुळे वाचकांनी हा लेख शेवटपर्यंत वाचावा. कडबा कुट्टी मशीन 100% अनुदान
वाचकांना विनंती :
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना सुरू असतात, परंतु काही वेळा योजनेमध्ये बदल देखील केले जातात. त्यामुळे योजनेचा लाभ घेत असताना ही तंबूत माहिती पाहणे अर्जदाराला आवश्यक राहील. कडबा कुट्टी मशीन 100% अनुदान
कडबा कुट्टी मशीन योजना आढावा Highlight
योजनेचे नाव | कडबा कुट्टी मशीन योजना |
याद्वारे सुरू | राज्य आणि केंद्र सरकार |
लाभार्थी | देशातील लहान शेतकरी आणि पशुपालक |
उद्देश | जनावरांना चारा कापण्यासाठी योजनेची सुरुवात |
विभाग | पशुसंवर्धन विभाग |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाईन |
कडबा कुट्टी मशीन योजनेचे मुख्य उद्दिष्टे
● देशातील लहान मोठे जे शेतकरी आहेत त्यांना जनावरांसाठी चारा कापण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्यामुळे कडबा कुट्टी मशीन या योजनेच्या माध्यमातून मशीन मिळाल्यानंतर या शेतकऱ्यांना चारा कापण्यासाठी शारीरिक कष्टाची गरज भासणार नाही. ही शासनाचे मुख्य उद्दिष्टे आहे.
● कडबा कुट्टी मशीनच्या माध्यमातून लवकरात लवकर जास्तीत जास्त हिरवा चारा कट करण्यात यावं व शेतकऱ्यांना उन्हाळ्यात देखील तो चारा वापरता येईल अशा प्रकारे शेतकऱ्यांना नियोजन करता यावे.
● अनेक छोट्या शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे ते शेतकरी कडबा कुट्टी मशीन घेऊ शकत नाहीत अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे.
● शेतकऱ्यांना पशुपालन या व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
● राज्यातील शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी प्रेरित करणे व राज्यातील इतर नागरिकांना देखील या व्यवसायाकडे आकर्षित करणे.
● एकंदरीतच राज्य शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांनी जोडधंदा करावा व त्याच्या दोन्ही उत्पादन मिळवावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासनाने कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केलेली आहे.
कडबा कुट्टी मशीन योजना मुख्य वैशिष्ट्ये
1. या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी लाभाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
2. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये या मशीनच्या माध्यमातून चारा कापण्यासाठी मदत होईल.
3. शेतकऱ्यांना शारीरिक कष्ट घेऊन हाताने चारा कापण्याचे आवश्यकता भासणार नाही.
4. सदरची योजना ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील चालवली जाते.
शासनाच्या इतर योजना पहा.
कडबा कुट्टी मशीन योजनेच्या नियम व अटी
● अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
● महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
● अर्जदार शेतकऱ्याकडे पशुपालन व्यवसाय असणे आवश्यक आहे.
● फक्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ शासनाच्या माध्यमातून दिला जातो.
● अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा अधिकचे असता कामा नये.
● योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी कडबा कुट्टी मशीन ही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विकता येणार नाही.
● मुंबई शहर व मुंबई उपनगर या शहरांना सोडून राज्यातील सर्व शहरांमध्ये ही योजना लागू आहे. कडबा कुट्टी मशीन 100% अनुदान
खड्डाबा कुट्टी मशीन योजनेचे मुख्य फायदे
● कडबा कुट्टी मशीनला इलेक्ट्रिक मोटर जोडलेले असल्यामुळे कमी वेळामध्ये अधिकचा चारा कापण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होते.
● मशीनच्या माध्यमातून चारा कापल्यामुळे चारा अतिशय बारीक होतो व तो जनावरांना खाण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो.
● पशुपालन व्यवसाय करणारे शेतकऱ्यांना चारा कापण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार नाही.
● कडबा कुट्टी मशीन 100% अनुदान मशीन योजनेमुळे शेतकऱ्यांची कामे लवकरात लवकर होण्यासाठी मदत होते.
● कडबा कुट्टी मशीन मधून चारा कापून उन्हाळ्यामध्ये ही साठवून ठेवता येतो त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा आहे. कडबा कुट्टी मशीन 100% अनुदान
कडबा कुट्टी मशीन योजनेचे लाभार्थी
● महाराष्ट्र राज्यातील शेतकरी तसेच पशुपालक या योजनेसाठी लाभार्थी आहेत.
कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे
● कडबा कुट्टी मशीन या योजनेसाठी अर्ज करत असताना शेतकऱ्यांना खालील प्रमाणे महत्त्वाची कागदपत्रे अनिवार्य आहेत.
1. अर्जदाराचे आधार कार्ड
2. रहिवासी प्रमाणपत्र
3. बँक खात्याचे झेरॉक्स
4. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
5. कडबा कुट्टी मशीन खरेदी केल्याचे ओरिजनल बिल
6. मोबाईल नंबर
7. ईमेल आयडी
8. इत्यादी
कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
● अर्जदार शेतकऱ्याला प्रथमता महाराष्ट्र शासनाचे या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल. कडबा कुट्टी मशीन 100% अनुदान
● सदरच्या वेबसाईटच्या होमपेज वर गेल्यानंतर अर्जदाराला सुरुवातीला नोंदणी करून घ्यावे लागेल.
● नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला आता तुमच्यासमोर शेतकरी सर्व योजनेची लिस्ट दिसेल, त्यामध्ये तुम्हाला कडबा कुट्टी मशीन योजना यावरती क्लिक करायचे आहे.
● आता तुमच्यासमोर नवीन योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे भरायचे आहे व आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जोडून शेवटी सबमिट या बटणावरती क्लिक करायचे आहे.
● अशाप्रकारे तुमचा कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरला जाईल. कडबा कुट्टी मशीन 100% अनुदान
कडबा कुट्टी मशीन योजनेचा ऑफलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया
● अर्जदार शेतकऱ्याला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती कार्यालयात जावे लागेल किंवा जिल्हा कार्यालय पशुसंवर्धन विभागात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
● अर्जात विचारलेले सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील.
● व सदर भरलेला अर्ज हा त्याच कार्यालयात जमा करावा.
● अशाप्रकारे तुम्ही कडबा कुट्टी मशीन साठी ऑफलाइन देखील अर्ज सादर करू शकता. कडबा कुट्टी मशीन 100% अनुदान
कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी | येथे क्लिक करा |
सरकारी योजनेसाठी Whatsapp ग्रुप | जॉईन करा |
कडबा कुट्टी मशीन योजना शासनाचा GR पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
सारांश :
अशाप्रकारे तुम्ही कडबा कुट्टी मशीन 100% अनुदान मशीन योजनेसाठी वरील माहिती सर्व वाचून अर्ज करू शकता, अर्ज करत असताना तुम्हाला कोणत्याही अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही त्याची नक्की उत्तरे देऊ. माहिती आवडली असल्यास ते शेतकऱ्यांना देखील शेअर करायला विसरू नका.