आंबा लागवड आधुनिक पद्धतीने आंबा लागवड करून अधिकचे उत्पन्न वाढवा…अशी करा आंबा लागवड….

आंबा लागवड आधुनिक पद्धतीने आंबा लागवड करून अधिकचे उत्पन्न वाढवा…अशी करा आंबा लागवड….

आंबा लागवड : आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशामध्ये अनेक प्रकारची शेती केली जाते, परंतु अनेक शेतकऱ्यांना शेती करत असताना त्यामध्ये यश येत नाही. म्हणजेच जास्त प्रमाणात नफा मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी हे संकटात जातात. अलीकडच्या काळामध्ये आंबा शेती करणे हे खूप फायदेशीर मानले जाते, आंबा हे जगामध्ये सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ असून, मागणी देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावरती आहे. परंतु भारत देशामध्ये आंबा पीक घेत असताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, कोणत्या प्रकारचे आंब्याचे रोपे लावावीत आणि त्यामधून अधिकचे उत्पन्न कसे घेता येईल यावरती लक्ष दिले पाहिजे. परंतु आज आपण या लेखांमधून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आंबा लागवड करून अधिकचे अधिक उत्पादन कसे मिळवता येईल याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही शेती करते परंतु शेती करत असताना प्रत्येकालाच नफा मिळतो किंवा प्रत्येक जण सुखी शेतकरी आहे असे मुळीच नाही. अनेक फळपिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तोटाही सहन करावा लागतो परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य प्रकारच्या जमिनीची निवड करून वेळेवर औषध फवारण्या करून जर पिक आणले तर शेतकऱ्यांना नक्कीच त्याच्या माध्यमातून फायदा होतो.

भारतासारख्या देशामधून दरवर्षी सरासरी सुमारे 12000 टन आंबा फळाची निर्यात होते, जगातील 53 देशांमध्ये भारतातून आंबा हे फळपीक निर्यात केले जाते. त्यापैकी 95% आंबा फळ हे बहारीन, बांगलादेश, कुवेत, मलेशिया, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर या देशांमध्ये आंब्याचे मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.

आंबा शेती करणे हे एक फायदेशीर आहे. ज्यामध्ये उच्च प्रमाण मध्ये उत्पन्न आणि आर्थिक फायद्याची शक्यता जास्त आहे. जगामध्ये आंबा या फळ पिकासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी देखील आहे.

आंबा लागवड
आंबा लागवड

आंबा पिकासाठी योग्य हवामान

आंबा हे उष्ण हवामानातील महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आंबा लागवडीत हवामान हे योग्य प्रकारे आहे. हमखास आणि भरपूर पाऊस होत असलेल्या प्रदेशात जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जमिनीत खोलवर पावसाचे पाणी मुरवून आंबा पीक चांगल्या प्रकारे वाढवता येते, किंवा शेतकऱ्यांना त्यापासून अधिकचे उत्पादन देखील मिळते. पाऊस कमी असलेल्या प्रदेशात मोहर येण्याच्या आधी पाण्याच्या एक दोन पाळ्या दिल्यास चांगले उत्पादन मिळते. कड्याची थंडी या पिकास विशेषण नवीन झाडांना मानवत नाही. बहर येण्यापूर्वी कोरडे हवामान असल्यास बहरावर त्याचा चांगला परिणाम होतो.

आंबा या पिकासाठी 17.7 ते 26.7 अंश सेल्सिअस तापमान असावे लागते समुद्रसपाटीपासून साधारणपणे 1.500 मीटर उंचीपर्यंत या पिकांची लागवड चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना करता येते.

आंबा पिकासाठी आवश्यक जमीन

आंबा पिके अनेक वर्षांचे बहुवर्षीय पीक आहे. आंबा हे उंच वाढणारे झाड आहे. झाडाची मुळे अन्नद्रव्य आणि पाणी याच्या शोधात खोलवर पसरतात, आंबा या झाडाची वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची जमीन निवडणे खूप महत्त्वाचे आहे. आंबा पिके अनेक प्रकारच्या जमिनीत चांगले वाढते, कोकणातील जांबा दगडापासून बनलेल्या खोल जमिनीत तसेच राज्याचे इतर भागातील गाळवट खोल व मध्यम खोल आणि चांगल्या पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनी या अंबा पिकासाठी योग्य समजल्या जातात.

प्रमुख आंब्याच्या जाती

विभाग आंब्याच्या शिफारस केलेल्या जाती
कोकण हापूस, रत्न, केसर, सिंधू
पश्चिम महाराष्ट्र हापूस, केशर, वनराज, लंगडा, तोतापुरी,
मराठवाडा निरंजन, केसर, लंगडा, तोतापुरी, नीलम

 

आंबा लागवडीसाठी योग्य हंगाम

आंबा लागवड करत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये म्हणजेच एप्रिल ते मे महिन्यात 10×10 मीटर अंतरावर किंवा अति घनता पद्धतीने लागवडीसाठी 15×15 मीटर अंतरावर 1 मीटर ला×1 मीटर रुंद ×1 मीटर खोलाकाराचे खड्डे तयार करून घ्यावेत. उन्हाळ्यात खड्डे काढण्याचा फायदा म्हणजे खड्डे काढल्यानंतर काही दिवस उन्हात तापतील, खड्डे खोदताना जमिनीचा 25 ते 30 सेंटीमीटर चा वरचा थर वेगळा ठेवावा आणि खालचा तर वेगळा करावा, वरच्या थरातील चांगली माती किंवा नदीच्या गाळाचे माती आणि उत्तम कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत दोन ते तीन किलो सुपरफास्ट यांचे मिश्रण करून तो खड्डा भरण्यासाठी वापरावे. व त्यानंतरच यामध्ये आंब्याची रोपे लावावीत.

मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून छोटे व्यवसायिकापासून ते मोठा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांना 50 हजारापासून ते 10 लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये आधार लिंक असलेल्या बँक खात्यात मिळतात. तसेच 3 सिलेंडर गॅस देखील मोफत दिले जातात.

कलमे केव्हा करायला हवीत.?

महाराष्ट्रातील हवामानानुसार आंब्याला वर्षभरात तीन ते चार वेळा पालवी फुटते, नव्या पालवीचा रंग लालसर तांबूस असतो, जसजशी पाने जुनी होतात तस तसा त्याचा रंग हिरवा पडत जातो. रोपावरील नवीन पालवीचा रंग तांबूस असताना रोपावर कलम केले असता अधिक यशस्वी होते. साधारणपणे जुलै ऑगस्ट अथवा सप्टेंबर महिन्यात बारा ते पंधरा महिने वयाच्या रोपावर कलमे करावेत.

आंबा लागवड
आंबा लागवड

शेतकऱ्यांनी कलमाची खरेदी करताना घ्यावयाची काळजी.

● कलमे सरळ उभट वाढणारे असावीत आणि कलमावर गडद हिरव्या रंगाची भरपूर निरोगी पाने असावी.
● खुंट आणि कलम फांदी यांची जोड एकसंध भक्कम झालेली असावी, खुंट व कलम याची जाडी एकसारखी असावी, शक्यतो स्थानिक हवामानात तयार केलेली कलमे लावणे अधिक चांगले फायदेशीर ठरेल, दूरच्या प्रदेशातून भिन्न हवामानातील तयार झालेली कलमे लावणे अगोदर ती काही महिने कुंडीत व मोठ्या पिशवीत वाढवून मग शेतात स्थलांतर करणे योग्य ठरेल अशा रीतीने आंबा कलमाची निवड करणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल.

अंबा पिकाची छाटणी पद्धत

साधारणपणे आंब्याच्या झाडांना छाटणीची शक्यतो गरज नसते, परंतु सुरुवातीच्या काळात झाडाला योग्य वळण व आकार देण्यासाठी झाडाची वाढ एकाच खोडवर करून घेणे आवश्यक राहते.

आंब्याचे झाड 1 मीटर उंचीपर्यंत येणाऱ्या खोडावरील फूट वेळोवेळी काढून टाकावे, त्यानंतर झाडाचा समतोल राहील अशा बेताने तीन-चार फांद्या वाढू द्यायच्या आहेत. गुंतागुंतीच्या वाकड्या फांद्या तसेच किडलेल्या फांद्या छाटून काढाव्यात खुंटावरून येणारे फुट वेळोवेळी काढावी. पहिली चार वर्षापर्यंत कलमांना मोहर आल्यास तो खुडावा, आंब्याची फळे एक वर्ष वयाच्या ग₹काडीवर येत असल्यामुळे छाटणी करून फारसा फायदा होत नाही.

आंबा पिकासाठी खते व्यवस्थापन

साधारणपणे आंब्याची झाडे लावल्यानंतर त्याच जमिनीत अनेक वर्ष वाढून फळे देतात, म्हणून आंब्याच्या वाढणाऱ्या झाडांना खताच्या योग्य त्या मात्रा दरवर्षी देणे महत्त्वाचे असते, सुरुवातीचे चार वर्षापर्यंत म्हणजेच फळ घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी झाडाला वाढीच्या काळात आवश्यक असलेला अनुवंश उपलब्ध होतात. साधारणपणे जून जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर, जानेवारी, फेब्रुवारी, महिन्यात झाडांना खते द्यावीत, फळे येणाऱ्या झाडांना वर्षातून दोनदा जून आणि ऑक्टोबर महिन्यात त्याच्या मात्रा दोन समान हफ्त्यात विभागून द्यावे, शेणखत तथा सेंद्रिय खत मात्र पावसाळ्यात सुरुवातीला द्यावे.

महाराष्ट्र शेतकरी ग्रुप जॉईन करा. 

सारांश :

अशाप्रकारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंबा पिकाचे लागवड करून त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यानंतर आंबा पिके शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरेल. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये आंबा पिकाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा या पिकाकडे विशेष लक्ष देऊन अधिकचे उत्पन्न मिळवावे आमचा लेख आवडला असल्याचे तर शेतकऱ्यांना देखील हा शेअर करावा.

Leave a Comment